पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशैोधन. २७९ परंतु पंचांगशोधन कोणत्या त-हेर्ने करावें याबद्दल हल्लीं जीं निरानराळीं मर्ते प्रचलित आहेत त्यांना प्रथमत: निर्णय लागल्याखेरीज नवी पद्धत अमलांत येणें शक्य नाहीं. सायन व निरयण हा भद महाराष्ट्रांत जितका जेोरावला आहे तितका मद्रास व बनारस येथे जेोरावलेला दिसत नाहीं. याचे कारण उघडच आहे कीं, सायन पंचांगाभिमानी कै० लेले, मोडक व दीक्षित हे सर्व महाराष्ट्रांतीलच होते. कसेंही असो, हा भेद ठेवावयाचा कीं नाहीं अथवा त्यांत कांहीं तडजोड निघण्यासारखी आहे आणि असल्यास ती कोणती हा आमच्यामतें पहिला प्रश्न आहे. आमचे स्वत:चे मत निरयण पद्धतीच कायम ठेवावी असें आहे. पण आजचा लेख आमचे मत स्थापित करण्याकरितां लिहिलेला नसून एकंदर विषयाची चची कशी पाहिजे एवढयाकरितां लिहिलेला असल्यामुळे आमच्या मताबद्दल येथे विशेष उहापोह करण्याची जरूर नाहीं. याबद्दल जो काय निर्णय करावयाचा तौ निरानराळ्या ठिकाणच्या विद्वानांनीं जमून बहुमतानै केला पाहिजे. या प्रश्नाचा निर्णय निरयणतर्फेचा झाला तर दुसरा पक्ष अयनांश किती मानावयाचे हा आहे. २२ अयनाश मानेले असतां ग्रहलाघवोक्त पूर्वीचीं पंचांगें कायम ठेवून नव्या शोधामुळे ज फेरफार करावयाचे तेवढेच आजपासून पुढे करावे लागतात. मागची सर्व फिरवाफिरव करण्याची जरूर नाहीं, हा त्यापासून एक मोठा फायदा आहे. उलटपक्षी शके ४९६ च्या सुमारास रेवतीचा भेग शून्य मानून तेव्हापासून जे नवीन गणिताप्रमाणें अयनांश येतात ते घ्यावे असें म्हणणे आहे. अयनांश कमी जास्ती मानल्यानें संक्रांत व अधिकमास यांत फरक पडण्याचा संभव आहे. करिता या प्रश्नाचाही कांही निकाल झाल्याखेरीज सामान्य लोकांची नवीन पंचांगासंबंधानें ग्राह्यताबुद्धि स्थिर होणार नाहीं. हा अयनाशा ना वाद बिकट आहे असें नाहीं, व त्याचा अखेर निकाल लागल्यावर तिसरा प्रश्न ग्रंथासंबंधाचा होय. ज्या रीतीनें पंचांग करावें असा अखेर निकाल होईल त्याप्रमाणें नवीन करणग्रंथ होऊन ती ग्रह्लाघवाऐवजीं सर्वत्र प्रचारांत आणण्याची तजवीज झाली पाहिजे. अर्थात् हा ग्रंथ तयार करविणें, तो छापणे व त्याच्या पठपाठणाचा सर्वत्र प्रचार करविणें या तिन्ही गोष्टींकडे पंचांग सुधारणा करणारांनीं लक्ष दिलें पाहिजे. रा. रा. व्यंकटेश बापूजी केतकर यांनीं हल्लीं जो ग्रंथ केला आहे त्याचा या कामीं चांगला उपयोग होईल यांत शंका नाहीं. किंबहुना एक प्रकारें हा ग्रंथ झाल्यामुळेच पंचांगशोधनाचे ३०॥३५ वर्षापूर्वीचे स्वरूप जाऊन त्यास हल्लींचे स्वरूप प्राप्त झाले आहे असे म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. वरील गोष्टी अमलांत कशा आणाव्या हा सर्व प्रश्नांपैकीं मुख्य प्रश्न आहे. कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याकरेितां दहा पांच विद्वान् लोक एके ठिकाणीं जमले म्हणजे सर्वानुमतानें नाहीं तर बहुमतानें कांहीं तरी निकाल लागल्याखेरीज राहत नाहीं. पण सर्व विद्वान् लोकांस एकेठिकाणीं कोणी, कोठे व कसे गोळा