पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ ० ० लो० टिळकांचे केसरींतील लेख रंगभूमीवर हावभाव किंवा नटास आपले मनोविकार सभाजनास कमजास्त प्रमाणार्ने व्यक्त करितां येतात, पण पांढच्यावर काळे करून तद्वारा लोकांचे चित्ताकर्षण करून घेणें अंत:करणात खरी कळकळ असल्याखेरीज शक्य नाहीं. * तेथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नेोहे' असें जें तुकारामबुवांनीं म्हटले आहे तें प्रस्तुत प्रकरणीं अगदी बरोबर लागू पडतें. कित्येक लोकांची अशी समजूत आहे कीं, चागला लेख केोणता तर ज्यांत दोहों पक्षांचा समतेोलपणा राखून कोणासही न दुखविता दरबारी रीतीनें विषयाचे विवेचन केलेले असतें. चागल्या लेखाची ही व्याख्या दरबारी लोकानीं पाहिजे तर लक्षांत ठेवावी. पण ज्यास आपल्या विचाराची लोकांवर छाप बसवावयाची असेल, किंवा वाग्देवीच्या प्रसादानें लोकांच्या मनोवृति जागृत करावयाच्या असतील, त्यानें “ अमर्षशून्येन जनस्य जंतुना न जातहार्देन न विद्विषादर: ' हाच न्याय स्वीकारला पाहिजे. इंग्रजीमध्यें जेंॉनसन, मेकॉले वगरे मोठमोठे ग्रथकार झाले. त्याचीं मर्ते म्हणजे सवीस सर्वोशी ग्राह्य आहेत असें नाहीं; पण भाषेच्या आगी त्यांनीं जी मर्दुमकी आणलेली आहे तिचा राष्ट्राच्या अभिवृद्धीस जेो उपयोग झाला तो लोक कधीही विसरणार नाहीत. भाषा हे राष्ट्राचे हत्यार होय, आणि तें हत्यार जेो तयार करून देतो त्याचे राष्ट्रावर कांही लहानसहान उपकार नाहीत. अशा रीतीनें पाहिलें म्हणजे शास्त्रीबुवाचीं मर्ते कोणास ग्राह्य नसलीं तरीही त्यांनी त्याचे उपकारच मानिले पाहिजेत. चागली भाषा लिहिण्यास किंवा वापरण्यास काही तरी विषय पाहिजेच व ता विषय प्रत्येक ग्रंथकाराच्या वेळीं प्रचलित असलेल्या विषयांतूनच त्यानें निवडून घेतला पाहिजे. शास्रीबुवांनी जो विषय घेतला तो त्यांच्या पूर्वीच्या पिढयानी जे उद्योग सुरू केले होते त्यामुळे ओघानेंच प्राप्त झालेला होता हे वर सागितलेंच आहे. हा विषय एकदा हाती घेतल्यावर स्वभाषेत निरनिराळे मनेविकार हुबेहुब वठविण्याचे त्यांच्या अगीं जें सामथ्र्य हेोते व आपल्या देशबाधवास आपले विचार कळवून त्यांस जागृत करण्याबद्दल जी त्याच्या अंत:करणांत कळकळ होती ती सर्व या कार्याकडे त्यांनीं खर्च केली यात काही नवल नाही. त्याजकरिता त्यास दोष देणे म्हणजे “ शकराचार्यांनी आपली विद्वत्ता तारायंत्र शोधून काढण्यांत का खर्च केली नाहीं ’ असें म्हणण्याइतकेंच अविचाराचे होय. त्यांनीं स्वभाषेची आभवृद्धि करून आपल्या देशावर जे उपकार करून ठेविले आहेत त्यांच्या ऋणांतून मुक्त होण्यास आम्हास पुष्कळ दिवस लागतील. हे उपकार न स्मरता त्यांचे लेख कडक आहेत वगैरे कांहीं तरी सबबी काढून त्यांचे महत्त्व कमी करण्यास पाहणे माझ्यामते अगदीं अक्षम्य आहे. शास्रीबुवांनीं जे कांही लेख लिहिले आहेत ते स्वत:च्या मोक्षप्राप्तीकरिता नव्हेत. त्याच्या वेळीं जीं ढींगे प्रचारांत आलीं होतीं त्यांचा परिस्फोट करणे सार्वजनिकदृष्टया आपलें कर्तव्य आहे अशा समजुतीनें त्यांनी हे लेख लिहिलेले आहेत; व ते लेख जितके चटक