पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्री चिपळूणकर. ३० १ दार व मनेोरंजक करता येण्याचे त्याच्या अांगी सामथ्र्य होतें तितकें जर त्यात त्यानीं खर्च केलें नसतें तर आपलें कर्तव्य नीटपणें न केल्याचा दोष त्यांच्या माथी येता. शास्रीबुवांच्या मताहून केIणाची मते भिन्न असू शकतील, नाहीं असें नाहीं; पण अमक्याच्या मताहून त्यांचीं मर्ते भिन्न होतीं म्हणून कुत्सित बुद्धीनें शास्रीबुवानी कडक भाषा वापरली असे म्हणणे म्हणजे घुबडानें आपल्या द्वेषानें सूर्य अधिक प्रखर तापती असे म्हणण्याइतकेच समंजसपणाचे आहे. अखेरीस शास्त्रीबुवाच्या स्वार्थत्यागासबंधानें हल्लीं जो एक नवा आक्षेप निघाला आहे त्याबद्दल दोन शब्द लिहून हा लेख संपवितो. स्वार्थत्याग कशास म्हणावा आणि कशास म्हणू नये याबद्दल व्याख्या करीत बसण्यात काही हाशील नाहीं. शास्रीबुवांनी सरकारी नोकरी सोडली ती पुढील अदाज पाहून सोडली हा कांहीं त्याचा दोष नाहीं, त्याच्या वडिलानीं त्यांस काही जहागीर ठेविलेली नव्हती. अर्थात् आपलें ब आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाचे साधन पाहणे ते त्याचे कर्तव्य होतें; पण आपणास पीट भरण्याची कांहीं पंचाईत नाहीं इतकी खात्री झाल्यावर अधिकाराच्या किंवा द्रव्याच्या लोभानें ते स्वकर्तव्यास पराङ्मुख झाले नाहींत हाच त्यांच्या अंगचा मोठा गुण होय. प्रत्येक मनुष्य आपआपल्या हातून काय होईल याचा अदमास करूनच त्या कामात पडत असतो. असा अदमास न करील तो मूर्ख होय. पण आपल्या आवडीप्रमाणे किंवा शक्ताप्रमाणें कर्तव्याची दिशा ठरविल्यानंतर उदरपोषणाकरितां नव्हें, तर द्रव्य व अधिकार यांच्या लालचीनें जो मनुष्य आपलें ठरावलेले कर्तव्य साडून देतो किंवा क्षणभर बाजूला ठेवतो तो पुढारी नव्हे आणि देशाचा हितकताही नव्हे. अशा दृष्टीनें विचार केला असता शास्रीबुवानी आपल्या कर्तव्याची जी दिशा ठरविलेली होती ती सरकारी नोकरीशी विसंगत आहे असे आढळून आल्याबरोबंर नोकरीपेक्षां कर्तव्याकडे त्यानीं जास्त लक्ष दिले हेच त्याच्या अगच्या ख-या धैर्याचे लक्षण होय. मनुष्याच्या पारखेची खरी वेळ हीच असते. शास्रीबुवाच्या बरोबरची मंडळी त्याच्यापेक्षा कमी विद्वान् होती असे नाही, पण शास्रीबुवानीं स्वतंत्र रीतीनें अध्ययन, अध्यापन व ग्रथलेखन अशी जी आपल्या कर्तव्याची दिशा ठरविली होती, तशी दुसच्या कोणी ठरावली नसल्यामुळे ते प्रवाहाने प्राप्त झालेल्या परिस्थितीतच गढून गेले. शास्त्रीबुवात व त्याच्या बरोबरीच्या विद्वानात जर काही भद असला तर तो हाच होय. देशस्थितीचा व आपल्या शक्तीचा विचार करून शास्रीबुवानी आपल्या कर्तव्याचे सुकाणू एका विविक्षित दिशेने धरले होतें; व इतर व्यवहार जेव्हा या दिशेच्या आड येऊं लागले, तेव्हा त्यांनी आपली दिशा कायम ठेविली आणि इतर व्यवहार सोडून दिले. प्रत्येक सुशिक्षित मनुष्य हें उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून जर आपले कर्तव्य बजावील तर देशाचे पुष्कळ कल्याण होणार आहे. निर्वाहाचे साधन प्रत्येकास पाहिलेंच पाहिजे. पण त्याची सोय झाल्यावर ** शती दशशतं सोऽपीह लक्षं शतं ?’ या न्यायाने आपली आशा