पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायमूर्ति रानडे यांची ब्रह्ममीमांसा. २ ४५ किंवा अद्वैति अथवा एक कालीं द्वैति व अन्य काली अद्वैति असू शकेल; व येवढी गोष्ट जर वाचकाच्या मनात बिंबली तर पुढील मार्ग क्रमण्यास त्यास बरेंच सुलभ जाईल. [ नंबर २ ]. गेल्या अंकीं आम्ही जें विवेचन कले आहे त्यावरून भक्तिमार्गाचा एखाद्या विशिष्ट ज्ञानमार्गाशी नित्यसंबंध असण्याची आवश्यकता नाही, हे वाचकाच्या लक्षात आले असेल. भक्ति हा अंत:करणाचा धर्म आहे व ज्ञान हैं बुद्धिगम्य आहे. * श्रद्धावान्लभते ज्ञानं तत्पर: संयतेद्रियः ’ या गीतावोक्याप्रमाणे भक्तीचें पर्यवसान ज्ञानात होऊन तत्द्वारा मोक्षप्राप्ति होते असें शंकराचायांचे मत आहे पण हे ज्ञान अद्वैतात्मकच असले पाहिजे किंवा विशिष्टाद्वैतात्मक असले पाहिजे याचा खुलासा वरील वाक्यात केलेला नाहीं. भगवंताविषयीचे प्रेम निरतिशय झाल्यावर त्याचा बुद्धीवर जसा परिणाम घडेल त्याप्रमाणे द्वैत, अद्वैत किंवा विशिष्टाद्वैताचा भगवद्भक्ताचे मनास बोध व्हावयाचा; व हा बोध सामान्यतः प्रत्येक मनुष्याच्या बुद्धीच्या प्रवृत्तीवर अवलंबून असणार हें उघड आहे. भक्तीच्या प्रारंभी उपास्यउपासकभाव कल्पावा लागतो; पण हाच शेवटपर्यंत कायम असण्याची काहीं जरूर नाहीं. सोंगटयाचा किल्ला तयार केल्यावर त्याच्या खालच्या सोंगट्या ज्याप्रमाणे काढून घेतात, त्याचप्रमाणें भक्तिमार्गाची व योगमार्गाची गोष्ट आहे. भक्तिमागांत भक्तीस आणि योगमागांत चित्तसमाधिसिद्धयर्य प्रथमत: काहीं तरी विषय घ्यावा लागतो; पण अखेरीस पायरीपायरीने योगात ज्याप्रमाणे निर्विकल्प समाधीची शेवटची अवस्था प्राप्त होते, त्याचप्रमाणे भक्त्युद्रेकाने अखेरीस निर्गुण ब्रह्माचे व जीवाचे ऐक्य अनुभवास येते. ही स्थिति कशी व केव्हा प्राप्त होते याचा सध्या विचार करण्याची जरूर नाही. रामानुजपंथाखेरीज इतर पंथातही भक्तिमार्गी लोक आहेत, एवढयावरून आम्ही म्हणतो ती गोष्ट सहज सिद्ध होते. व महाराष्ट्र-सतमंडळींच्या इतिहासावरूनही त्यास पुष्टीकरण मिळते. असो; आता न्यायमूर्ति रानड्याच्या निबधातील दुस-या मुद्दयाकड वळू. ब्रह्माचा विचार करताना मनुष्याचे मन तीन त-हानी फाकले जात असते हें तीन निरानराळी मते प्रचारांत येण्यास मुख्य कारण आहे असा डॅ. फ्रेजर यांच्या म्हणण्याचा आशय रावबहादुरांनी दिला आहे. सृष्टीचे वैभव पाहून दिपून जाणाया मनुष्यास सृष्टीच्या पलीकड काहीं अज्ञेय आहे असे वाटत नाही व त्यामुळे काही लोक स्वभाववादी बनतात असे निबधांत लिहिलेले आहे. दुसरा वर्ग आत्मवाद्याचा होय. यास सर्व जग हें मनुष्याच्या इंद्रियशक्तीने निर्माण झालेले असे वाटते. मला ज्या काही वस्तु दिसतात त्या मी पाहते म्हणून आहेत; मी गेला म्हणजे काहीं नाहीं, अशा तच्हेच्या विचाराचे या मतांत प्राधान्य आहे; पण त्यामुळे मनाचे समाधान न होतां जगाचे अस्तित्व आपल्याहून भिन्न