पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ポくs लो० टिळकांचे केसरींतील लेख असेल ते रावसाहबेांनीं अंगीकारलेला क्रम बिनधेोक्याचा होता असें कधीही म्हणणार नाहीत. महाराष्ट्रांतील लेोकांस सार्वजनिक बाबतीत चळवळ करण्याचे जर कोणी शिक्षण देत असेल तर ते माधवरावजीच होत ही गोष्ट सरकारास कळून चुकली होती, व माधवरावजींची पुण्याहून नाशिकास व नाशिकाहून धुळ्यास जी उचलबांगडी झाली ती कांही केवळ एक जागीं एक मनुष्य पुष्कळ वेळ ठेवणें योग्य नाहीं एवढ्याचकरितां नव्हे, हें सर्वास माहीत आहेच. फार लांब कशाला, माधवरावजींनीं स्थापिलेली सार्वजनिक सभा ही राजद्रेही आहे असा सर रिचर्ड टेंपलच्या कारकीर्दीत बूट निघाला होता; पण या सर्व अडचणीतून आणि संकटांतून धिमेपणानें माधवरावजींनी हातांत धरलेलीं सर्व कार्ये तडीस नेलीं. यांच्यापेक्षा कमी उत्साहाचा पुरुष प्रसंगीं डगमगून गेला असता. पण रावसाहेबाच्या बुद्धीचे व्यापकत्व जितकें अलौकिक होते तितकाच शांति हा गुण त्यांचे अंगांत असामान्य असल्यामुळे त्याच्या दीघाँद्योगास अखेरीस यश यऊन मुंबई इलाख्याच्या मध्यभागांत एकप्रकारची विशेष जागृति प्राप्त झाली. माधवरावजींसारखे पुरुष जेथे निपजले नाहींत तेथल्या आणि महाराष्ट्राच्या स्थितीची तुलना केली असतां आमच्या म्हणण्याची सत्यता कळून येईल. सारांश, महाराष्ट्रांत जर कांहीं आजमितीस जेोम आढळून येत असला, त्यातील वक्ते व लेखक जर निर्भयपणें सार्वजनिक गोष्टींची चर्चा करीत असले तर ते माधवरावजींच्या २५ वर्षाच्या दीर्घौद्योगाचे फल होय असे म्हणण्यास कोणतीही इरकत नाहीं. अशा त-हेचा पुरुष देशात निर्माण होणें हें देशाचे एक भाग्यच आहे. विद्वत्ता, मुत्सद्दीपणा, काम करण्याची हौस, सार्वजनिक हित केोणत्या उपायानीं करिता येईल याबद्दल एकसारखा निदिध्यास, आणि लोकानीं नेहमीं आपल्याउन्नतीच्या चळवळींत व्यग्र असार्वे अशी अनिवार इच्छा, इतके गुण आंगीं वसत असलेले थेोर पुरुष राष्ट्रांत वारंवार निपजत नसतात. महाराष्ट्रदेशांत अठराव्या शतकांत नाना फडणीस अशा प्रकारचे मुत्सद्दी होऊन गेले खरे, पण विद्वतेचे मान लक्षांत आणितां त्याची आणि माधवरावजींची तुलना करण्यापेक्षां महाराष्ट्राच्या किंवा दक्षिणेच्या प्राचीन इतिहासांत प्रसिद्धीस आलेले हेमाद्री किंवा माधवाचार्य यांची उपमा आमच्या मते माधवरावजींस अधिक साजण्यासारखी आहे. माधवाचार्याची बुद्धि चेोहॉकडे अकुंठित असल्यामुळे त्यांस * सर्वज्ञ: स हि माधवः ’ असे म्हणत असत. माधवरावजीचे बुद्धिवैभवही अशाच प्रकारचे विस्तृत व व्यापक होते; व या इंग्रजी राज्यांत जर हायकोर्टच्या जज्जाच्या कामापलीकडे त्यांच्या विशालबुद्धीचा उपयोग झाला नाहीं तर तो दोष माधवरावजींचा नव्हे, हल्लींच्या राज्यपद्धतीचा आहे हें लक्षांत ठेविलें पाहिजे. माधवरावजी जर आणखी काहीं दिवस जगते तर त्यांनी सुरू केलेल्या चळवळी उघड रीतीनें हाती घेऊन दादाभाई किंवा ह्यूम यांजप्रमाणे त्या शेवटास नेण्याचा उद्योग