पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीमहाराजोची जन्मतिथि, २५९ गुरुवार येत नाहीं, शनवार येतो; व नक्षत्रही भरणी येतें. मल्हारावांची बखर शिवाजीचे नंतर सुमारें १३० वर्षांनी लिहिलेली आहे. (४) रायरीची बखर प्रो. फारेस्टसाहेबांच्या सिलक्शनमध्यें प्रसिद्ध झालली. यांत आरंभीं शिवाजीचा जन्म शक १५४८ लिहिला आहे. पण बखरीच्या सरतेशेवर्टी ** शिवाजी शालेवाइन शके १५४९ वैशाखमासीं जन्मले, आणि शके १६०२ सालीं रायगड येथे वारले” असें लिहून पुढे “त्यांचे आयुष्य ५३ वर्षे पैकीं गादीवर १७ व पुंडाईत ३६ गेलीं !” असे लिहिले आहे. दादोजी कोंडदेव वारले तेव्हां शिवाजी १६ वर्षाचे होते असाही मध्यें लेख आहे. यांत तिथीचा कोठेही उल्लेख नाही. पण रा. रा. राजवाडे असें लिहितात कीं,. त्यांजवळ असलेल्या रायरीच्या बखरीच्या प्रतींत शिवाजीचा जन्म ** शके १५४८, क्षयनाम संवत्सर, वैशाख शुद्ध ५, चेद्रवार ” असा दिला आहे. गणितानें या दिवशीं सोमवार येत नाहीं, गुरुवार येतो; व नक्षत्र आद्र येतें. रायरीच्या बखरीचे इंग्रजी भाषांतर इ० सन १८०६ त झालेले आहे हेही लक्षात ठेविले पाहिजे. (५) काव्येतिहास संग्रहकारांकडे धारहून पाठविलेल्या एका जंत्रींत शिवाजींचा जन्म शके १५४९, प्रभव, वैशाख शुद्ध ५, सोमवार म्हणून दिला आहे. सोमवारीं संध्याकाळीं पंचमी लागते असें गाणतावरून कळते. या दिवशीं नक्षत्र रोहिणी असार्वे असे वाटतें असें रा. राजवाडे म्हणतात. पण गणितार्ने मृग किंवा आद्री निघतें. रोहिणी निघत नाहीं. तिथिानर्णयाचे कामीं नक्षत्र जमेस धरणें असल्यास गणितानें रोहिणी पंचमीस येणें शक्य नाहीं हा वैशाख शुद्ध पंचमीवर एक मोठाच आक्षेप आहे. (६) बडोदें येथे छापलेल्या ** श्री शिवदिग्विजय ” नांवाच्या बखरीत श्रीशिवाजीची जन्मतीथ शके १५४९ प्रभव, वैशाख शु॥ २, गुरुवार, रोहिणी नक्षत्र अशी दिली आहे. प्रण शुद्ध द्वितीयेस गुरुवार किंवा रोहिणी नक्षत्र येत नाहीं हे वर सागितलेंच आहे. यासंबंधानें या बखरींत पुरातन म्हणून तीन छोक दिले आहेत. त्यांचा विचार पुढे येईल. ही बखर शके १७४० त लिहिलेली आहे असें मागे केसरींत आलैच आहे. शके १७४०म्हणजे सन १८१८; तथापि रा. राजवाडे लिहितात त्याप्रमाणें हीत माहिती जुन्या कागदपत्रांवरून घेतली आहेसे दिसतें. (७)बडोद्यास छापलेल्या ** श्रीशिवप्रताप ” या बखरींत शिवाजी महाराजांचा जन्मकाळ ** शके १५४९ रक्ताक्षीनाम संवत्सर ' असा लिहिला आहेपण शके १५४९ सालीं संवत्सर प्रभव येतो; आणि रक्ताक्षी संवत्सर शके १५४६ सालीं पडतो. (८) पुरुषोत्तम कविकृत संस्कृत शिवकाव्यात शिवाजीची जन्मतीथ नाहीं. (९) काव्येतिहासांत छापलेली “ मराठी साम्राज्याची छोटी बखर ”