पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*?く लो० टिळकांचे केसरींतील लेख ज्ञानमार्गाच्या संबंधानें कोणता मार्ग प्राचीन व कोणता अर्वाचीन हें हल्लींच्या ऐतिहासिक माहितीवरून ठरवितां येणें कठिण आहे; तथापि उपनिषदांची आर्षरचना व कपिलाचायांची न्यायानें व युक्तीने तत्त्वज्ञान पद्धति यांचा विचार करितां असें अनुमान होतें कीं, उपनिषद ग्रंथात चेोहोंकडे पसरलेलीं तत्त्वज्ञानाची रत्नें घासूनपुसून त्याचा एक हार करण्याचा पहिला प्रयत्न कपिलाचायाँनी केला असावा. कपिलाचायांच्या पद्धतीत म्हणजे सांख्यमतात व्यंग काय ते येवढेच कीं, ते केवळ युक्तीवर, तकांवर आणि न्यायावर बसविलेले आहे. अशा मतास उपनिषदप्रमाण मानणा-या तत्त्ववेत्त्यानीं नास्तिक मत म्हणावे हें एका अर्थी स्वाभाविक आहे; पण कसेही झाले तरी प्रकृति आणि पुरुष किंवा सामान्यतः इंग्रजींत ज्थास मॅटर आणि स्पिरिट किंवा फोर्स असे म्हणतात ही दोन्ही तत्त्वे भिन्न व अनादि आहेत; प्रकृतीचे गुणसृष्टीच्या आरंभाँ विकास पावून परंपरेनें * गुणागुणेषु वर्तन्ते ’ या न्यायाने भिन्न गुणात्मक जग निर्माण करतात; अंतकालीं तेच गुण प्रकृतींत विलय पावतात; आणि पुरुष हा जरी सुखदुःखाच्या भेोतूत्वास हेतुभूत असला तरी तो खरोखर त्या सुखदुःखासंबधाने उदासीन असतो इत्यादि जी साख्याचीं मतें तींच ब्रह्मसूत्रात रूपातराने नजरेस येतात. साराश, ब्रह्मविचार कितीही जुने असले तरी त्याची पद्धतशीर रचना प्रथमत: साख्यानीच घालून दिली असावी; व त्यानंतर वेदातसूत्रकारानी त्या पद्धतींत श्रुतीस धरून चालण्यास जरूर तेवढे फेरफार करून ब्रह्म आणि माया अशा प्रकारचा बेत केला असावा असे आम्हास वाटते. कोणाही एखाद्या मोठ्या विशाल बुद्धीच्या आचायाने एखादी सयुक्तिक नवीन कल्पना काढिली म्हणजे त्याच्या मागून जन्मास आलेले आचार्य त्याच पद्धतीचे अनुकरण किंवा रूपातर करून तें शास्त्र अधिकाधिक परिणतावस्थस आणितात हें सर्वत्र आहे. न्यूटननें पृथ्वीच्या किंवा पदाथीच्या आकर्षणशक्तीची कल्पना काढिल्याबरोबर अथवा डार्विनसाहेबानीं विकासधर्माचे मत प्रसिद्ध केल्यावर त्याचा पुढे कसा प्रसार झाला हे ज्यास माहीत आहे त्यास कपिलाचायांनी प्रकृति आणि पुरुष हा जो भेद स्पष्ट रीतीनें व पद्धतशीर प्रथमतः जगापुढे माडिला त्याचेच पुढे ब्रह्म व माया हें कसें रूपातर झालें हें लक्षांत येईल. जें काय ज्ञान आहे तें सर्व साख्यापासून निघालें असें जें महा भारतात म्हटले आहे त्याचाही अर्थ हाच होय. सांख्यमताच्या प्रवर्तकानीं उपः निषदाचा थोडाबहुत जर स्पष्ट आधार घेतला असता तर वेदन्तसूत्रांत सांगितः लेल्या पद्धतीची कदाचित् उत्पतिही झाली नसती. कसैही असो; ज्या अर्थी ब्रह्मसूत्रात साख्याचे खंडण आहे त्या अर्थी हें मत ब्रह्मसूत्रकालाच्या पूर्वीचे आहे. व बहुतकरून पद्धतशीर तत्त्वविचाराचा उगम साख्यापासूनच झाला असावा असें अनुमान करावें लागतें. असे; न्यायमूर्ति रानडे यांनीं साचदानंद स्वरूपांवर जी थेोडीश आपल्या निबंधात टीका केली आहे तिचा आतां थोडासा विचार करूं. अन्न