पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २२९ शौर्थाचा, साहसाचा अगर इतर गुणांचा हल्लीच्या राज्यांत कां विकास होत नाहीं याची आमच्या मताप्रमाणें जीं कारणे आहेत तीं वाचकाच्या लक्षांत आलीं असतील. ब्राह्मणाच्या गुणांचा हल्लीं विकास होत नाही ही गोष्ट प्रि. गोळे याच्याप्रमाणे आम्हासही मान्य आहे. आमचे एवढेच म्हणणे आहे की, ब्राह्मणांचीच अशी स्थिति झाली असे नाही, तर इतर जातींवरही परकीय राज्यामुळे असाच प्रसंग आलेला आहे; व त्यांतून आपली सुटका करून घ्यावयाची असल्यास जेणेकरून आमच्या हातून हल्लीं उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा उपयोग होईल, व सर्व जातीच्या लोकांस आपल्या पूर्वजाच्या धंद्याचीं, धाडसाची, चतुराईचीं अगर शहाणपणाची थोडींबहुत कामें करिता येतील, असे उपाय आम्ही योजले पाहिजेत. त्यातूनही ब्राह्मणांवर विशेष बोजा असा आहे की, त्यानीं हे उपाय कोणते ते वाचेनें व कृतीने आपल्या देशबाधवाच्या मनान भरवून दिले पाहिजेत. देशस्थितीचा विचार करून ती सुधारणेच योग्य मार्ग केोणते हे लोकांस समजावून देणें व त्या मार्गाकडे त्यांची प्रवृत्ति करणें हेंच देशातील सुशिक्षित लोकाचे मुख्य कर्तव्य आहे; व ब्राह्मण जर आपणांस सुशिक्षित म्हणावतात तर त्यानीं ही गोष्ट पहिल्यानें केली पाहिजे नाहीपेक्षां प्रि. गोळे यांनीं भाकित केल्याप्रमाणें त्याचे तेज लौकरच नाहीसें होऊन त्यांस श्ववृत्तीतच दिवस काढावे लागतील. हल्ली अशी स्थिति आहे कीं, ब्राह्मणवर्गातील कोणाही शहाण्या वृद्ध मनुष्यास असें विचारिलें की काय हो, आपण आजपर्यंत काय केलेत, तर शेंकडा नव्याण्णव हिस्से त्याच्याकडून उत्तर येईल कीं, “ राजसेवा करून द्रव्यार्जन केले, संसार चालविला व राजदरबारात प्रतिष्ठा मिळविली. ” परंतु परवा मि. वीरचंद गाधी यानी आपल्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणें अमेरिकॅत अशा प्रकारच्या वृद्ध गृहस्थास लागलीच असा उलट जबाब मिळेल की “ अहो, सरकारची नौकरी केली यात आपण काहीं मोठी कर्तबगारी केलीत असे नाहीं. आपला देह विकला होता, पण तो आता निरुपयोगी झाल्यामुळे सरकारने मोकळा केला आहे. देशाकरिता अगर स्वतंत्र रीतीनें दुसरें काही केलें असल्यास सागा. ” आमच्याकडच्या सुशिक्षित व पुढारी लोकांच्या विचारात व अमेरिकेसारख्या सुशिक्षित व स्वतंत्र पुढारी लोकाच्या विचारांत जें अंतर आहे तें हेंच. असो; आता केोणी असा प्रश्न करतील की, “ तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे. देशांतील सुशिक्षित लोकांनी साहसाची कामें करण्याची संवय ठेविल्याखेरीज अथवा तीं त्यांस करावयास सापडल्याखेरीज त्याच्या अंगी तेज रहावयाचे नाहीं; पण हीं कार्मे त्यांस करावयास मिळावीं कशीं ? तुम्हीच म्हणता कीं असल्या प्रकारचीं सर्व कामें इंग्रज लोकानीं आपल्या हातांत ठेविली आहेत, आणि युक्तिवादानें या अधिकाच्यांचीं मने वळविणे अशक्य आहे, तर मग काय आम्ही बंड करावें ?” आमचे असा प्रश्न विचार