पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीमहाराजांची जन्मतिथिं. २५७ हा वेदशास्रसंपन्न महामहोपाध्यायांस बिलकूल पसंत नाहीं व कधीं होणारही नाहीं. हायकोर्टाचा हुकूम कायदेशीर असला तर मी मानीन, असें जर कोणी उद्यां म्हणू लागला तर बेलीफ त्यास न जुमानतां त्याच्या घरांतील भांडी जप्त करून खुशाल घेऊन जाईल. आचार्याचे मत तसेंच आहे. श्रींनी केलेली आज्ञा श्रीनीं फिरविल्याखेरीज त्यांस गत्यंतर नाहीं. ही पानसुपारी झाल्यानंतर दुस-या दिवशीं एका पत्नावर आचार्याची सही घेण्याकरितां शुक्लपक्षीय मंडळी त्यांच्या घरीं गेली होती. हें पत्र श्रींकडे जाण्याचे असून त्यात आपण शास्रांप्रमाणें हुकूम द्यावा अशी विनंति केली होती; म्हणजे अर्थात् झालेला हुकूम शास्राप्रमाणे नाही. चतुःशास्त्रांत पारंगत असलेल्या विद्वानास ही कारकुनी कळणार नाहीं असा कित्येक सरदारांचा समज होता, पण आचायाँस लगेच ही मख्खी समजून त्यानीं सही करण्याचे नाकारिलें. तेव्हां शास्त्राप्रमाणे हे शब्द काढून टाकेिले व अखेरीस कशी तरी आचार्याची त्यावर सही करून घेतली. ह्यावरून उघड दिसून येईल कीं श्रीजगद्गुरूंची आज्ञा सशास्र किंवा अशास्र ठरविण्याचा अधिकार आपल्याकडे घेण्याचे जे येथे कांहीं निव्वळ गृहस्थ मंडळींनें बंड माजविले आहे तें आचायांस बिलकूल पसंत नाहीं. कसेंही असले तरी पुनः श्रीकडे जाणें हाच त्यांस मार्ग आहे, असें त्यांनीं निक्षून सागितलें. आम्ही गेल्या अॅकी दिलेली हकीकत अक्षरश: बरोबर आहे; परंतु यासंबंधानें आमच्या सरदार मंडळींस शंका असेल तर ती त्यानीं आम्हांस कळवावी म्हणजे ती आम्ही आचार्याकडे पाठवून त्यांच्याकडून ती मंजूर होऊन आल्यास आपल्या लेखात मोठया आनंदानें दुरुस्ती करू. [ केसरी-ता. ११ आगस्ट १८९६].

  1. asssssssssssssssssssss=|
  • श्रीशिवाजीमहाराजांची जन्मतिथेि.

आज हा विषय हातीं घेण्याचे कारण येत्या सोमवारी रायगड येथे व अन्यत्र होणारा श्रीशिवजयंत्युत्सव हें एक तर खरेच, पण याशिवाय या विषयाकडे लक्ष जाण्यास रा. रा. विश्वनाथ काशिनाथ राजवाड यांनीं नुकतेंच प्रसिद्ध केलेलें ** मराठयांच्या इतिहासाचीं साधर्ने, खेड ४ था ' हें पुस्तकही मुख्यत्वेंकरून कारण झाले आहे. रा. रा. राजवाडे यानीं आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या पुस्तकास १४० पृष्ठांची एक मोठी प्रस्तावना जोडून पुढे पांच ऐतिहासिक ग्रंथ छापलेले आहेत. हे ग्रंथ पेशवाईच्या इतिहासासंबधाचे आहेत. पण प्रस्तावनेंत जे निरनिराळे विषय घेतले आहेत, ते सर्व शिवाजीमहाराजांच्या कारकीर्दीबद्दलचे • (केसरी-ता. २४ एप्रिल १९००), -تیم مس -----------------. م ३२