पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायमूर्ति रानडे यांची ब्रह्ममीमांसा. २४ १ त्याची मीमांसा आम्ही स्पेन्सरसाहेबासारखीं केली नसली तरी विश्वाच्या बुडाशीं जें काही आहे तें केवळ सत् आहे, इतकेंच नव्हे तर, चिदानंदात्मकही आहे, येथपर्यंत आमची मजल गेलेली आहे. या मजलेची ज्यास ओळख झालेली नाहीं त्यास स्पेन्सरसाद्देबाची विचारसरणी जितको मोहक व प्रगल्भ वाटेल तितकी ती केसरीकारास न वाटणें अगदी स्वाभाविक आहे. अज्ञेयमीमांसेचीं तत्त्वें आम्हांस किती लागू करावयाचीं हा प्रश्न आमच्यामते उपस्थित होत नाही. ही तत्त्वें आमच्या देशात ज्या केोणास थोडाबहुत विचार करण्याची शक्ति आहे, मग तो जुना असो वा नवा असो-त्या सर्वासही एकसारखी लागू आहेत. त्यात मतभेदास कांहीं जागा नाहीं. परंतु आम्ही जर ती सांगू लागली तर आमच्या भित्रापेक्षां ती काहीं तरी निराळ्या रीतीनें सागूं; व रा, रा. फडके यासही आमची अशी विनंती आहे कीं, या ग्रंथाची पुनरावृति काढण्याचा त्यास प्रसंग आल्यास त्यानी आम्ही वर सुचविल्याप्रमाणें अवश्य व्यवस्था करावी. यापेक्षा ह्यात तत्त्वज्ञानाबद्दल दुसरा केोणताही मतभेद आमच्यामध्ये व आमच्या बंधूमध्ये आहे असें आम्हास वाटत नाही. स्पेन्सरच्या ग्रथाचे नुसतें भापातर झाले तरीहीं काही लहान काम झाले असें नाही. कारण खुद्द इंग्रजीतही जर असले ग्रंथ खपण्याची मारामार पडली होती तर आमच्याकडची कथा काय ? रा. रा. दाभोळकर यांचे जे आभार मानावयाचे ते ह्याचसाठीं होत. स्पेन्सरच्या ब-याच ग्रंथाचा महाराष्ट्र वाचकास त्यानीं परिचय करून दिला आहे, व असाच उद्योग कायम ठेवून या ऋषिवर्याचे ग्रथ आम्हास जितके अधिक वाचावयास मिळतील तितका उद्योग करावा अशी त्यास आमची शिफारस आहे. स्पेन्सरसाहेबाच्या मताचा यथार्थतेबद्दल वादविवाद करण्याचे हें स्थळ नव्हे, करिता ग्रथकाराचे व प्रकाशकाचे पुनः एकवार आभार मानून हा लेख सपवितो. ( केसरी ता. १८ आगस्ट १८९६ ). _

  • न्यायमूर्ति रानडे यांची ब्रह्ममीमांसा

डॉ. प्रेझर यानीं वरील विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा सारांश देऊन त्या सारांशाबरोबरच इकडील वेदात्याचे सदृश विचार किंवा प्रमेयें इकडील लोकास समजून देण्याचा नामदार न्यायमूर्ति रावबहादुर रानडे यानीं मुंबईतील बुइल्सन कॉलेजात **फिलॉसफी अॅीफ थिइझम' या विषयावर व्याख्यान देऊन जेो प्रयत्न केला तो खरोखरच फार प्रशंसनीय होय. धमीचीं रहस्ये आमच्या जुन्या धमोत किती चांगल्या रीतीने सागितली आहेत याचे न्यायमूर्तासारख्या बहुश्रुत व पुढारी केसरी, ता. १२ आक्टोबर શ૮૬૬]. ३ ఫ్రో