पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૭૨ लो० टिळकांचे केसरीतील लेख. " " पेशवाईतील कारभार, रीतरिवाज आाणि नितिमत्ता. न्यायमूर्ती रानडे यांचे पेशवाईतील आचारविचार व नीति या विषयावरील व्याख्यान वाचलें असतां पेशवे अगदीं अडाणी होते वगैरे कित्येक लोकांच्या इतिहासाच्या अज्ञानामुळे झालेल्या ज्या समजुती असतात त्या दूर होतील. इंग्रजी राज्यांत डोळ्यांपुढे दिसणारी निरनिराळीं खातीं, त्यांचे अंमलदार, हिशोबी व्यवस्था वगैरे पाहून पुष्कळांस असे वाटतें कीं, पेशवाईत अशा प्रकारची तजवीज नसेल व त्यामुळेच ब्राह्मणी राज्य डबघाईस लागून पुढे अखेरीस त्याचा लय झाला. सारांश, इंग्रज लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी येथे प्रचलित असलेल्या हिंदु लोकांच्या राज्यपद्धति अगदीं कूचकामाच्या होत्या असें ज्यांस वाटत असेल त्यांनीं न्यायमूर्ति रानडे यांचा निबंध अवश्य वाचावा अशी त्यांस आमची शिफारस आहे. या निबंधांतील मतें अथवा निबंध लिहिणारांचे विचार सर्वच आम्हांस मान्य आहेत असें नाहीं; तथापि त्यांत जी माहिती दिली आहे ती संग्रहणीय आहे. पेशवाईत हल्लींच्याप्रमाणें राज्यकारभाराचे सर्व कागदपत्र, हिशोब वगैरे व्यवस्थेशीर ठेवले जात असत. त्यांतून पेशवाईच्या उत्तर भागांत म्हणजे नानाफडणविसाचे कारकीर्दीत तर दप्तराची व्यवस्था उत्तम झालेली होती. राज्यामधील प्रत्येक गांवचा जमाखर्च पुण्याच्या दसरांत सांपडतो इतकेंच नव्हे तर, महाराष्ट्राबाहर शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे सरदारांनी जे प्रांत काबीज केले होते त्यांचेही सर्व जमाखर्च येथील दप्तरांत आहेत. हे जमाखर्च पाहिले म्हणजे राज्याच्या अंतव्र्यवस्थसंबंधानें पेशवे अगर त्यांचे कारभारी, मुत्सद्दी अथवा वकील किती दक्ष असत, व पुण्यांतील हुजुराच्या हुकुमाखेरीज उत्तर हिंदुस्थानांतल्याही कांहीं किरकेोळ बाबी घडणें किती अशक्य होतें हें चांगलें नजरेस येईल. सर्व खात्यांत सर्व प्रकारचा बंदोबस्त शिस्तीनें आणि नियमांनीं चालत होता. न्या. रानडे यांच्या व्याख्यानांतील विशेष महत्त्वाचा भाग इाच होय. पेशव्यांचे दसर हल्लीं सर्व उपलब्ध नाहीं. तथापि इनामकमिशनचे वेळीं त्याचा बराच भाग इंग्रजसरकारानें इनामें, जहागिरी, वगैरेची पुढील व्यवस्था लावण्याकरितां संग्रह करून ठेवलेला आहे. हें दप्तर पाहाण्याची सरकारांतून परवानगी मिळून त्या दप्तरांतील कांहीं निवडक कागदपत्र छापण्यास परवानगी मिळालेली आहे व त्याचीं दोन पुस्तकें सातारा येथे छापूनही झाली आहेत; व अशा तन्हेचीं आणखी १० ॥ १५ पुस्तकें होतील असा अदमास आहे; असो. न्या. रानडे यांनीं जो निबंध वाचला त्यांतील माहिती पेशवाईच्या रोजनाम्यावरून घेतली होती. या रोजनिशीचे एकंदर सुमारें वीस बावीस हजार कागद आहेत व

  • (केसरी ता. १९ जून १९०० ).