पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५६ लो० टिळकांचे केसरींतील लेख स्वामीस अर्ज ऊर्फ नोटीस पाठवावयाची ती अशी कीं, तुम्ही विधवाविवाहास परवानगी द्या, नाहीं तर आम्ही हवे तसें वागूं. ही पद्धत बंडाची आहे. सुधारणेची नव्हे,हें आम्ही सांगावयास नकोच. वर सागितलेल्या मेलेल्या बायकेच्या बहिणीशीं लग्न करण्याबद्दल इग्लंडांत जेो कायदा पास झाला त्याच्या हकीगतीवरून आमच्या सुधारकांनीं बराच बोध घेण्यासारखा आहे. हल्लीं समाजाची बरीच अनवस्था होत चालली आहे. राज्यकत्यांच्या कायदेकौन्सिलात लोकाचे पाहिजे तितके प्रतिनिधी नाहीत; व असले तरी विधवाविवाहाच्या कामांत कायद्याने झाले आहे त्यापेक्षा जास्त करिता येईल की नाहीं, व करावें कीं नाहीं याबद्दल बरीच वानवा आहे. तेव्हा अशा स्थितीत समाजाला नियमन करणाच्या ज्या पूर्वीच्या संस्था आहेत त्यापैकी एखादीचे पुनरुजीवन करण्याचा आम्हीं उद्येोग करवा किंवा नाही, हा आपल्यापुढे एक मोटा प्रश्न आहे. परंतु त्याचा व्हावा तसा विचार झाला आहे असे आम्हास वाटत नाहीं. सामाजिक परिषद हे काम करण्यास नालायक आहे हे आम्हीं पूर्वी अनेक वेळा सांगितलेंच आहे. [कसरी-ता. ११ अॅगस्ट १८९६] سمعموتمسامعین، ییس سیجنسیجegsچھ میw यासंबंघाने लिहीत असता गेल्याअंकीं आम्ही येथील शुक्ल पक्षीयांबद्दल जें लिहिले होते त्यास प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या एका कैवान्यानें जो मजकूर प्रसिद्ध केला आहे त्याबद्दल पुन्हा एकवार दोन शब्द सागणें जरूर आहे गेल्या आठवड्यात येथे वे. शा. सं. महामहोपाध्याय गोपाळाचार्य कन्हाडकर हे आले होते. चार चार पाच पाच शास्ने अध्ययन केलेल्या जुन्या शास्रीं मंडळपैकीं वयानें, धिद्वतेनें अथवा स्वभावाने याची बरोबरी करणारे आतां क्वचितच आढळतील. पुनर्विवाहाचा जो येथे मोठा वाद झाला त्यांत सर्वानुमतें यांस सरपंच नेमिले होतें. असो; आचार्य येथे आल्यावर आमची वे. शा. शून्य मंडळी त्याच्याकडे लागलीच खेपा घालू लागली. एकानें त्यास असें सागितलें की, आपण मार्गे शास्रार्थ दिलाच आहे तो येथे भरसभेत सागून धर्मरक्षणाचे श्रेय ध्यावें. शास्री. बुवांनीं ती गोष्ट करण्याची नाकारिली तेव्हां त्यास नुसत्याच पानसुपारीस आमंत्रण केलें. त्यासही गोपाळाचार्य जात नव्हते, पण अखेरीस त्यानीं ती गोष्ट कबूल केली. पुढे पानसुपारी देण्यापूर्वी जीं भाषणे झालीं, त्यात ग्रामण्याचा विषय काढल्ाच, व जवळच्या मंडळींनी शास्त्रीबुवाशी बोलतांना शास्रीबुवास असे सुचविले कीं, श्रीची आज्ञा सशास्र नाहीं तेव्हां तिचा आम्ही कसा अंमल करावा. यावर महामहोपाध्याय यानीं ताबडतोब असा जबाब दिला कीं श्रीची आज्ञा श्रीनींच फिरविली पाहिजे. तात्पर्य, श्रीची आज्ञा सशास्र आहे कीं नाहीं हे ठरविण्याचा व सशास्र असल्यास ती मानावयाची, नाहीपेक्षा नाहीं, हा जो अधिकार येथील वेदशास्रशून्य मंडळीनें आपणांकडे घेण्याचा चालविला आहे,