पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशोधन. Rও৩ असता तर त्यास सहज कळण्यासारखी होती. परशरामभाऊ पटवर्धन यांनीं आपल्या विधवा मुलीचे लग्न करण्याकरितां केलल्या खटपटीचे उदाहरण न्यायमूतींनी अनेक वेळां सांगितलेले आहे. पण या गोष्टीस दंतकथेखेरीज कांहीं पुरावा आहे की काय याचा मात्र अद्याप कोणास पत्ता नाहीं. पेशव्यांच्या रेजनिशींत हा मजकूर नाहीं हें न्यायमूर्तीच कबूल करतात, आणि पटवर्धनांच्या दसरांतही याचा पत्ता नाही असें कै. श्री. बापूसाहेब कुरुंवाडकरांसारख्या शेोधक अशा त्या घरण्यांतील पुरुषाचे आणि रा. रा. वासुदेव शास्त्री खरे यांचे म्हणणें आहे. ही गोष्ट अशी आहे कीं, त्याबद्दल त्या वेळीं बरीच चची झाली असली पाहिजे. अशा गोष्टींबद्दल पेशव्यांच्या रोजनाम्यांत किंवा पटवर्धनी दप्तरांत जर दाखला नाहीं, तर तीच गोष्ट पुनः पुन: समाजापुढे विधवाविवाहाच्या समर्थनार्थ मांडल्यान विधवाविवाहपक्षास कांही बळकटी येते असें आम्हांस वाटत नाहीं. मग तत्पक्षीस न्यायमूर्तीसारख्या विद्वानांस पेशवाईतील रेजिनाम्यांचा सारांश देतां येत नाहीं. त्यांत नसलेली अप्रस्तुत गोष्ट मध्येच सांगणें इष्ट वाटत असल्यास त्याचे कारण अशा प्रकारची संवय हेंच होय असें म्हणावें लागर्त. ही संवय काहीं बरी नव्हे असें म्हटले असतां निबंधकाराच्या व्यापक विद्वतेस काहीं कमीपणा येतो असें आम्हांस वाटत नाहीं. ज्या गोष्टीस पुरावा नाहीं ती नेहमींच लंगडी रहावयाची, मग ती विद्वानांच्या मुखातून बाहेर पडो किंवा आविद्वानांच्या पडी. प्रस्तुतची गोष्ट अशाच प्रकारची आहे. ती गोष्ट महत्त्वाची आहे यांत शंका नाहीं. पण तिला पेशव्यांच्या दप्तरात किंवा पटवर्धनी दप्तरांत जर कांहीं आधार मिळत नाहीं असें आम्हांस माहीत आहे तर निदान आणखी पुरावा मिळपर्यंत तरी त्या गेोष्टीचा प्रमुखत्वानें कोठेही उल्लेख करणें बरोबर नाहीं असें आम्इास वाटतें. & o ༤་། %पन्वागशाधन. महिन्यादीडमहिन्यापूर्वी या विषयावर जेो एक लेख लिहिला होता त्यांत गेल्या ३५ वर्षात पंचांगशोधनाबद्दल मुंबई, मद्रास आणि बनारस वगैरे ठिकाणीं जी खटपट झाली तिचे थोडक्यांत स्वरूप सांगून यासंबंधानें जास्त उद्योग करण्याचा आतां काल आला आहे असे लिहिलें होते. पण हा उद्योग कोणत्या दिशेनें करावा वगैरे गोष्टींचा विचार करणें राहिलें होतें तो आज करण्याचा इरादा आहे. आजच हा विषय हातीं घेण्याचे दुसरे कारण असें कीं, ऑगस्ट महिन्याच्या ८ पासून १२ तारखेपर्यंत दिल्ली येथे भारतधर्ममहामडळ नावाच्या सभेची यंदाची बैठक घ्हावयाची आहे, व तेव्हां दरभंगाचे महाराज हे अध्यक्ष स्थान स्वीकारणार आहेत. सदर सभेत या प्रश्नाचा विचार होऊन काहीं निकाल

  • (केसरी ता. १७ जुलै १९००.)