पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rくく लो० टिळकांचे केसरीतील लेख तथापि, महाराष्ट्रांतील प्रत्येकजण त्यांच्या दु:खाचा वाटेकरी आहे या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या आपलें मन विवेकानें आवरतील, आणि महाराष्ट्रांतील लोक ज्या महापुरुषाच्या मृत्यूकरितां आज आपण सर्वजण दु:ख करीत आहाँ त्यांचेच उदा. हरण आपणांपुढे ठेवून यथाशक्ति पण खन्था कळकळीनें त्यांनीं घालून दिलेला कित्ता गिरवून त्यांच्या ऋणांतून अंशतः तरी मुक्त होतील अशी आम्हांस आशा आहे. माधवरावजी तर गेलेच पण त्यांनीं घालून दिलेलें उहाहरण डोळ्यांपुढे ठेवून सर्वजण जर यथाशक्ति देशकार्याकरितां झटण्याचा प्रयत्न करतील तर आपल्या सवाँस जी गोष्ट हवी आहे ती प्राप्त झाल्याखेरीज कधीही राहणार नाहीं. माधवरावजींच्या गुणाबद्दल जितके जास्त लिहावें तितकें थोडेंच आहे; करितां आजचा लेख आम्हांस जरी अपुरा वाटत आहे, तरी माधवरावजींस त्यांच्या सत्कर्मामाणें गति मिळी एवढी अखेरीस प्रार्थना करून हा दुखवट्याचा लेख येथेच संपवितों.

  • कै. विष्णुशास्री चिपळूणकर यांच्या वेळची स्थिति.

काल रोजीं कै. विष्णुशास्री चिपळूणकर यांच्या श्राद्धतिनिमित्त भरलेल्या सभेपुढे रा. रा. बा. गं. टिळक यानी जो निबंध वाचला त्यांतून पुढील मजकूर घेतला आहे. सन १८१८ साली इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रांत बसल्यावर पेशवाईत दक्षिणेकरिता जी रक्कम खर्च होत होती ती तशीच इंग्रजसरकारनें चालू ठेविली. पण पुढे दक्षिणेचे ब्राह्मण कमी कमी होत जाऊन जसजशी दक्षिणाफंडाची रक्कम शिल्लक पडू लागली तसतसा या फंडाचा विनियोग विश्रामबाग-संस्कृत-कॉलेज काढण्याकडे लवकरच करण्यांत आला. या कॉलेजांत सन १८३७ सालापर्यंत केवळ संस्कृतच शिकवीत असत. पण पुढे त्याच्या अभ्यासक्रमांत इंग्रजीचा समावेश होऊन वीस वर्षानीं म्हणजे १८५७ साली त्याचेच डेक्कन कॉलेज बनलैं. युनिव्हर्सिटीचा कायदा सन १८५७ सालीं पास झालेला आहे व त्या कायद्याप्रमाणें डेक्कन कॉलेज हे सन १८६० सालीं नव्या युनिव्हर्सिटींत सामील करण्यांत आले. सन १८६० पासून १८७४ पर्यंत या कॉलेजांतून बी. ए. किंवा एम्. ए. झालेल्यांची संख्या पन्नास साठाच्या पलीकडे जाईल असे वाटत नाहीं. तथापि, सन १८३६ सालीं सुरू झालेल्या इंग्रजी शिक्षणाचे पंचवीस तीस वर्षात समाजावर जे परिणाम झाले ते इतके महत्त्वाचे आहेत कीं, त्यांची कल्पना डेक्कन कॉलेजांतील ग्रॅज्युएटच्या संख्येनें किंवा एक दोन व्यक्तींच्या चरित्रांवरून नीटपणें लक्षांत येणें अशक्य आहे.

  • केसरी, ता. १९ मार्च १९०१,