पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RRと लो० टिळकांचे केसरींतील लेख अशी स्थिति असल्यामुळे सर्व जातीच्था लोकानींच विलायतसारख्या परदेशांत गेल्याखेरीज आतां गत्यंतर नाहीं. विलायततल्या लष्करी कॉलेजांत मराठे लोकांस घेत असले तर त्यांनीं तेथे गेले पाहिज, व त्याचप्रमाणे भाटे, गुजराथी, मारवाडी वगैरे व्यापारी लोकांनीही विलायतस आपल्या पेढ्या करून आमच्या देशांतले गहू विलायतत विकण्याकरितां जेो युरोपियन व्यापारी नफा खातात तो आपल्या पदरात पाडला पाहिजे. परंतु हें सर्व काम आजमितिस सुशिक्षित ब्राह्मणांनींच पुढाकार घेऊन केले पाहिजे. म्हणजे ब्राह्मणांनींच उदमी व्हावे असे आम्ही म्हणत नाही; कारण आमचे असें मत आहे की, सुशिक्षित ब्राह्मण लोक अशा प्रकार जेव्हा सर्व जातीचे धेदे आपणच करण्याची इच्छा धरतील तेव्हां इतर जातींचा त्याच्यावर जे काहीं थोडाबहुत विश्वास आहे तोही नाहींसा होईल. सर्व धंद्यांची सुधारणा होणें व त्या त्या धंद्यातील जेोखमीचीं व कर्तबगारीचीं कामें आपल्या हातांत येणें याचा खरा अर्थ आमच्या देशाच्या मानानें पाहिला तर असा आहे कीं, हे धदे ज्या जातींतील लोक करितात त्या सर्वोशीं मिळूनमिसळून त्या सर्वाचा उत्कर्ष करण्याची इच्छा ब्राह्मणानी मनात ठेविली पाहिजे. निष्काम पुढारीपणा पत्करण्याचे रहस्य यांतच आहे. व तसा पुढारीपणा आमच्या सुशिक्षित वर्गापैकीं फारच थोड्या लोकानीं पत्करला आहे; किंबहुना कोणीच पत्करला नाही असे म्हटले तरी चालेल. आमचे काहीं लेोक विलायतेहून जाऊन आले आहेत. पण त्यापैकीं बहुतक असे आहेत की, त्यांची येथे कोठे डाळ शिजेना म्हणून विलायती पदव्या घेऊन येथे आले. अशा लोकांकडून कोणत्याही प्रकारची सुधारणा होणे शक्य नाहीं. किंबहुना ते त्याकरितां विलायतस जातही नाहीत. बॅरिस्टर होऊन विलायतहून आले म्हणजे काहीं विलायती संवयी त्यांस लागतात यापेक्षां दुसरा कोणताही फायदा होत नाही. असे; यांच्याशीं आपणांस तूर्त काही करावयाचे नाही. आमचे एवढेच म्हणणें आहे की, व्यापार, उद्योगधंदे अगर निरनिराळ्या खात्यातील मोठमोठया नोकया यात जर आपला प्रवेश होऊन उत्साहाची व कर्तबगारीचीं कामें (शक्य असतील तेवढींच) आपणास मिळावयास पाहिजे असतील तर ती गोष्ट साध्य होण्यास हल्लीं जे द्वार खुलें आहे तेथेच आपणास पहिल्यानें गर्दा केली पाहिजे. हा विचार आमच्या सुदैवाने काही लोकाच्या मनात येऊं लागला आहे; पण अद्याप त्याची जितकी चर्चा व्हावयास पाहिजे तितकी झालेली नाहीं. करितां हाच विषय पुन्हा घेऊन या संबंधाने आम्हांस आणखी जे कांहीं विचार सांगणें आहेत ते पुढील खेपेस सांगूं. ( नंबर ६ ) आजपर्यंत या विषयावर आम्हीं जे लेख लिहिले त्यांवरून पूर्वीच्या राज्यांत उदयास आलेल्या ब्राह्मणादि कारकुनी पेशांतील लोकांच्या बुद्धीचा,