पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० लो० टिळकांचे केसरींतील लेख यांत शिवाजी राजांचा जन्मशक “ १५४९ क्षयनाम संवत्सरे, माहे वैशाख शु॥ ५, चेद्रवासरी” असा लिहिला आहे; पण शके १५४९ त संवत्सराचे नांव प्रभव येतें, क्षय येत नाहीं; आणि सोमवारीं उदयास चतुर्थी असून रात्रौ पंचमी लागते. ( १० ) भारतवर्ष यांत शिवछत्रपतीची ९१ कलमी बखर छापली आहे. तींत कलम १५ यांत शिवाजीराजे यांचा जन्मशक शके** १५५९ क्षयनाम संवत्सर, वैशाख मास, शुद्ध ५, चेद्रवारी ” असा लिहिला आहे. १५५९ ही चूक असावी त्या ठिकाणीं १५४९ पाहिजे. म्हणजे मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरींतील आणि ही तीथ एकच येते. अर्थात दोहॉवर आक्षेपही एकच येतात. (११) भारतवर्षात छापलेली ** छत्रपतींची वंशावलिबद्ध यादि ” यांतही ** शके १५४९ वैशाख शुद्ध ५ ’ अशी तीथ दिलेली आहे. पण वार वगैरे घातला नाहीं, तेव्हां पडताळा पाहाण्यास जागा नाहीं. (१२) भारतवर्षात न्यायशास्री पंडितराव यांच्या बखरींत शिवाजीराजे यांचा जन्मकाल ** शके १५४९ प्रभव '? एवढाच लिहिला आहे. (१३) भारतवर्षातील पंतप्रतिनिधीच्या बखरींत शिवाजीराजे यांची जन्मतीथ “ शके १५४९ प्रभवनाम संवत्सरे, वैशाख शुद्ध १५, इंदुवार” अशी दिली आहे. येथे ** शुद्ध १५ ?’ ही हस्तदोषानें शु॥५ ऐवजीं पडलेली दिसते. वैशाख शुद्ध १५ स चेद्रवार येत नाहीं. यावर भारतवर्षकार अशी टीप देतात कीं, ** शिवाजीची जन्मतीथ आजपर्यत वैशाख शुद्ध ५ आणि २ अशी आढळांत आली. या बखरीत १५ आहे, व एका यादींत तृतीया आहे. बहुमताने द्वितीया कायम झालेली आहे ?? * व्हेोटे ? घेऊन तीथ कायम करण्याची ही रीत अपूर्व आहे ! (१४) काव्येतिहाससंग्रहांत छापलेलें सभासद कृत शिवछत्रपतींचे चरित्र रा. सा. काशिनाथ नारायण साने यांनीं निराळे प्रसिद्ध केले आहे. त्याचे परिशिष्ट ३ यात रा. रा. साने यास उपलब्ध झालेली शिवछत्रपतीची म्हणून एक लग्नकुंडली दिली आहे ती: या जन्मकुंडलींत उचचेि ग्रह सहा न येतां चारच म्हणजे गुरु, मंगळ,