बहिष्कार ९ व तेो राजाकडे न जातां लोकांकडे आला. अशा त-हेर्ने राजा, धर्माध्यक्ष व लोक असे तीन निरनिराळे विभाग होऊन त्याप्रमाणेच शिक्षेचेही झाले. इंग्लंडात पूर्वी पाद्री लेोकांचा हात ज्यांत त्यांत असे; म्हणजे जातकादि संस्कारांपासून तों अगदीं वारसाची निवडानिवड होईपर्यंत. पण पुढे विद्येचा प्रसार अधिकाधिक होऊन त्यांतील बहुतेक अधिकार दिवाणी कोडतास प्राप्त झाले. कांहीं देशांत तर पाद्रीसाहेबांकडे आतां कांहींएक उरलैं नाही. म्हणजे लग्नेसुद्धां जमिनीच्या देवघवीप्रमाणे रजिस्टर करितात; व हाच प्रकार उत्तरोत्तर इकडेही घडून येण्याचीं चिन्हें दृष्टीस पडू लागली आहेत. पूर्वीचा प्रकार म्हटला म्हणजे वर सांगितल्याप्रमाणें “ निषेकाद्या: स्मशानांतास्तेषां वै मंत्रतः क्रियाः ” हा होय. पण या पेोडश संस्कारांपैकीं हल्लीं आपण कितीसे पाळतों ? लग्न, मुंजखेरीजकरून बाकी बहुतेक नाहीसे झाले म्हटल्यास चालेल, व जे राहिले आहेत त्यांची सुद्धा कालेकरून तीच व्यवस्था होण्याची रंग दिसत आहे. आणि इतिहासावरून पाहता या धर्मसंस्कारांच्या उहासाची प्रवृत्ति बंद करणें प्रायः दुरापास्तच होय. एकदा लोकांचे मनाचा कल कळल्यावर त्याचा प्रतिरोध करणारानें ** क ईप्सितार्थस्थिरनिश्वयं मनः पयश्व निम्नाभिमुखं प्रतीपयेत् ” या कालिदासोक्तीचे मनन करून मग आपल्या कार्यास लागणें उचित होय ! येवढ्यावरून इतकें लक्षात येण्याजोगे आहे कीं, इतर राष्ट्रांप्रमाणेच आपल्या राष्ट्राची या कलियुगांत धर्मविमुखता दृष्टीस पडू लागली आहे, व हिचा प्रतिरोध करणेंही कठीण आहे. तर अशा वेळेस राजकीय व धार्मिक शिक्षाचे फारखत होतांना ज्याप्रमाणें बहिष्काराचे काळेपाणी हें राजकीय रूपातर झाले, त्याप्रमाणेच आता व्यावहारिक रूपांतर होण्याचे वेळी आपले हातात जेो शिक्षा देण्याचा अधिकार आहे तो घालवू न देण्याविषयीं आपण जपले पाहिजे व अशीच गोष्ट इतर राष्ट्रांतही घडून आली आहे. या बहिष्काराचे व्यावहारिक रूपांतर हल्ली जेो ऐलेडात दंगा चालंला आहे त्यात दृष्टीस पडते. लेंडलीग म्हणून जी सभा आहे त्या सभेर्ने पुष्कळ जमीनदार लोकांस बहिष्कृत केले आहे. तर अशाच तञ्हेनें जर या वेळेस आपल्याकडे बहिष्काराचे रूपातर होईल तर त्यापासून पुष्कळ फायदा होईल. दारूपिणारास बहिष्कृत करावे आणि भांग, गांजा, अफू यथास्थित सुरू राखावी काय ? अशा लोकासही कां बहिष्कृत करूं नये ? धमीची सबब इतर सर्व बाबतीत जर इतकी जारीनें सुरू नाहीं तर येथे मात्र तिचा एवढा प्रभाव कां ? एकदां बहिष्कारास व्यावहारिक शिक्षेचे पुरै रूप मिळाल्यास त्यापासून आपणांस किती उपयोग करून घेतां येईल ? आज ज्या हजारों गोष्टी धमविरुद्ध नसतांही आपल्या नुकसानीस कारण होतात त्यांचा चांगला बंदोबस्त करितां येईल, व असे करणे म्हणजे फारसें कठीण आहेसें नाहीं. बहिष्कारास राजकीय रूप तर प्राप्त झालेच; मग त्यास व्यावहारिक कां देऊं नये हें आम्हांस समजत नाहीं. २
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/24
Appearance