पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R?o लो० टिळकांचे केसरींतील लेख घेण्यासारखें आहे. यावरून स्पेन्सरसाहेबांची योग्यता आमच्या बंधूपेक्षां आम्ही कमी मानती असें केोणीही समजूं नये. उत्क्रमण तत्त्वाचा ( उत्क्रमण हा शब्द इव्होल्यूशनचा अर्थ जितक्या चागल्या रीतीनें दाखविला गेला पाहिजे तितक्या चागल्या रीतीनें दाखवीत नाही) पूर्ण विकास करून हें तत्त्व चोहॅकड लावण्याचा ज्या तत्त्ववत्त्यानें प्रयत्न केला त्याचे महत्त्व आम्ही वर्णावें तितकें थेोडेंच, किंबहुना सर्व पाश्चात्य तत्त्व विचारास या महातत्त्ववत्त्यार्ने एक प्रकारचे निराळेच वळण लावून दिलें आहे असे म्हटले तरी चालेल. आमच्या व आमच्या बंधूचा जो मतभेद आहे तो स्पेन्सरसाहेबाच्या यथार्थतेबद्दल नव्हे अथवा त्याच्या योग्यतेबद्दलही नव्हे. हे आधुनिक काळचे ऋषिवर्य आम्हासही पूज्य व वंद्य आहेत. पण त्यामुळे आम्ही आपल्या पूर्वीच्या ऋषेिवयास विसरून जाऊन केवळ स्पेन्सरसाहेबाचेच पोवाडे गात बसार्वे हे आम्हास बर वाटत नाही. सुधारकात अथवा रा. रा. फडके याच्या प्रस्तुतच्या पुस्तकांत जो दोष आहे तो हाच होय. केवळ स्पेन्सरच्या ग्रंथाचेच भाषातर अथवा गोषवारा वाचकापुढे माडिल्याने हें एक काहीं नवेंच तत्त्व ग्रंथकार आपणापुढे मांडीत आहे असा काही भास होतो, व त्यामुळे त्याचा गैरसमज होऊन त्याच्या विचारासही अनिष्ट वळण लागतें तशी स्थिति होणें इष्ट नाही. करिता ज्यास स्पेन्सरसाहेबासारख्याचे तत्त्वविचार आमच्या लोकापुढ माडावयाचे असतील त्यांनीं ते इकडील पूर्वीच्या विचाराशी ताडून पाहून परस्पराचे साम्य अगर भद लक्षात आणून मग लोकापुढे माडिले पाहिजे. कारण हिंदुस्थानची जर कशाबद्दलची ख्याति असली तर ती धर्मविचाबद्दल होय. हे विचार हल्लीच्या शास्त्रीय पद्धतीनें आम्हास सुचले नसतील अगर आम्हीं त्याचे प्रतिपादन केले नसेल, परंतु त्यामुळे त्याची किंमत काही कमी होते असें नाही. यासाठीं केवळ स्पेन्सरसाहेबाचा ग्रंथ आपल्या हातात नव्याने पडला अथवा उदात्त विचाराची त्याच्या ग्रंथ वाचनानेंच प्रथमत: आपणास ओळख झाली येवढ्यावरून आमच्या देशांतील वाचकापुढे हे तत्त्व त्यास नवे भासेल अशा रीतीने माडण्यास आम्ही उद्युक्त होऊं नये. निदान हं विवेचन करितें वेळीं आमच्या जुन्या ग्रंथातील विचाराचे याच्याशी होईल तितकं साम्य दाखविण्याचा तरी आपणांस उद्योग केला पाहिजे. हें काम जरा जोखमीचे व विचाराचे आहे खरें, परंतु तत्त्वविचाराचे ग्रंथ ज्या अर्थी नेहमीच प्रसिद्ध होतात असे नाही त्या अर्थी या असल्या ग्रंथातून, पहिल्यानेच आम्ही वर सागितल्याप्रमाणें, प्राच्य व पाश्चात्य विचाराचे साम्य दाखविण्यांत आले पाहिजे. साराश रा. रा. फडके यांनी आमच्या सुधारकाचा जो मतभेद दाखविला आहे ती बरोबर नसून खरा भेद निराळ्या प्रकारचाच आहे. स्पेन्सरसाहेबाची मते प्रस्तुत स्थितीत व प्रस्तुत काळी आपणास किती व किती प्रमाणानें लागू करिता येतील याबद्दल मतभेद असल्यामुळे आम्ही ती विस्तारें सागत बसत नाही असें नाहीं, तर आमचे असें मत आहे कीं, हें तत्त्वच आम्हास नवीन नाही, व यद्यपि