पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

**< लो० टिळकांचे केसरीतील लेख कळू लागल्याबरोबर तो मनुष्य समाज सुधारण्याजी ध्वजा हातीं घेण्यास योग्य झाला; इतर्केच नव्हे तर आचारस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य यांचा पूर्णपणें उपभोग घेण्यास त्यास हक्क प्राप्त होऊन त्याची गणना परमहंसाच्या कोटींत लोकांनीं करावयास पाहिजे. कोणास ही कदाचित् थट्टा वाटल, पण खरोखरच अशात-हेची * परमहंस मंडळी ' मुंबईस निघालेली होती. ही सुधारणा नव्हे, अचरटपणा होय; हें विचारस्वातंत्र्य नव्हे, अव्यवस्थितपणा होय; असें उघडपणे सांगणारा व प्रतिपादन करणारा गृहस्थ विष्णुशास्री याच्यापूर्वी केोणी निघालेला नव्हता. समाजाचे मत पहिल्यापासूनच असे होतें, पण वर सागितलेल्या कारणाकरिता तें प्रतिपादन करण्यास कोणी पुढे आले नव्हते, ते विष्णुशास्री आले, एवढाच काय तो विशेष होय. हा अचरटपणा जगास व्यक्त करून दाखविणारा पुरुष प्राचीन आचारविचाराचा सर्वाशीं भोक्ता असला पाहिजे ही कल्पना युक्तीच्या किंवा तर्कशास्त्राच्या कसोटीस टिकेल असे मला वाटत नाहीं. फार लाब कशाला ? उद्यां जर जुन्या पद्धतीनें शिकलेल्या शास्त्र्याचीच सभा बोलाविली तरी त्यात देखील देशकालानुरोधाने जुन्या समाजव्यवस्थेत कांहीं पेरफार केले पाहिजेत असें म्हणणारे काही शास्त्री निघतील. पण तेवढयाकरितां त्यांनीं नव्या मंडळीच्या आचरटपणाकडे किंवा अव्यवस्थितपणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे म्हणणें अगदीं वेडेपणाचे होय. सामाजास काहीं बंधने पाहिजेत आणि बंधनें कायम राहाण्यास प्राचीन संस्थाचा एक प्रकारचा अभिमानही समाजात जागृत असला पाहिजे. हा अभिमान ज्यास नहीं किवा समाजाचीं बंधने वाटेल तेव्हा तोडण्यास जे नेहमीं तयार असतात अशानीं समाजसुधारणेची ध्वजा हातीं घेऊन लोकाचे पुढारी होण्याची हाव धरणें अत्यंत अप्रयेोजक व उपहासास्पद होय. शास्रीबुवांची खरी लोकसेवा हीच होय कीं, त्यानी असल्या मंडळींची स्थिति लोकांपुढे माडली. इंग्लिश शिक्षणास सुरवात होऊन तेव्हा कांहीं नाहीं तरी चाळीस वर्षे झाली होतीं. इतक्या मुदतींत या नाच-या चळवळीपेक्षा अधिक उपयुक्त व शाश्वत अशी फारच थोडीं कार्मे या दोन तीन पिढीच्या लोकांच्या हातून झालेली आहेत; किंबहुना मुळीच नाहींत म्हटले तरी चालेल. या मंडळींनी आपल्या उदाहरणार्न तरुण पेिढीस जो एकप्रकारचा अव्यवस्थितपणाचा कित्ता घालून दिला त्याचीं मात्र फळे आज आम्ही भेोगीत अfहीं. समाजास किंवा देशास एकप्रकारची गतेि पाहिजे एवढे कोणाएकास कबूल असलें म्हणजे समाजरूपी नौकेस आचरटपणाच्या व अव्यवस्थितपणाच्या वावटळींत भडकू देण्यास त्यानें आपली संमति दिली पाहिजे असें कोणीही समंजस पुरुष म्हणणार नाहीं; व शास्रीबुवांसही तोच न्याय लागू केला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये “न बुद्धिभेदं जनयेतज्ञाना कर्मसंगिनाम्” जेोषयत्सवैकमीाण विद्वान्युक्त: समाचरन् ॥ असे जें सागितले आहे त्यांतील बीज हेंच होय. तुकारामासारख्या अंतबाह्य पांडुरंगमय झालेल्या साधूस न्हाव्याभटांची किंवा तीथीची निंदा करण्याचा किंवा प्रसंगविशेषीं