पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणेि त्यांची वेिद्या. २३३ असें होत नाहीं. ज्यानें त्यानें आपापल्या बुद्धीप्रमाणें स्थितिप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणें आपलें काम केलेंच पाहिजे. हें काम आम्हीं आजपर्यंत कितपत केले आहे याचा प्रत्येकानें विचार करावा. आमच्या मनांत जळत असलेले विचार इतर लोकास कळविण्याची आम्ही कधीं खटपट केली आहे काय ? अथवा परकी लोक आमच्या धमीची व आमची एकसारखी निंदा करीत असता आम्ही त्याचा काई प्रतिकार केला आहे काय ? नाहीं. मग उगीच राज्यकत्यांच्या नांवानें खडे फोडण्यात काही हंशील नाहीं. आम्ही पंगू तर खरेच; पण मनात आणिल्यास परमेश्वरसतेनें अद्यापही हिमालय नाहीं तरी सह्याद्रि तरी चढून जाऊं; पण तशा उद्योगास कोणीच लागलेला दिसत नाहीं. आजमित्तीस निरनिराळीं सार्वजनिक कामें करण्याकरिता राहिलेल्या मंडळीचे शंकडों मठ अगर संस्था निघावयास पाहिजे होत्या; व जपानी लोकाप्रमाणें परदेशात जाऊन निरनिराळे उद्योगधंदे आम्हीं धुडाळून आणावयास पाहिजे होते. परंतु आजपर्यंत ही गोष्ट कैली नाहीं म्हणून अद्यापही ती करण्याची वेळ राहिली नाही असे नाहीं. अद्यापही पुष्कळ गोष्टी होण्यासारख्या आहेत. मात्र त्याकरिता मोठमोठे मठ अगर संस्था निघून त्यांनी निरनिराळ्या दिशानी लोकास जागृत करण्याची आणि त्यांची स्थिति सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमची या बाबतीत महाराष्ट्रावर विशेष भिस्त आहे हे सागावयास नकोच. देशहिताकरिता भगवीं वस्ने धारण करण्याचा मार्ग महाराष्ट्रीयास अपरिचित आहे असे नाहीं, व तोच कित्ता जर त्यांनी पुढे वळविला तर सिव्हिल सर्विहसची परीक्षा इंग्लडात घेतली अथवा कापसाच्या मालावर जकात बसवून आमचा व्यापार विनाकारण कमी करण्याचा सरकारनें प्रयत्न केला तरी त्यापापून आमचे फारसे नुकसान व्हावयाचे नाही. साराश, देशहिताची जी जीं म्हणून कामे करणे शक्य आहे तीं करण्यास साल्व्हेशनिस्टप्रमाणे वाहिलेली मंडळी आमच्यात निघाली पाहिजे. खिस्ती मिशनरी लोकास कुळब्यामाळ्यात अगर महारापोरांत मिसळण्यास जर लाज वाटत नाही, तर आमच्या सुशिक्षित तरुण लोकांस ती का वाटावी हे आम्हांस कळत नाही. लोकात मिसळणे, त्याना त्यांच्या हिताच्या गोष्टी समजावून सागणें, परदेशांत जाऊन म्हणा अगर स्वदेशात राहून म्हणा जेणेंकरून आपले कल्याण होईल त्या सर्व गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करणें, आशा न सोडतां यावज्जीव एकसारखी दूरवर दृष्टि ठेवून उद्योग करणे आणि सर्वोस घेऊन पुढे जाणें हा खण्या देशहिताचा मार्ग आहे. हें काम जेव्हा आपले लोक करूं लागतील, अथवा याकरिता जेव्हा ग्रॅज्युएट रामदासी हिंदुस्थानात अगर इतर देशांत संचार करीत असलेले आढळण्यात येतील तेव्हांच आमच्या अंगी असलेल्या गुणांचा कांहीं विकास झाला तर होईल व स्थिति सुधारेल. नाहीपेक्षा परकीय राज्याखालीं क्षीणबल होत जाऊन अखेरीस रोमच्या विस्तृत राज्यातील प्रजेची २९