पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायमूर्ति रानडे यांनीं ब्रह्ममीमांसा. २ ४ ३ वरून सदर साप्रदायास या आचार्याच्या सदर ब्रह्मविचारांच्या पायाची जरूर होती किंवा आहे असें सिद्ध होऊं शकत नाही. यास प्रत्यंतर पाहणें असल्यास फार लाब जावयास नको. आपल्याकडील सतमंडळी पूर्ण भक्तिपंथातील असतांही त्यांनी माध्व किंवा रामानुज मताचा स्वीकार आणि शाकर मताचा त्याग केल्याचे उदाहरण क्वचितच सापडेल. भक्तिमार्गीस सगुण ब्रह्माची आवश्यकता आहे, व जीवाचे व ईश्वराचे सकृद्दर्शनी तरी ऐक्य मानता येत नाहीं हैं उघड आहे. तथापि भक्तिमार्गानें एकदा मन पवित्र झाल्यावर मग ** अवघे मनचि राम झाले ’ अशा त-हेच्या अद्वैत विचाराच्या स्फूर्तिचे द्योतकउद्गार तोंटावाटे सहज बाहेर पडून जातात हें तुकारामासारख्या साधूच्या ग्रंथावरून केोणासही सहज कळून येण्यासारखे आहे. ईश्वर सकल गुणाच अधिष्ठान आहे असे कल्पून त्याच्या सेवेंतच जीवास काय ते परमसैोख्य आहे, व तेच सौख्य सदा आपणास मिळावें, त्या पलीकडे जाण्याची आपली इच्छा नाहीं. अशा अर्थाची महाराष्ट्र-भग वद्भक्त शिरोमणीच्या तोंडातून काहीं वचनें सहज काढून देता येतील; पण ते काहीं भक्तिमार्गाचे पर्यवसान नव्हे असें थोड्या विचारातीं कोणासही समजेल. तुकारामाच्या गाथेत काहीं द्वैतपर व काही अद्वैतपर असे जे अभंग आढळून येतात त्याची द्वैत्यानी किंवा अद्वैत्यानी ओढ़ाताण करून आपापल्या मतास अनुकूल असा अर्थ करण्यापेक्षां हे निरानराळ्या वेदात मताचे प्रतिपादक ठीक देशभदानें, कालभेदानें ब अधिकार भदाने लावावे हे आम्हास अधिक प्रशस्त दिसर्ते. श्रीमद्भगवद्गीतॆतर्हृी ज्ञान, भक्ति आाणि योग असे तीन स्वतंत्र ईश्वरप्राप्तीचे मार्ग सागितले आहेत; व त्यात कोठेही ज्ञानमार्गाच्या अमुकपंथाशीं भक्तिमार्ग संयुक्त अरालाच पाहिजे असें प्रतिपादन केलेले नाही. शंकराचार्य, मध्वाचार्य व रामानुजाचार्य यापैकी प्रत्येकानें भगवद्गीता आपापल्या मताकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे; पण गीतेचे खरे रहस्य अशा रीतीने त्रिधा किंवा अनेकधा होऊं शकत नाही हे थोडेही ज्यार्ने शास्त्राचे अध्ययन केलें असेल त्यास कळून येईल. ज्ञान हा जसा एक मोक्षप्राप्तींचा मार्ग सागितला आहे तसाच भक्ति हाही होय जें कार्य ज्ञानाने होऊं शकते तेंच भक्तीनें होऊं शकते असा गीतेचा सिद्धान्त आहे; इतकेंच नव्हे तर, “ क्लेशोऽधिकरस्तेषामव्यक्ता सक्तचेतसा ।’ अशी ज्ञानमार्गाची थेोडीशी उणीवही दाखविली आहे. ** ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुतेऽर्जुन ?’ या वाक्यावर भिस्त ठेऊन भक्तीनॆ अखेरीस शान प्रास होऊन तद्वारा मोक्षप्राप्ति असें ज्ञानमागांतील लोकानीं, व ** तेषा ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिवैिशिष्यते ' या वचनावरून भक्ति असल्याखेरीज नुसत्या ज्ञानार्ने मोक्ष, नाहीं हे साहजिकच आहे; पण जरा खोल विचार केला असता असें आढळून येईल कीं, भक्तिमार्गाचे जें महत्त्व आहे तें अमुक एका विशिष्ट तत्त्वविचारावर अवलंबून आहे असे नाही. कितीही शाब्दिक ज्ञान झालें جندية झालें तरी मोक्ष नाहीं हे जितक खरें आहे तितकंच कितीही औपचारिक भक्ति