पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. न्या. महादेव गोविंद रानडे RくR न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे यांच्या मृत्यूची वार्ती ऐकून हिंदुस्थानांतील, महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यांतील लोकांस आपल्या घरचाच एक कार्यकर्ता पुरुष गेल्याइतकें दुःसह दु:ख हेोईल व निदान कांहीं कालपर्यंत तरी या दुःखदायक बातमीनें त्यांचे भान नाहीसें होईल यांत शंका नाहीं. मनुष्याचे जीवित नश्वर आहे वगैरे तत्त्वज्ञानाचे विचार कितीही डोक्यांत घोळत असले तरी वैभवानें, बुद्धीनें, कर्तृत्वार्ने किंवा विद्वतेनें ज्या थेोर गृहस्थांनीं राष्ट्राचा कार्यभार उचलून पुढाकार घेतलेला असतो त्यांच्या मृत्यूनें कांहीं कालपर्यंत तरी जग शून्यवत् भासणें अगदीं स्वाभाविक आहे. माधवरावजीचे चरित्र दुसरीकडे सविस्तर दिले आहे त्यावरून कॉलेजांत असतांना त्यांच्या विद्वतेचा लौकिक कसा वाढला होता, पुढे नोकरींत त्यांचा प्रवेश कसा झाला, तेथे त्यांस कोणकोणते मान मिळाले व अखेरीस हायकोर्ट जज्जाच्या जागेपर्यंत त्यांची मजल कशी पोहोंचली वगैरे गोष्टी वाचकांस कळून येतील. अलौकिक बुद्धिमत्ता, दीर्घ व सतत व्यासंग, देशाबद्दलची खरी कळकळ, विद्यार्जनाचे स्वाभाविक जडलेलें व्यसन, अचूक कल्पकपणा वगैरे अनेक गुणांनी माधवरावजींचे चरित्र बोधप्रद असून महत्त्वाचे झाले आहे. याखेरीज राजदरबारी व लोकात त्यास जेो वेळेोवळीं मान मिळत गेली व लोकांची आणि सरकारची जी कामगिरी त्यांनीं बजाविली तीहि कांहीं साधारण नाहीं. दुस-या कोणा पुरुषाच्या हातून एवढीच कामगिरी जरी झाली असती तरी देखील त्यांची थोर पुरुषात गणना करावी लागली असती. पण रावसाहेबांकरितां (न्यायमूर्ति हें कृत्रिम नाव सोडून देऊन आम्हा पुणेकर लोकांच्या तोंडीं बसलेल्या त्यांच्या नेहमींच्या नांवानेच येथे उल्लेख करणे आम्हांस अधिक प्रशस्त वाटतें.) आज महाराष्ट्रातील प्रत्येक समजूतदार मनुष्य जो हळहळत आहे तो ते काहीं हायकोर्टचे जज्ज होते, प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष होते किंवा सामाजिक सुधारणेचे अध्वर्यु होते म्हणून नव्हे. या गोष्टी थेोरपणा प्राप्त होण्यास साधनीभूत नाहींत असें नाहीं. पण तेवढयानै माधवरावजींच्या थोरपणाची उपपत्ति लागत नाहीं अशी आमची समजूत आहे. कै. कृष्णशास्री चिपळुणकरांसारखे बुद्धीनें बृहस्पतितुल्य विद्वान् आमच्यांत झाल नाहीत असें नाहीं. प्रार्थनासमाज किंवा समाजसुधारणा यांचे नि:सीम भक्तही माधवरावजींच्या बरोबरीचे किंवा कांकणभर जास्तही असू शकतील. व हायकोर्टात एक नेटिव्ह जज्ज असावयाचा असा सरकारचा जेौपर्यंत विचार आहे तोपर्यंत नेटिव्ह हायकोर्ट जज्जाचीही परंपरा कायम राहील. माधवरावजींकरितां महाराष्ट्रदेश जेो आज हळहळत आहे व आपलें अपरिमित नुकसान झाले असें आज जें प्रत्येकास वाटत

  • (ता. २२ जानेवारी १९०१.) SSAS SSAS SSAS SSAS SSAS SSASAS SS SAAAASAASAASAA AAAS

३५