पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेशवाईतील कारभार, रीतरिवाज आणि नीतिमता. २७३ ఫి त्यांत रोजची हकीकत जेव्हांच्या तेव्हां टिपली असल्यामुळे ती अधिक विश्वसनीय आहे. या रेजिनाम्यांचा थोडक्यांत सारांश देणें कठीण आहे; तथापि त्यांतील मुख्य मुद्याची गोष्ट ही कीं, त्या वेळीं शिबेदी, आरमार, न्यायमुनसबा, जमाबंदी, जातीजातींतील तंटे वगैरे सर्व प्रकारचीं कार्मे शिस्तवार चालत. विद्याखात्याचाही यांत समावेश होत असून विद्येच्या उत्तेजनार्थ मोठी रक्कम खचीं पडत असे. उघडच आहे कीं, एवढ्या मोठ्या राज्याचा बंदोबस्त अशा शिस्तीखेरीज कधीही राहावयाचा नाहीं. आगगाडी, तारायंत्र वगैरे इंग्रजी राज्यांतील नवीन सुधारणेची दोन तीन खातीं सोडून दिलीं तर बाकी सर्व खातीं पेशव्याच्या वेळीं व्यवस्थित रीतीनें चालत असत, व मीठ, अबकारी, खानेसुमारी वगैरे आपणांस हल्लीं नव्या वाटत असलेल्या गोष्टीही पेशव्यांच्या वेळीं प्रचारात होत्या असे याँ दप्तरावरून दिसून येतें; व न्या. रानडे यांनी त्यांतील गोषवारा प्रसिद्ध केला याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. अशा प्रकारें शिस्तवार चाललेलें राज्य एकदम नाहींसें कां व्होर्वे हा प्रश्न मोठ्या महत्त्वाचा आहे व त्यासंबंधानें न्या. रानडे यांनी आपले विचार निबंधाच्या आरंभीं दाखल केले आहेत. शिवाजीनें घालून दिलेली राज्यपद्धत सुटली, सरदार प्रबळ झाले, खुद्द पेशव्यांचाच कित्ता गिरविण्याची इतरांस साहजिक बुद्धी झाली, जेातीमत्सर वाढून मराठे सरदारांपेक्षां ब्राह्मण सरदारांस विशेष महत्त्व आले, आणि अखेरीस नीतिमतेचाही उहास झाला, त्यामुळे पेशवाई लयास गेलीं असें न्यायमूर्तीचे म्हणणे आहे. यांपैकीं कांहीं गोष्टी बरोबर आहेत; पण प्रमुख सरदारांमध्ये तंटे होण्यास जातेभेद कारण झाला असावा असें जें न्यायमूर्तीनीं सांगितलें तें ऐतिहासिक परीक्षणाच्या दृष्टीनें यथार्थ नाही अशी आमची समजूत आहे. या प्रश्नाचा येथे सविस्तर विचार करणे अशक्य आहे. तथापि आम्ही एवढेच सांगतों कीं, दिल्लीच्या मुसलमानी राज्याच्या उहासाकडे न्यायमूर्तीनीं जरा नजर दिली असती, तर पेशवाईच्या उहासाची कारणें सागतांना जातिभेदास त्यांनी इतकें महत्त्व दिलें नसतें. मोंगल बादशाहीच्या अखेरीस दक्षिण, गुजराथ, अयोध्या, बंगाल येथील निजाम, सरसुभे अथवा नबाब हे ज्याप्रमाणें जातिभेद नसतांही स्वतंत्र झाले, तद्वतच पेशवाईची अवस्था झाली हें माँगलाईच्या व पेशवाईच्या -हासाची तुलना केली असतां सहज कळून येण्यासारखें आहे. शिंदे, होळकर, गाईकवाड यांच्या ठिकाणी ब्राह्मण सरदार असते तर पेशवाई अधिक दिवस टिकली असती असें आम्हांस वाटत नाहीं; व याचा कोणास प्रत्यय पाहिजे असल्यास दक्षिणेतील पटवर्धन आदिकरून ब्राह्मण सरदारांनीं पेशवाईच्या अखेरीस जै वर्तन केलें तें लक्षांत आणलें म्हणजे झालें. पेशवाईचा अंत होण्यापूर्वीच दोन तीन ब्राह्मण सरदारांखेरीज बाकी सर्व इंग्रजांस जाऊन मिळाले होते. सारांश, मुख्य सरकार व सरदार हे एक जांतीचे असोत वा निराळे जातीचे असोत राज्य 酸Y