पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २३५ पूर्वेतिहासावरून हें काम करण्याचा अधिकार ब्राह्मणाकडच आहे. व तो त्यांनी सोडून दिला तर आज त्यांचे जागीं येऊन दुसरे लोक काम करतील असा संभवही नाहीं. यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मण उर्फ पाढरपेशे लोकास आमची पुनः पुनः अशी विनंति आहे कीं त्यानीं आपलें बुद्धिवभव व सामथ्र्य केवळ सरकारचरणीं खर्च करण्याचा संकल्प करून आयुष्य घालवू नये.लोकास त्याच्या हक्काचे ज्ञान करून देऊन त्यांस सुखप्राप्तीचे मार्ग दाखविणें व जण करून परकीय लोकांच्या खटपटोनें आमच्या लोकातील आपलेपणा नाहींसा होणार नाही अशी तजवीज करणें हीं कार्मे ब्राह्मणांचींच आहेत. आमची राजसत्ता लयास गेलीच आहे, आहे, पण आमचा धर्म, आमचा व्यापार, आमची शती ही देखील लयास जातात की काय अशी परकीयाच्या सुळसुळाटाने आम्हास भीती वाटू लागली आहे. या भीतीचा प्रतिकार करून हेोईल तितके जास्त राजकीय हक्क संपादन करण्यास आम्ही उद्युक्त झालें पाहिजे. हा उद्योग कांहीं लहान सहान नाहीं. तो करण्यास कित्येक चागल्या मनुष्यास आपले आयुष्य खर्च करावें लागेल, व इतकें करूनही एक दोन पिढ्यातच या कामात सिद्धि येईल असें नाहीं, तरीही पण हा उद्योग इतका महत्त्वाचा आहे कीं, तो केव्हानाकेव्हां केल्याखेरीज गत्यंतर नाहीं; व तो जितका लवकर सुरूं होईल तितका चांगला. मिशनरी लोकांच्या मोठमोठ्या संस्था पाहिल्या म्हणजे आमच्यामध्ये तशा संस्था कां होत नाहीत असा सहजच प्रश्न उद्भवतो. पूर्वी अशा संस्था नव्हत्या असें नाहीं; पण हल्लींच्या काळात शिक्षणाचा व विचाराचा ओघ फारच सकुंचित होऊन एकाच गतीनें वहात असल्यामुळे कोणासही कॉलेजात जाऊन बी. ए. व्हावयाचे व पुढे मोठी नोकरी मिळावयाची यापेक्षां काहीं एक जास्त दिसेनासें झाले आहे. आमच्या शिक्षणक्रमात जर काही एक फरक पाहिजे असला तर तो असल्या विचाराचा ओघ जेणेकरून बदलल अशा विचाराचा पाहिजे; व प्रि. गोळे याच्या ग्रंथांत अशा प्रकारच्या ज्या कांहीं सूचना आहेत त्या आम्हास ग्राह्य आहेत. ब्राह्मणांच्या कर्तव्यांपैकीं मुख्य कर्तव्याचा हा विचार झाला. परंतु सर्वच ब्राह्मण या कर्तव्याला लागतात असे नाही. पुष्कळाची हाव काहीं तरी धदा करून संसार चालवावा एवढीच असणार; व ही त्यांची इच्छा जेणेंकरून तडीस जाईल अशा रीतीचे त्यांस शिक्षण मिळणे अगदीं आवश्यक आहे. केवळ शाळेतील शिक्षणक्रम बदलल्यानें ब्राह्मणांच्या खया कर्तव्याची त्यांस ओळख होऊन ते कर्तबगारीचीं कामें करूं लागतील हें म्हणणे आम्हास रास्त दिसत नाही असें मार्गे सागितलेंच आहे. शिक्षणपद्धतीतील दोषामुळेच आमच्यामधील साहसादि गुण नष्ट झाले, हेंच जर आम्हांस खरें वाटत नाही तर तो क्रम बदलल्यानें सदर गुण आमच्या अंगीं येतील असें न वाटणेंही स्वाभाविक आहे. आमच्या साहसाची, बुद्धिमतेची व कर्तबगारीची आमच्या राज्यकत्र्यास जरूर नाहीं; व