पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायमूर्ति रानडे यांची ब्रह्ममीमांसा. २४७ झाली असावी. कपिलाचे मुख्य मत म्हटलें म्हणजे प्रकृतिपुरुषवाद होय. पुरुष हा उदासीन राहून प्रकृतीच्या संगानें प्रकृतिगुणाचा उपभोग घेते; परंतु तेवढ्यानें तो अनुदासीन होऊन कार्यकारणकर्तृत्वास हेतूभूत होत नाहीं व प्रकृति आणि पुरुष हीं दोन्हीही अनादि असून प्रकृतीच्या एका गुणापासून दुसरा गुण अशा क्रमानें गुणांची उत्पत्ति होतें हे सांख्याच मत आहे. (गीता अ. १३, १९२१) हें मत स्वरोखर म्हटलें म्हणजे ज्ञानमागीतलेंच हेाय; परंतु त्यास नास्तिक म्हणण्याचे कारण येवढेच की,शंकराचायांनीं प्रकृतीस मायेर्ने रूप देऊन आपल्या मताची वैदिक पायावर उभारणी केली,तसे कपिलाचार्यांनीं न करिता कॅटप्रमाणें केवळ तर्कशास्ररचनाच्या जारावर आपल्या मताची केली आहे. उपनिषद्यंथातील अव्यवस्थित विचारास व्यवस्थित रूप देण्यापेक्षां त्यातील विचार घेऊन स्वतत्र एक पद्धत बाधणें इंच कपिलास अधिक इष्ट व योग्य वाटलें असावें. सारांश, कपिलाचा साख्य योग हा एक ज्ञानमार्गच असून वेदाताशीं त्याचे इतक साम्य आहे कीं, अद्वैतवाद्यानीं साख्यमतात एकदेन उणीवा होत्या तेवढ्या काढून शकराचायांनी आपले मत स्थापन केले असे म्हणण्यास हरकत नाही, * ज्ञानयोगेन साख्यानां कर्मयोगेन योगिनाम्” या गीतावाक्यातील रहस्यही हेच आहे. किबहुना तत्त्वविचाराना व्यवस्थित रूप देण्याची कल्पना कपिलापासूनच उत्पन्न झाली; व कपिलाच्या पलीकडे फारशी तिची मजल गेली नाही असे म्हटलें तरीही चालेल. महाभारतात ** ज्ञानं च लोके यदिह्ास्ति केिचित् साख्यागतं तच्च मह्न्मह्ात्मन् असे जे एके ठिकाणीं लिहिले आहे ते अगदी अक्षरश: खर आहे. व कपिलाच्या दर्शनाची न्यायमूर्तास चागली ओळख असती तर त्यानीं सर्व वेदातविचाराचे उगमस्थान जें सांख्यदर्शन त्याच्या कत्र्याची स्वभाववाद्यात गणना केली नसती. याबद्दलचे जास्त विवेचन दुस-या सादृश्याचा विचार करताना पुढील खेपेस करू, ['केसरी ता. २७ आक्टेंबर १८९६. ] ( नंबर् ३. ) गेल्या अंकीं कपिलाचायांचे साख्यमत स्वभाववाद्यात घालतां येण्यासारखें नाहीं, तर तो एक तत्त्वज्ञानाचा पंथ आहे, व त्यात ब्रह्माचे पुरुष या नावानें जें स्वरूप वर्णिले आहे ते जरी औपनिषधपंथास कबूल नसले तरी तेवढयावरून साख्यमार्ग ज्ञानमार्ग नव्हे असें सिद्ध होत नाही, असें थोडक्यात दाखविलें. आज त्याचाच थोडासा जास्त विचार करून वेदातमताचा व त्याचा कसा काय सबंध आहे याचे व सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाचे थोडेसें प्रकृत विषयास धरून विवेचन करावयाचे आहे. या विषयावर सविस्तर लिहीत बसल्यास महिन्यांच्या महिनेही पुरणार नाहींत हें सांगावयास नकोच.