पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ लो० टिळकांचे केसरींतील लेख गृहस्थांनीं आमच्या इंग्रजी शिकलेल्या मंडळीस बोध करून देण्याचे मनांत आणिलें हीच आधीं आमच्या मत मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व धर्मीतील ईश्वरप्रणीत ग्रंथाची भट्टी लावून आपल्या बुद्धीच्या तेजःसामथ्र्यानें त्यातून गाळून निघालेला अर्क आठा आठा दिवसानीं प्रार्थना मदिरांत जमणा-या आधुनिक भाविक जनास श्रेोतृपेय करण्याचे आध्वर्युत्व आज ज्यांनीं बरेच दिवस पत्करिलें हेोत, त्याचे तोंडून अगदीं नूतन पाश्चात्य विचारांच्या तोडीस तोड देण्यासारवे आमच्या जुन्या प्राच्च ग्रंथात विचार आहेत, येवढे तरी विधान त्याच्या दृष्टीनेंच कां होईना, पण सप्रमाण निघाले हे पाहून आम्हांस फार संतोष होतो; व मनात अशी उमेद येते कीं, आमच्या रावबहादुराच्या विचारास जी हल्लीं दिशा मिळाली आहे तिचा रोख तसाच कायम राहिल्यास शंकराचार्याच्या अद्वैत सिद्धान्ताची आणि रावबहादुराच्या विचाराची केव्हाना केव्हां तरी एकवाक्यता होण्याचा खास प्रसंग येईल. जर्मनींतील बरेच तत्त्ववते अलीकडे शंकराचार्याच्या मताचा स्वीकार करूं लागले आहेत, व कित्येकानी तर अद्वैत सिद्धान्त हाच काय तो तर्कशास्त्राच्या कसोटीला टिकतो अगर टिकण्यासारखा आहे असे साफ लिहिले आहे. न्या, रानडे यांच्यासारख्या प्रार्थनासमाजातून अद्याप पूर्णपणें बाहेर न पडलेल्या गृहस्थास जर्मन तत्त्ववेत्त्याचे शंकराचार्याच्या सिद्धान्ताबद्दलचे अभिप्राय पूर्णपणें कधीही संमत व्हावयाचे नाहीत हे आम्हीं जाणून आहो. भक्तिमार्गीस जीव आणि ब्रह्म याचें ऐक्य विघातक आहे अशी रा. ब. रानडे याची समजूत आहे असें त्यांच्या लेखांवरून रपष्ट होते; पण आमच्याकडील संतमंडळींच्या मतेही ईो समजूत चुकीची आहे हे लक्षात ठेविले पाहिजे. ज्ञानमार्गानें प्राप्त होणारी सायुज्यता भक्तिमार्गनैिही प्राप्त होते असें भगवद्गीतेंत स्पष्ट सागितले आहे. भागवत धर्मास द्वैत अगर विशिष्टाद्वैत मताचाच स्वीकार केला पाहिजे अशी जी अलीकडे कित्येकांची समजूत झाली आहे ती चुकीची आहे असें इतिसाहावरून सहज दाखविता येईल. शंकराचार्यानंतर काही शतकानीं मध्वाचार्य व रामानुजाचार्य उत्पन्न झाले, व भागवत धर्माची उत्पत्ति पाहिली तर ती किमानपक्षी भारतकालापूर्वीची आहे असें भारतांत व गीर्तेत या धर्माबद्दल जे उल्लेख आहेत त्यावरून कबूल करावे लागतें. भारताचा काळ खिस्ती शकापूर्वी तीन चारशैवर्ष आहे असें मानलें तरी तेथपासून शंकराचार्याच्या कालापर्यंत म्हणजे निदान एक हजार बाराशें वर्षे व त्यानतर दोनतीनशें वर्षे म्हणजे एकंदरीत पंधराशें वर्षेपर्यंत मध्वाचार्य किंवा रामानुज याच्या द्वैत किंवा विशिष्टाद्वैत सिद्धान्ताखेरीज * भक्तियोगाचे ? समर्थन झाले होतें असें मानल्याखेरीज गत्यंतर नाहीं; व तसे मानलें म्हणजे भक्तिमार्गास द्वैत किंवा विशिष्टाद्वैत ब्रह्मोवचारांचा आधार घेतलाच पाहिजे या मतास कांहींएक प्रमाण रहात नाही. मध्वाचार्य किंवा रामानुजाचार्य यानीं आपापल्या भागवत साप्रदायास अनुकूल ब्रह्ममीमासा कल्यावर त्याच्या अनुयायांनी त्याच्या ब्रह्मविचाराची त्यांच्या सांप्रदायाशीं सांगड घालून दिली, येवढ्या