पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायमूर्ती रानडे यांची ब्रह्ममीमांसा. २४९ हैं ब्रह्म आहे, मन हें ब्रह्म आहे इत्यादि जीं विधार्ने आहेत तीं पारमार्थिक नसून मार्गोपदेशक आहेत हें ब्रह्मसूत्रभाष्यांत व इतर ठिकाणीं अनेकशः व्यक्त केलेलें आहे. मन, बुद्धि इत्यादि इंद्रियांच्या पलीकड व त्यांना अगेचर ब्रह्मस्वरूप आहे हें “ इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यब्दुद्धेः परतस्तु स: ॥ ' या गीतावचनावरून उघड होतें. अशा ब्रह्माचे ऊर्फे अज्ञे याचे स्वरूप काय आहे हें सागण्याची मोठी मुष्किल आहे. कोणी एका ऋषीस ब्रह्म काय आहे म्हणून विचारले असता तो गप्प वसला त्यांतीलही बीज हेंच. तथापि हें जें कांहीं अज्ञेय तें * आहे ? येवढे मात्न आपणास कळून येतै; व याचमुळे त्याच्या स्वरूपाबद्दल * सत् ’ हें विधान करिता येतें. त्याचप्रमाणें प्रकृतीहून किंवा जड सृष्टीहून ब्रह्माचा भद दाखविण्याकरिता * चित्’ हेंही पण ब्रह्मस्वरूपाचे विधान बरोबर आहे असे म्हटले पाहिजे. येथपर्यंत न्यायमूर्ति रानडे यांचा व अद्वैतवाद्यांचा फारसा मतभेद नाही. मतभद काय तो आनंदस्वरूपाबद्दल आहे. आनंद अनेक प्रकारचे आहेत. मनु ध्याचा, पितरांचा, देवाचा इत्यादि. यांपैकी ब्रह्मस्वरूपाचा आनंद केोणता हाच काय तो मुख्य प्रश्न होय. जगामध्ये जे सुख, समाधान व शाति दृष्टीस पडते तीच अथवा तशा प्रकारचीच शाति अगर सुख ब्रह्मस्वरूपात असावें व पहिल्याची उत्पत्तीही दुसच्यापासूनच झाली असावी असा न्यायमूर्ति रानडे याच्या लिहिण्याचा झोंक आहे; व भक्तिमार्गाच्या दृष्टीने ब्रह्मस्वरूपाची अशा तञ्हेची कल्पना अधिक ग्राह्य आहे या मार्गानें जाणाया लोकास अशा त-हेच्या आनंदस्वरूप ब्रह्माची झटकन ओळख पटून ब्रह्मानंदीं त्याची टाळी लागण्यास सुलभ पडते हें आम्हांसही मान्य आहे, पण तात्त्विकदृष्टया विचार करिता व्यावहारिक सुखदु:खाचा ब्रह्मस्वरूपांत अतर्भाव करणे म्हणजे ब्रह्मस्वरूप मानवी मनेोधर्मीनी व्याप्त अतएव विनाशी आहे असें अप्रत्यक्ष रीतीनें कबूल करण्यासारखे आहे. भक्तिमागांत व वेदांतविचारात जो भद आहे तो हाच; तथापि भक्तिमार्गाचे अखेर पर्यवसान अद्वैतांतही होऊं शकतें हे आम्ही मागे दाखविलेच आहे, सुख दोन प्रकारचे आहे. एक निरानराळ्या विषयांपासून प्रतिकूल वेदनानिवारक व अनुकूल वेदनाजन्य आणि दुसरें सर्वत्र समबुद्धि होऊन प्रसन्नात:करणापासून उत्पन्न झालेलें. भर्तृहरीनें हीं दोन्ही सुखे “ प्रतीकारो व्याधेः सुखमिति विपर्यस्यति जनः” आाणि मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् कॊ दरिद्र: * या दीन चरणात थोडक्यात फार चांगल्या रीतीनें सागितलेली आहेत. यापैकी ज्या लोकाचा ओढा पहिल्या सुखाकडे असेल त्यास ब्रह्मस्वरूपाची कल्पना न्यायमूर्ति रानडे हे सागतात तसल्या प्रकारची आनंदमय होईल. परंतु ज्यास व्यवहारिक सुखाहून भिन्न आनंद आहे असे वाटतें, त्यांच्यामते ब्रह्मानंद अगदी निराळ्याच प्रकारचा असला पाहिजे. असल्या आनंदांत ‘रस’ नाहीं असे न्यायमूर्तीस वाटण्याचा संभव आहे; ३१