Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता विधानही आपत्कालींच सांगितले आहे.+ एतावता निष्पन्न काय हातें कीं, औरस पुत्र नसल्यास स्वर्गप्राप्तीसाठीं दत्तकपुत्र घेण्याची जरूर नाहीं. तें काम पुष्कळ इतर उपायांनीं होण्याजोगे आहे. मग आपल्यास आपल्या(दत्तक)पुत्राकडूनच स्वर्गप्राप्ति झाली पाहिजे, या आग्रहास दुराग्रहापेक्षा दुसरें काहीं म्हणता येणार नाहीं. दन्तकावरील ग्रंथकाराचेही मत त्याचप्रमाणे आहे. दत्तकमंजरीकारानीं तर * पुत्रप्रतिनिधिः काम्य एव ’ म्हणजे दत्तक वस्तुतः अनवश्यक आहे, असा स्पष्ट शास्त्रार्थ दिला आहे. अमुक एक मनुष्याचे हातूनच मला स्वर्गप्राप्ति झाली पाहिजे, याखेरीज यांत कांहीं मतलब नाही, असेही आणखी त्यानीं सागितले आहे. साराश, शास्रदृष्टया स्वर्गप्राप्तीस दत्तकाची मुळींच जरूर नाहीं, मग दुराग्रह व रूढि काय म्हणतील तें म्हणोत. धर्मसंबंधीं दुसरा मुद्दा पिडेोदकदानाचा. याही संबंधे आमचे मत वरीलप्रमाणेच आहे. आधीं स्वर्गप्राप्ति झाल्यावर श्राद्धशादकाची जरूरच नाहीं, तथापि मुलगा नसल्यास, भाऊ, पुतणे, बायकी इतर आप्त वगैरे पुष्कळ श्राद्धाधिकारी सागितले आहेत, व दत्तक न घेतल्यानें म्हणजे काही अडतें असा मुळींच प्रकार नाह्रीं. ** मलमेतन्मनुष्याणां द्रविणं परिकीर्तित । ऋषिभिस्तस्य निर्दिष्टा निष्कृतिः पावनी परा । आदेहपतनात्तस्य कुर्यात्सर्वैौथ्र्वदेहिकं ?? असें जो जेो मृताचे धन घेईल त्याच्या पाठीमागे शास्रकारांनी लचाड लावून दिले आहे. बरै इतकही असून आपल्यापाठीमागे कोणीं आपले श्राद्ध करील कीं नाहीं याचा आपल्यास संशय असल्यास आपल्या ह्यातीतच आपली क्रिया व श्राद्ध आगाऊ करून घेण्याचा अधिकार स्मृतिकारानीं आपणास दिला आहे; तो इतका कीं पुत्रादि वारस असतांही सदर कार्यभाग आपणास आधींच उरकून घेता येतेो ! अशा श्राद्धास जीवच्छूद्ध म्हणतात, व हे आमच्या वाचकापैकीं पुष्कळाच्या ऐकण्यात असेलच. धर्मशास्त्राची एवढी सोय असता, मरता मरता दत्तक घेण्याची एवढी ओढ का बरें असावी ? बरें, तो तरी मन मोकळे करून घेतात काय ? नाही; तर, परलोकाचे प्रस्थान ठेवणाच्याची पत्नी हयात असेपर्यंत असा करार कीं, दत्तकानें इस्टेटीची काहीं गडबड करूं नये ! * गतानुगतिकी लोको न लोकः पारमार्थिक:’ दुसरें काय ? वर दत्तकपुत्र घेण्यास मनुस्मृतींतील जीं दोन कारणें सागितलीं त्यापैकीं पहिल्याचा विचार केला. त्याच लोकात सागितलेल जें दुसरें कारण म्हणजे* नामसंकीर्तन ? तें तरी कितपत यथार्थ आहे तें पाहूं. परंतु तत्पूर्वी वाचकास एवढे कळविणें इष्ट आहे, कीं गेल्या खेपेस ज्याप्रमाणे एका हेतूचे आम्हीं अयथार्थत्व दाखविलें, त्याप्रमाणे या दुसच्या हेतूचाही धर्माशीं काहीं एक संबंध नसून तो फक्त व्यावहारिक आहे; हा लोक सोडून गेल्यानंतर, परलोकात प्रत्येक + मनुः-** माता पिता वा दद्याता यमाद्भः पुत्रमापदि ”