पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rく。 लो० टिळकांचे केसरीतील लेखं आहे तें कांहीं असल्या बाह्य गुणांकरितां नव्हे. न्यायमूर्ति हे मार्मिक लेखक, चांगले वक्ते, उत्तम विद्वान्, अलौकिक बुद्धिमान्, जबर विद्याव्यासंगी, असाधारण कल्पक आणि सरळमनाचे व शांत स्वभावाचे होते हें सर्वोस महशूर आहे. पण कमलाची खरी योग्यता ज्याप्रमाणें पाकळ्यांच्या आकारांत, रंगात किंवा मार्दवांत नसतां त्याच्या सुगंधीपणात असते, तद्वत् माधवरावजींच्या खच्या लोकप्रियतेचे व मोठेपणाचे बीज ज्यांस पाहणें आहे त्यानें वरील गुणांखेरीज दुसच्या कंांहीं गोष्टींचा विचार केला पाहिजे. हा विचार केोणता हें सांगण्यापूर्वी माधवरावजी पुण्यास पहिल्यानें जेव्हां आले तेव्हां पुणे किंवा महाराष्ट्र याची काय स्थिति होती याचे थोडक्यांत निदर्शन केले पाहिजे. एक राज्य जाऊन दुसरे राज्य कायम होईपर्यंत मध्यंतरीं जेो काल जातो तो राष्ट्राच्या अभिवृद्धीस पुष्कळ प्रकारें प्रतिबंधक असतो, हें ऐतिहासिक तत्त्व सुप्रसिद्ध आहे. सन १८२० पासून सन १८७० पर्यंत महाराष्ट्र देशाची स्थिति अशाच प्रकारची होती. ज्या पुर्णे शहरात नानाफडणीसासारख्या मुत्सद्दयानी काहीं वर्षे वास्तव्य करून मराठी राज्याचा गाडा हाकला व जेथे पेशवाईची अखेर होईपर्यंत मुत्सद्दी व शूर पुरुषाची परंपरा कायम होती तेथे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सर्व बाबतीत बहुतेक प्रेतकळा आली होती असें म्हटलें असतां त्यात अतिशयोक्ति होणार नाहीं. ज्या सरदार घराण्यातील पुरुषांनीं पेशवाईत मोठमोठीं कार्मे केलीं होतीं त्याच्या वंशजास इंग्रज सरकारने पेन्शन घेऊन स्वस्थ बसण्यास सांगितलें असल्यामुळे नवीन राज्यव्यवस्थेच्या बरेवाईटपणाबद्दल विचार करण्याचे त्याचे कुलत्रत त्यानीं सोडून दिले होतें. देशाचे पुढारीच असे कर्तव्यपराङ्मुख झाल्यावर गरीब रयतेची स्थिति कशी झाली असेल हें सांगावयास नकोच. टोपीवाल्याची राज्य करण्याची शिस्तवार रीत, चेोहेंौकडे त्यानें घालून दिलेली कायद्याचीं बंधनें, जमीनपाहणी, आगगाड्या, तारायंत्रे, शाळा, पोस्ट ऑफिसें वगैरे राज्यव्यवस्थेच्या अपूर्व थाटार्ने लोक दिपावून गेल्यासारखे झाले होते. त्यातून बंडवाल्यांचा पराभव झाल्यानंतर तर इंग्रजी राज्याची अधिकच छाप बसली गेली. जुन्या सरदार घराण्यांतील पुरुषांस राजकारणांत पडण्याची जरूर नसल्यामुळे त्याच्या अंगचे गुण लुप्तप्राय झाले, व पुणें पाठशाळेतून तयार झालेले नवीन विद्वान् सरकारी नोकरीत आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या मानांतच दंग होऊन राहिले. जी पुण्याची तीच सगळ्या महाराष्ट्राची स्थिति होती. माधवरावजी पुण्यास येण्यापूर्वी येथील विश्रामबाग कॉलेज किंवा पूना कॉलेजमधून बुद्धिवान् व विद्वान् मंडळी तयार होऊन बाहेर पडली नव्हती असे नाही, पण वर निर्दिष्ट केलेल्या अनेक कारणांमुळे राष्ट्रामधील चळवळ अगदीं बंद पडून गेली होती व कोणास आपण पुढे काय करावें हें सूचत नसून आपली हल्लींची स्थिति बरी किंवा वाईट हेही कळत नव्हतें. ज्या प्रांतांतील लोकांनीं एकदा मराठी राज्याचा गाडा हाकला होता त्यांतील पुढाच्यांच्या वंश