दत्तकाची आवश्यकता ११ असे म्हणून तो नवीन प्रघात अमलांत आणणारा एखादा सांपडल्यास विरळा ! सुधारणेस जेवढे म्हणून अडथळे आले आहेत तेवढे याच कारणामुळे होत. तथापि मनुष्याच्या मनाच्या या स्वाभाविक प्रवृत्तीपासून कांहीं च फायदा होत नाहीं असें म्हणता येत नाहीं. अशी प्रवृति नसती तर प्रतिदिवशीं हजारों नवे फेरफार होऊन समाजाचे तारूं केोणीकडे भडकले असतें तें सांगवत नाही. शिवाय, विचार केल्यावांचून जुनी म्हणूनच एखाद्या रीतीभातीस चिकटून राहण्याची जरी मनुष्याची प्रवृत्ति असली, तथापि त्याच्यांत विचारशक्तीचे प्राबल्य असल्यामुळे हळूहळू काही जुन्या रीति वाईट अशी त्याची खात्री करण्यास कठिण पडत नाहीं. असें नसतें तर आज ज्या शेंकडा नवीन रीति प्रचारांत येत आहेत त्या कधीही आल्या नसत्या. असो; एवढी प्रस्तावना करण्याचे कारण इतकैच की, शिरोलेखात सागितलेल्या विषयाच्या संबंधानें चर्चा करतेवेळीं तरी ( अमलात आणण्याची गोष्ट निराळी) हा प्रघात आज बरेच दिवस सुरू आहे, यापेक्षा जास्त काही आहे कीं काय, याचा विचार प्रत्येकानें शातपणें करावा. आमच्या मते तर हा संस्कार धर्माप्रमाणे आवश्यक नसून, ती ज्या वेळीं प्रचारात आला, त्या वेळीं त्यापासून जे फायदे होत होते, त्यापैकीं हल्लीं एकही फायदा होत नसून, उलट त्याच्या शतपट नुकसान होत आहे. ह्यांपैकीं पहिला भाग धर्मशास्राचा, व दुसरा केवळ अर्थशास्त्राचाच आहे, असे म्हटले असता चालेल. दत्तकसंस्कार धर्मदृष्टया अनवश्यक ठरल्यावर, मग त्यापासून व्यवहारात काय काय तोटे होतात, हे सागण्यास व समजण्थास ठीक पडेल. करिता प्रथमत: धर्मशूास्त्रदृष्टया, याचा विचार करून, नंतर त्याच्या व्यावहारिक स्वरूपाकडे वळण्याचा आमचा इरादा आहे. शिवाय असे केल्यानें धर्मसंस्काराचा व्यवहारदृष्टया एकदम विचार झाल्यास वृथाधर्माभिमान्याची जी फुकट काव काव होते, तीही बंद पडेल. धर्मसंबंधाने केवळ युक्तीने विचार करण्याचा प्रघात कोणत्याही देशात अजून पूर्णपणे पडला नाहीं, तथापि ** स्वधर्म निधनं श्रेयः ” या गीतावाक्यास मान डॉलविणा-या व क ♛ाद, सांख्य व वेदान्त या मतांचा एकाच जातीखालीं समावेश करणा-या लोकामध्ये तो जितका असावा तितका नाहीं याचें आश्चर्य वाटतें. आम्हास आज जी उपेोद्धातात एवढी जागा आडवावी लागली त्याचे तरी बीज हॅच. असेो, लिहिता लिहिता हा लेख बराच लाबल्यामुळे आज दत्तकसंस्काराच्या ज्या भागाविषयीं आम्हीं लिहिण्याचे योजिले होतें, तो तसाच राहिला; करितां पुढील खेपेस या संस्काराच्या आवश्यकतेसंबंधाने धर्मशास्रकारांचे काय म्हणणे आहे ते, व एकंदर धर्मदृष्टया या संस्कारास किती महत्त्व येतें तें सांगून, नंतर त्यात अर्थशास्राचे संबंधानें जे दोन चार मोठ्या महत्त्वाचे विचाराई मुद्दे आहेत त्याजकडे वळू. या विषयावरील सर्व विचार एका निबंधांत नाहीत हें वरील प्रस्तावावरून वाचकाच्या लक्षात आलेंच असेल. (२) मागील अंकीं असल्या विषयाचे संबंधानें लोकाच्या साधारण समजुती
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/26
Appearance