पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्री चिपळूणकर. २९९ श्रीपांडुरंगासही टाकून बोलण्याचा जो अधिकार होता तोच आम्हीं सांसारिकांनी बजाविल्यास आम्ही आपल्यास किती उपहासास्पद करून घेऊं हें सांगावयास नकोच. नुसत्या बुद्धीनें अमुक एक गोष्ट बरी किंवा अमुक एक वाईट हें जाणणें सर्वास जरी शक्य नसले तरी तेवढ्यानेच इष्ट सिद्धि होत नाहीं. लेोकात जर कोणत्याही विशिष्ट मताचा प्रचार करावयाचा असेल तर त्यास बुद्धिवादापेक्षां निराळ्या तच्हेचा अधिकार लागतो. तो अधिकार ज्यांस नाहीं त्यानीं विनाकारण बडबड करून पुढारीपणाचे सोंग आणण्यापेक्षा आपल्या शक्त्यनुसार योग्य उद्योग केल्यास ती अधिक श्रेयस्कर होईल हें उघड आहे. शास्त्रीबुवांच्या लेखांतून व टीकेंतून जर काहीं बोध घेण्यासारखा असला तर हाच होय, व त्याचकरितां त्यांच्या लेखास आम्ही इतकें महत्त्व देताँ. शास्रीबुवासंबंधानें शवटला आक्षेप म्हणजे कडक भाषेसंबंधाचा होय. पण हाही आक्षेप मागल्या इतकाच किंबहुना त्याहूनही अधिक अप्रयोजक आहे. एकदां लढाईस सुरवात झाल्यावर प्रतिपक्षानें आपलीं शस्रास्ने अधिक तीक्ष्ण करण्याची खबरदारी ठेवली होती अशी ओरड करीत बसणें, म्हणजे आपल्या दौर्बल्याचा दोष विनाकारण लोकांच्या माथीं मारणें होय. मनुष्याचे विचार एकमेकांस कळविण्यास भाषा हे एकच साधन आहे; आणि त्या भाषेचा अपकर्ष करणारा मनुष्य सर्व वस्तु चेोरणाच्या मनुष्यपेक्षांही जास्त निंद्य आहे असें मनूने सागितले आहे. निदेसबधानें हा जेो न्याय आहे तोच भाषच्या उत्कर्षासंबंधानें लागू होतो. स्वभाषेच्या आगी नाना त-हेचे मनोविकार व्यक्त करण्याची शक्ति आणणाच्या पुरुषाचे लोकावर जे उपकार होतात ते ज्यांनी भाषची प्रथमतः युक्ति काढून व्यवहारसौकर्य केलें त्याच्या उपकारापेक्षा फारसे कमी नाहीत. स्वभाषेची अभिवृद्धि व उत्कर्ष हें स्वराष्ट्राच्या उत्कर्षाचे एक प्रमुख साधन आहे व तें साधन विष्णुशास्री यानीं जितके परिपूर्णतेस आणिले तितकें पूर्वी कोणींच आणिले नव्हतें ही गोष्ट सर्वमान्य आहे. आपल्या देशातील लहानमोठ्या लोकांस आपले विचार कळवावे अशी ज्यास उत्कट इच्छा असेल त्यास स्वभाषेखेरीज दुसरें साधन नाहीं हे इंग्रजी शिकलेल्या लोकांनीं पक्के लक्षांत ठेविलें पाहिजे, व ज्यास लोकाबद्दल कळकळ नाहीं किंवा त्यास कांहीं ज्ञानाच्या गोष्टी सागणें अवश्य आहे असे वाटत नाहीं त्याच्या हातून स्वभाषेचा कधीं उत्कर्षही व्हावयाचा नाहीं. विष्णुशास्री यांच्या बरोबरीचे त्या वेळीं दुसरे विद्वान् झाले नाहींत असें नाहीं. पण मराठी भाषा त्यांनी हातीं न धरण्याचे कारण त्यांच्या आॉगीं लोकांबद्दलच्या खया कळकळीचा अभाव हेच होय. एखाद्या इंग्रजी बुकाचे साफ भाषांतर करणें किंवा साळुबाईची गोष्ट सजवून सांगणें यास मराठी भाषेचे ज्ञान लागत नाहीं असे नाहीं; पण मला लोकांच्या मनांत अमुक गोष्ट भरवून दिली पाहिजे अशा कळकळीनें ज्याचे अंत:करण जळत नाहीं त्याच्या हातून स्वभाषेची खरी सेवा होणे अशक्य होय.