पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ ४६ लो० टिळकांचे केसरींतील लेख आहे अशी जी स्वभावत: आपली समजूत आहे त्यास विरोध येतो. तिसरें मत जीवास गौणत्व देऊन ईश्वराचे प्राधान्य मानणें हें होय. हेंच मत जर्मनींतील सांप्रतचे तत्त्वज्ञानी यांनीं स्वीकारिलें आहे; व त्याच्याच आमच्या जुन्या वेदात ग्रंथात विचार कळला आहे. ** ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः” असें अध्या ठोकात जें ब्रह्ममीमांसेचे तत्त्व सांगितलेले आहे तें या तिसया वगीतच येतें. परंतु न्यायमूर्ति रानडे याचे असे म्हणणे आहे कीं, परमेश्वर सकल गुणातीत व उदासीन मानून त्याचे व जीवाचे ऐक्य मानले तर सत्, चित् आणि आनंद ही तीन विधाने परब्रह्मास लागू शकत नाहीत.न्यायमूर्तीच्या या विचाराचा आम्हीं पुढे विचार करणार आहो. सध्या इतकेंच सागावयाचे आहे की, याप्रमाणे स्वभाववादी, आत्मवादी व व्रह्मवादी असे जे युरोपियन तत्त्वज्ञानी तीन मार्ग काढले आहेत त्या प्रत्येकास सदृश असे जुने हिंदु मार्ग आढळतात.पैकी स्वभाववाद्याशी कपिलाचे व कणादाचे सादृश आहे व तिसच्याच अद्वैत किंवा विशिष्टाद्वैताशीं सादृश आहे असे रा. ब. रानडे याचे म्हणणें आहे. शेवटचे सादृश दाखविताना त्यांनी अद्वैतापेक्षा विशिष्टाद्वैताकडे व भागवत मार्गीकड असलेला आपला ओढा व्यक्त केला आहे न्यायमूतींच्या निबघाचा साराश सामान्यतः वर लिहिल्याप्रमाणें आहे. डॉ. फ्रेझर याचे मत थोडक्यात सागून तत्सदृश हिदुतत्त्वज्ञाच्या मताचा उल्लेख करावा व हिंदुतत्त्वज्ञाच्या विचाराचे महत्त्व लोकापुढ माडार्वे, हा या निबंधाचा मुख्य हेतु होता व तो हेतु सिद्धीस जावा अशी आमचीही इच्छा आहे; पण त्याचबरोबर आमच्याकडील तत्त्वविचाराचे खरें ज्ञान लोकास व्हाव व अाज जर्मनीतील तत्त्ववेत्त्यासही मान्य झालेल्या तर्कशास्त्रदृष्टया अबाधित ठरलेल्या अद्वैत सिद्धान्तास विनाकारण गोणत्व येऊ नये एवढ्याचकरिता आम्हीं या निबंधावर थोडीशी टीका करण्याचे योजिले आहे. बाकी प्रार्थनासमाजाची कोण शिला स्थापन करणाच्या न्यायमूर्तासारख्या विद्वानाकडून उशिराच का होईना, पण ** आमच्या धर्मग्रंथात पाश्चात्य अधुनिक विचाराच्या तोंडाचे विचार आढळतात; व एवढयाकरिता आमच्या जुन्या ग्रंथाचे सर्वानीं परिशीलन करणे अवश्य आहे. ’ असा उपदश लोकास केला जातो हे काहीं कालगतीचे लहानसहान द्योतक नव्हें. हळूहळूच का होईना, पण धर्मबाबतीत विचारी पुरुषाची मर्ने पश्चिमेकडे वाहवली होती ती आता पूर्वेकडे येऊं लागली आहेत हें यावरून चागलें व्यक्त होतें ! हाच विचारैोध असाच चालला तर ** पुरा यत्र स्रोतः पुलिन मधुना तत्र सरिता ” याच न्यायाने प्रार्थना समाजाच्या भव्य इमारतीच्या ठिकाणी काय दृष्टीस पडतील याची वाचकांनींच कल्पना करावी. न्यायमूर्ति रानड्यानीं जीं दोन सादृश्ये दाखविलीं आहेत त्यापैकी पहिल्याचा आज आम्ही विचार करणार आहॉ. कपिलाची स्वभाववाद्यात न्यायमूर्तीनी जी गणना केली आहे ती चुकीची आहे. कपिलाच्या सांख्य मताचा कूधी कधीं नास्तिक दर्शनांत समावेश केलेला असतो एवढ्यावरून न्यायमूर्तीची ही गैरसमजूत