पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R৩০ लो० टिळकांचे केसरींतील लेख या गोष्टीचा उल्लेख करण्याचे कारण एवढेच कीं, ज्योतिषशास्राची आणि धर्मशास्राची परंपरा व क्रम भिन्न आहेत हें वाचकांच्या लक्षांत यावें, ज्योतिष हैं वैद्यकाप्रमाणें प्रत्यक्ष शास्त्र आहे. चेद्र व सूर्य हे या शास्त्राच्या सत्यतेचे साक्षीदार होत व हे साक्षीदार केोणाहि ज्योतिषाच्या,राजाच्या किंवा इतर मनुष्याच्या तंत्रानें वागणारे नाहींत हा काटतील साक्षीदारांत आणि यांच्यांत मोठा ध्यानांत ठेवण्यासारखा भेद आहे. चंद्रसूर्याची गणिताशी जुळत नसल्यास गणितास मूळ आधारभूत घेतलेलीं मार्नेच फिरविलीं पाहिजेत. चेद्रसूर्य फिरावयाचे नाहीत. ग्रहगतींचाही मार्ने इतकीं सूक्ष्म आहेत कीं नक्की अद्यापही कळलेली आहेत कीं नाहींत याची वानवाच आहे. हजारों वर्षीच्या वेधानों ही मार्ने अधिकाधिक सूक्ष्म व बरोबर करितां येतात हें तत्त्व आमच्या जुन्या ज्योतिषांसही मान्य होतें व बापूदेवशास्री, केरोपंत आदिकरून नव्या ज्योतिष्यांसही मान्य आहे हें वर दाखविलेंच आहे. सिद्धान्तज्योतिष्यांची याबद्दल एकवाक्यता असल्यावर केवळ पंचांगज्योतिषांची त्यास कांहीं इरकत असल्यास त्यांत काहीं अर्थ नाहीं. पंचांगाचे उपयेोग दोन आहेत, एक व्यवहाराकरितां व एक धर्मशास्राकरिता. पाश्चिमात्य राष्ट्रांतील पचांग केवळ व्यवहाराकरितां असतें. व्यवहार म्हणजे नुसते दिवस मोजणें नव्हे तर अफाट समुद्रावर दुसरें कांहीं साधन नसतां तारे व ग्रह इत्यादिकांचे उदयास्त किंवा स्थिति आणि गति यावरून कित्येक दिवसपर्यंत गलबताच्या मार्गाचा निर्णय करणे व अखेरीस इष्ट स्थलीं गलबत नेणें याचाही त्यांत समावेश होतो. इंग्रजति नॅटिकल अलमनॅक म्हणून जें पंचांग तयार होतें तें याचकरितां होत असतें. हें पंचाग इंग्रज लोक फ्रेच लोकानीं केलेल्या ग्रंथांच्या आधारें करितात. यावरून इंग्रज लोकांतही याबद्दलचा कांहीं वृथा आभिमान नाहीं हैं उघड दिसून येते. केरोपंत, बापुदेवशास्त्री, रघुनाथाचार्य यांची किंवा सायनवाद्यांचीं पंचांगें नॅटिकल अलमर्नेकवरूनच केलली असतात. सायन किंवा निरयण, आणि निरयणपक्षी अयनाश किती मानावे एवढाच काय तो याचा आपापसात भद आहे. तात्पर्य, गेल्या दोन शतकांत युरोपियन ज्योतिष्यांनीं सूक्ष्म वेधावरून मिळावलेलें ज्ञान जुन्या आर्यज्येोतिषग्रंथात सामील करून ब्रह्मगुप्तानें म्हटल्याप्रमाणें “खिळखिळे झालेले ” आपलें जुनें ज्योतिष पुनः व्यवस्थित केले पाहिजे याबद्दल सर्वोची एकवाक्यता आहे. आज जी लेख आम्हीं लिहिला आहे ती कोणत्याही विशिष्ट पक्षाचे समथैन करण्याकरितां लिहिलेला नाहीं. केरोपंती पंचांग निघाल्यापासून नव्या व जुन्या पंचांगांत कोणते फेरफार झाले आहेत हें सांगण्याचाच आमचा इरादा होता. हीं नवीन पंचांगें अधिक दृक्तुल्य आहेत याबद्दल २५॥३० वर्षाच्या अनुभवावरून आज मित्तीस पुष्कळांची खात्री झाली आहे. नवीन पद्धतीचीं पंचांगें तयार करण्यास केरोपंत आणि बापूदेवशास्री याचीं कोष्टकें किंवा सारण्या आहेत, पण ग्रह्लाघवासारख्या त्या सोप्या नसल्यामुळे तशा पद्धतीच्या ग्रंथाची उणीव