पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतवर्ष. २५५ कोच्या आप्ताशीं नव-याचा सर्पिङय संबंध येत नाहीं. पण खिस्तीधर्मशास्राप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे आपले व आपल्या बाथकोचें सर्पिड विवाहासारखेच वर्ज धरितात. पैकीं बायकोचे सपिंड निदान बायकोची बहीण तरी विवाह्य असावी अशाबद्दल आज इंग्लंडांत पन्नास वर्षे खटपट सुरू आहे; व पार्लमेंट सभेपुढे याबद्दलच्या कायद्याचा अनेक वेळां मसुदा येऊन तो आजपर्यंत अनेक वेळा नामंजूर झालेला होता. कारण सर्व मिशनरी लोक, म्हणजे हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये असणारे बिशप वगैरे, हे अशा प्रकारच्या विवाहास अनाचार किंवा दुराचार समजत असल्यामुळे प्रतिकूल होते; व त्याच्याप्रमाणेच ब-याच लॉर्डस्चीं मर्ते होती. पाद्री लोकाचे दुसरें असेही म्हणणें होतें कीं, अशा तहेचे विवाह कायदशीर झाल्यानें घरातील नीति बिघडून जाईल. कारण मग एकाद्याची स्री मयत झाली तर त्याच्या मुलाबाळांची काळजी घेण्याकरिता त्याच्या बायकीची बहीण घरात आली तर तिच्याबद्दलची बहीणीची बुद्धि नाहींशी होऊन पुढे एकंदर अनाचार होईल. साराश ज्यू लोकाच्या रितीभाती, बायबलची शास्राज्ञा, इतर देशातील खिस्ती लोकाचे आचार वगैरे यांबद्दल पुष्कळ भवति न भवति, वाद, चर्चा व तंटे दरवळी होत आलेले आहेत. हे तंटे सतत पन्नास वर्षे जेव्हां चालले तेव्हा यंदा अखेरीस या बिलाचे हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये तिसरे वाचन होऊन तें एकदाचे पास झाले. तरीही डयूक ऑफ आर्गाईल, व्हायकाऊंट हॅलीफक्स वगैरे लॉर्डस व बहुतेक बिशप या बिलाच्या विरुद्ध होते. मेलेल्या बायकोंच्या बहिणीशीं लग्न करण्याची परवानगी मिळण्याकरिता जर इंग्लंडसारख्या सुधारलेल्या देशात विवाहसुध रणेच्छु मंडळीस पन्नास वर्षे एकसारखी खटपट करावी लागली तर अमच्यासारख्या देशात पुनर्विवाहाची मेोकळीक दहा वीस वर्षीत मिळाली नाहीं म्हणून सुधारक मंडळीने बंड करण्यास तयार व्हावे ही आश्वर्याची गोष्ट नव्हे काय ? समजा पुढ तोच तोच विषय पुन: पुन: माडणें व त्यांतील लोक शहाणे असेोत वा मूर्ख असेोत, तरी त्याच्याचबरोबर वाद करून एकदां नाही तर दोनदां, दोनदां नाहीं तर चारदा, त्यांची खात्री करून देण्याचा प्रयत्न करणे व अखेरीस बहुमत आपल्यासारखे करून घेऊन आपला हेतु तडीस नेणे हेंच खया सुधारकाचे कर्तव्य आहे. परंतु आमन्या दुर्दैवाने आमच्याकडे जुनें किंवा नवे यांपैकीं कोणीच अशाप्रकारच्या पद्धतीचा अंगीकार करीत नाहीत, पुनर्विवाहाकरिता पंचवीस वर्षामार्गे श्रीशंकराचार्यामार्फत पुण्यास शास्री व गृहस्थ यांची मोठी सभा भरली होती, तिचा निकाल सुधारकास प्रतिकूल झाला. परंतु पुढे तशाच प्रकारें लोकांपुढे हा विषय ठेवून दर दहा वर्षानीं जर पुन: पुनः अशा सभा भरविल्या तर केव्हाना केव्हा तरी पुनर्विवाहास थोडीबहुत मोकळीक मिळेल. पण येवढा खटाटोप करावा कोणी ! एकदां आपल्याविरुद्ध निकाल झाल्यावर इकडे स्वैच्छ वागण्यास मोकळीकच झाली व आतां मजल येथपर्यंत येऊन ठेपली आहे कीं,