पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Rいく लो० टिळकांचे केसरींतील लेख असून त्यांची चर्चा रा. रा. राजवाडे यांनीं शोधकबुद्धीनें काळजीनें केलली आहे. शिवाजीचे वेळच्या इतिहासासंबंधाने गेल्या वर्षात प्रसिद्ध झालेलें महत्त्वाचे असें हें एकच पुस्तक होय. निरानेराळ्या वादग्रस्त विषयांवर बखर्रातून किंवा अन्यत्र ठिकाणीं मिळालेली माहिती एकत्र गोळा करून ती परस्परविरोधी असल्यास त्यांपैकीं खरी कोणती व खोटी कोणती याचा निर्णय करण्याचे काम किती नाजूक आहे हें रा. रा. राजवाडे याच्या ग्रंथावरून कोणाच्याहि सहज नजरेस येण्यासारखें आहे; व आमची अशी आशा आहे कीं, रा.रा.राजवाड हे मराठयांच्या इतिहासांतील निरनिराळ्या शंकास्थानाचे असेंच परीक्षण करून त्यासंबंधानें योग्य माहिती लोकांपुढे माडण्याचा आपला क्रम पुढेही चालू ठेवतील. रा. रा. राजवाडे याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेंतील पान ४ १ यांत शिवाजीमहाराजांच्या निरनिराळ्या बखर्रात सांपडणाया जन्मतिथि देऊन अखेरीस शके १५४९ वैशाख शुद्ध ५, सोमवार, रोहिणी नक्षत्र ही तिथी विश्वसनीय आहे असें ठरविलें आहे. रा. रा. राजवाडे यांच्या या निकालासंबंधानें आज येथे विवेचन करण्याचा आमचा इरादा आहे. फक्त २७५ वर्षांपूर्वी जन्मास आलेल्या शिवाजीमहाराजाच्या जन्मातेथीसंबंधार्ने बखरींत व जुन्या कागदपत्रांत इतका घोटाळा असावा हें मोठेच आश्वर्य होय. पण वस्तुस्थिति तशी आहे खरी. जुन्या कागदपत्रातून शिवाजीमहाराजांचा जन्मकाल पांच सहा प्रकारें दिलेला आहे व हे काल इतके भिन्न आहेत कीं शक, संवत्सर आणि तिथी यासंबंधानें एकाचा मेळ दुस-याशी पडत नाहीं. महिना मात्र सर्वत्र वैशाख आहे तेव्हां तो बरोबर असावा येवढेच काय ते त्यावरून सत्कृद्दर्शनीं खात्रीनें सांगतां येईल. बाकीच्या बाबतीत नीट चैौकशी करूनच निकाल दिला पाहिजे हें उघड आहे. निरनिराळ्या जन्मातथी व त्यावरील आक्षेप. प्रथमतः निरानराळ्या बखरीतून किंवा जुन्या कागदपत्रांतून कोणकोणत्या तिथी दिल्या आहेत व त्यावर काय काय आक्षेप आहेत तें पाहूं. (१) शिवाजीमहाराजांचा समकालीन व आश्रित भूषणकवी याच्या शिवभूषण-काव्यात महाराजाच्या जन्मतिथीचा उल्लेख नाहीं. ( २ ) त्यानंतर सभासद व चित्रगुप्त यांच्या बखरी. सभासदांची बखर शिवाजीमहाराजाचे देहावसान झाल्यावर १४ किंवा १७ (शके १६१६ किंवा १६१९ ) वर्षाचे आंत तयार झालेली आहे व चित्रगुप्तांनी हीच वाढवून लिहिली आहे. या दोहाँतही जन्मतीथ दाखल केलेली नाहीं. शिवाजीमहाराज व जिजाबाई शहाजीस भटण्यास बेगळूरास गेलीं “ ते समयीं राजियास वर्षे बारा होतीं ” हाच काय तो या बखरीत वयाचा पहिला उल्लेख आहे. (३) तिसरी बखर मल्हारराव रामराव चिटणीस यांची. यांत जन्मतीथ ** शके १५४९, प्रभवनाम संवत्सरे, वैशाख शुद्ध २ गुरुवार ” अशी दिलेली असून पुढे सहा ग्रह उंच पडले असे लिहिले आहे. गणितानें पाहतां या दिवशीं