पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ लो० टिळकांचे केसरींतील लेख ज्याप्रमाणें स्थिति झाली त्याप्रमाणें आमची स्थिति होईल कीं काय अशी भीति वाटत आहे. करितां पुनः एकवार आमच्या तरुण मंडळीस आम्ही अशी विनंती करतों कीं, त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष न करितां वर दर्शविल्याप्रमाणें आपला देह, देशहिताच्या कामीं खर्च करण्याचा संकल्प करून व आपण आपल्या जन्मात काहीं तरी करून दाखवू अशी बुद्धि मनांत बाळगून त्याप्रमाणे उद्योगास प्रवृत्त व्हावे. या कामात यश येण्यापूर्वी आमचीं बरीच माणसें खची पडतील हें आम्ही जाणून आहो; पण येथे राहून तीस कोर्टा प्रजेंत आणखी भर पाडण्यापेक्षा अशा रीतीने देह ठेवण्याची पाळी आली तरीही त्यांत यत्किचितही वाईट वाटण्याचे काहीं कारण नाही. आज अशा प्रकारचीं सर्व हिदुस्थानांत पन्नास साठ नाहीं तर पांच पंचवीस माणसे निघालीं तरी बस्स आहे; पण तेवढीं तरी आहेत कीठे ? प्रिं. गोळे यांस जर शिक्षणपद्धतींत कांहीं फरक करावयाचा असला तर ही बुद्धि विद्याथ्यांच्या मनात उत्पन्न होण्यासारखा केला पाहिजे; परंतु त्याच्या ग्रंथांत ही दिशाच अजिबात सोडून दिलेली आहे. ( नंबर ७. ) प्रि. गोळे यानीं आपल्या पुस्तकास व्यापक स्वरूप देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यासेबंधानें आमचे काय मत आहे ते कळविले. आतां त्याच्या ग्रंथांतील ज दुसरे भाग आहेत त्यासंबधानें दोन शब्द लिहून आमचे मित्र प्रि. गोळे याची रजा घेण्याचा आमचा विचार आहे. आमचे असें मत आहे कीं, ब्राह्मण आणि त्याची विद्या असल्या प्रकारचे भपकेदार नाव न देतां प्रेि. गोळे यानीं जर ** प्रस्तुतच्या शिक्षणपद्धततिील दोष ’ असें आपल्या ग्रंथास नाव दिले असतें तर ते अधिक शोभलें असतें; व त्याचीं पुष्कळ मर्त आम्हांस ग्राह्य आहेत असे म्हणण्यास सवड झाली असती. परंतु हा योग त्यांनी आणून दिला नाहीं यास आमचा नाइलाज आहे. मागील लेखातून या विषयाचे जें विवेचन झाले आहे त्यावरून स्वदेशासंबंधे ब्राह्मण जातीचे काय कर्तव्य आहे याबद्दलचे आमचे मतवाचकांस कळलेच असेल. आपल्या देशाची हल्लींची स्थिति कशी आहे, ती इतकी निकृष्ट होण्याचे कारण काय, व ती सुधारण्यास कोणत उपाय करावे याचा प्रत्येक सुशिक्षित मनुष्यार्ने विचार केला पाहिजे. परंतु त्यांतले त्यांतही जातिधर्मानें म्हणा, अगर पूर्व संस्कारानें म्हणा, ब्राह्मण लोकांवर व विशेषतः महाराष्ट्रांतील ब्राह्मण लोकांवर असले विचार करण्याची व मार्ग शेोधून काढण्याची विशेष जबाबदारी आहे असे आम्ही समजतो. ब्राह्मण ज्ञातीचे अर्थीत् ज्या लोकांनीं एकदा पुढाकार घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंशजाचे जर या जगात काहीं इतिकर्तव्य असले तर इंच होय. तुमच्या अंगांत ताकद नसली तर ती संपादन करा, उत्साह जात असला तर तो जाऊं देऊं नका; सारांश, कांहींही करा पण हें जें स्वदेशाचे मेोठे काम आहे, ह्यापासून पराङ्गमुख होऊं नका.