पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ ४ ली० टिळकांचे केसरींतील लेख झाली तरी त्यापासून समाधान अगर मोक्षप्राप्ति नाहीं हें खरें होय. भक्ति आणि ज्ञान हीं साधनें आहेत, व त्यांचा एकंदर मनावर जर कांहीं परिणाम झालेला नाहीं तर दोन्हीही फुकट होत; आणि परिणाम झाला असेल तर ** सांख्ययोगी प्रथग्बाला: प्रवदन्ति न पंडिताः ’ या वाक्यांत साख्ययोग शब्दांत भक्तीचाही अंतर्भाव केला पाहिजे. भगवद्गीर्तेत सागितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या निरनिराळ्या मागची एकरूपता परिणामी अथवा साध्य कोटींत आहे, साधन कोटींत नाही हें ** यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ” या गीता वाक्यावरून उघड होते. सारांश, ज्ञान, भक्ति आणि कर्म अथवा योग हे परस्पर सापेक्ष असण्याची काही जरूर नाहीं, म्हणजे हे तिन्ही मार्ग सापेक्ष असले काय आणि नसले काय सारखेच. या तिन्ही मागांनीं ज्या स्थानी जावयाचे ते स्थान एकच आहे, व आकाशातून पडलले पाणी निरनिराळ्या मार्गानीं गेलें तरी तें जसें समुद्रातच जाऊन पडत तद्वत् या तिन्ही मार्गानी जाणाच्या लोकांस अखेरीस प्राप्य वस्तु एकच आहे हेंच ** एकं साख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ” या वाक्याचे रहस्य आहे. ईश्वरस्वरूपाची कोणत्याही मार्गानें कां होईना पण एकदा ओळख झाल्यावर त्यात कधीं द्वैत व कधीं अद्वैत असे विचारभेद होऊ शकतील, पण ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग असे जेव्हा ईश्वरप्राप्तीचे तीन मार्ग सागतात तेव्हा त्यांपैकी दोघाचा अथवा तिघाचा अन्येोन्याश्रय आहे असें येवढ्यावरून म्हणता येत नाही. साराश, भागवतधर्मास अगर भक्तिमार्गास्र प्रथमतः जरी जीव आाण ब्रह्म ही प्रथक् मानण्याची आवश्यकता वाटत असली तरी अखेरीस सिध्दातपक्षीं हा समज कायम ठेवण्याची काही जरूरी नाही असें भगवद्गीतेवरून आणि महाराष्ट्रसंत मंडळींच्या उद्गारावरून उघड होतें. न्यायमूर्ति रावबहादुर रानडे यानींआपल्या व्याख्यानात हा भेद असावा तितका ठेवला नाही; व ज्ञान, भक्ति आणि खिस्ती तत्त्वविचार यांची संगत घालण्याचा प्रयत्न करितांना तिन्ही पथाची बरीच ओढाताण केलेली आहे. सत् चित् आणि आनंद या तिहींची खिस्तीत्रयीशीं केलेली तुलना वरीस तिन्ही शब्दाचा अर्थविपर्यास, भागवतधमीची महती गाता गाता तो धर्म एकाच ईश्वरप्रणित ग्रंथावर रचलला नाहीं अशीं समाजिस्टाचीं मर्त त्यात मध्येच घुसडून देण्याची शैली वगैरे न्यायमूर्तीच्या निबंधातील काही ठळक गोष्टी किवा गैरसमज यावर टीका करण्याचा आज आमचा विचार होता. पण प्रस्तावनतच पुष्कळ जागा आडल्यामुळे तो विचार सध्यां एक आठवडाभर तहकूब ठेवावा लागत आहे. तथापि वर केलेल्या विवेचनावरून येवढे लक्षात येईल कीं, माध्व किंवा रामानुज मताची भक्तिमागीशी जी कित्येकाच्या मत एकवाक्यता झालेली आहे ती मूळची नसून अलीकडच्या ग्रंथकारानी प्रचारांत आणिली आहे. भागवत किंवा भक्तिमार्ग हा ह्या बाबतीत बाधलेला नसून ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणें जेो तो द्वैति