पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R৩৫ लो० टिळकांचे केसरींतील लेख होण्याचा संभव आहे, म्हणून तत्पूर्वी याबद्दलचे विचार प्रसिद्ध केले आहेत. दरभंगाचे महाराजांसारख्यांनी ही गोष्ट मनावर घेतल्याखेरीज शुद्ध पंचांगे सर्वत्र प्रचारांत आणण्याचा उद्योग होणे शक्य नाहीं हें उघड आहे. कारण हें काम ब-याच खर्चाचे व दगदगीचे असून शिवाय सर्व हिंदुस्थानभर ज्या संस्थानिकाचे वजन आहे अशा पुढायानें हें हातीं घेतल्याखेरीज निरनिराळ्या प्रांतातील लोकमतही त्यास अनुकूल व्हावयाचे नाहीं. याकरितां भारतधर्ममहामेडलाचे अध्यक्ष दरभंगाचे महाराज ह्यांनीं या प्रश्नाकडे पूर्ण लक्ष देऊन त्याचा कांहीं तरी निकाल लावावा अशी त्यांस आमची विनंति आहे. या विषयांवरील पूर्वीच्या निबंधांत हल्लीं जीं नवीन पंचांगें छापलीं जातात त्यामध्ये कोणत्या प्रकारचे मतभेद आहेत हें सांगितलेंच आहे. ग्रहलाघवावरून केलेलीं जुनी पंचांगें दृक्तुल्य होत नाहींत ही गोष्ट आतां बहुतेक सर्वमान्य आहे. व जुन्या पंचांगांतून कांहीं तरी सुधारणा झाली पाहिजे असेंही सवाँस वाटत आहे. सारांश, जुलीअस सीझर किंवा पोपग्रेगरी यांनी युरोपांतील पंचांगें सुधारलीं तेव्हां सदर पंचांगाची जी स्थिति होती तीच सध्यां आमची झालेली आहे, युरोपांतील पंचांगाचा जुलीअस सीझरच्या वेळीं जरी थोडासा धर्मकृत्यें करण्याकडे उपयेोग होत होता तरी पुढे त्याचे हें स्वरूप लवकरच नाहीसें होऊन त्यास निवळ व्यावहारिक स्वरूप अालें. पण असे असतांही पंचांगशोधनाची जर युरापांत जरूर पडली तर ज्या देशांत धर्म व व्यवहार हीं दोन्हीही पंचांगाधीन आहेत तेथे पंचांगशोधनाची विशेष जरूर आहे हें सागावयास नकोच. धर्मकृत्यें स्वत: करावयास नकेोत व लोकांनीं कशाही केलीं तरी ज्यास चालतात अशा कांहीं गृहस्थांचे मत निराळे पडून इग्रजांचेच तारीख-वार पंचांग आपण घेतलें म्हणजे झाले असे म्हणणारे आमच्यांतही काहीं गृहस्थ निघतील, नाहीं असे नाहीं; किंबहुना कित्येकांस हा खटाटेोपच रिकामा वाटेल. परंतु अशा गृहस्थांस भवभूतीनें म्हटल्याप्रमाणें “ तां प्रति नैष यत्नः ” एवढे उत्तर बस आहे. हिंदु ज्योतिष प्राचीन असून त्याची परपरा कायम राहिली पाहिजे असा ज्यास अभिमान आहे, किंबहुना आमच्या प्राचीन विद्यांत जरूर तेवढी सुधारणा करून त्या अस्तित्वात ठेवणें हें हिंदु या नात्यानें ज्यास आपलें कर्तव्य वाटत आहे, अथवा हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें प्रत्यही आम्हांस ज्या क्रिया कराव्या लागतात त्या होईल तेवढ्या कालमानानें बिनचूक झाल्या पाहिजेत असें ज्यांस वाटत आहे त्यांच्याचकरित हा उद्यम आहे. याच उद्देशानें वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य वगैरे ज्योतिषशास्रावर नवीन ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त झाले होते, व कै० बापुदेवशास्त्र्यांसारखे विद्वान् गृहस्थही हाच हेतु मनांत धरून नवीन पंचांगें काढण्यास प्रवृत्त झाले. तेव्हां याच्या उपयुक्ततेबद्दल कांहीं थोड्या लोकांस जरी शंका असली तरी एकंदर समाजास ही गोष्ट हितावह असून जरूरीची आहे हें उघड आहे.