पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ ० लो० टिळकांचे केसरींतील लेख फटकळास किंवा वाटेल त्यास शिव्या देत सुटणाच्या वेडेपिरासही सुरगुरूच्या वर्गात ओढावा लागेल. असो; प्रि. गोळे यांच्या ग्रंथात आमच्यामतें जो ग्राह्यांश आहे तो मार्गे आम्हीं सांगितलाच आहे. याखेरीज दुस-या ज्या कित्येक गोष्टी त्यांत सांगितल्या आहेत त्याचा विचार तूर्त तहकूब करून ब्राह्मण ज्ञातीच्या उहासाचीं कारणें काय, व तीं निवारण्याचे उपाय कोणते हा जेो महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या ग्रंथाच्या नांवावरून त्यानी लोकांपुढे मोडिला आहे त्याकडे वळू. परकीय राजसतेमुळे जें ब्राह्मणवगसि औदासिन्य आले आहे तें नुसत्या शिक्षणक्रमांत फेरफार केल्याने दूर व्हावयाचे नाहीं हें गेल्या अंकीं सांगितलल्या गेोष्टींवरून वाचकाच्या लक्षांत आलच असेल. प्रि. गोळे म्हणतात त्याप्रमाणे सकलगुणसंपन्न एखादी शाळा निघून त्यांत पांच विद्यार्थी तयार झाले असें समजूं ; व त्यापैकीं प्रत्येक विद्यार्थी कालिदासाने वर्णन केल्याप्रमाणें ‘‘ युवा युग न्यायत बाहुरंसलः । कपाटवक्षा: परिणद्धकंधरः । ” असा आहे असेही मानुं; परंतु त्याची पुढे वाट काय ? त्यापैकी एखादा पुढे नौकरीत शिरल्यास तो फस्र्टक्लास सबॉर्डिनेट होईपर्यंत बहुतक नि:सत्त्व होऊन निघावयाचा. अथवा दुसरा स्वतंत्र धेदा काहूं म्हणेल तर तिकडूनही त्यास अशाप्रकारची थप्पड मिळावयाची. देशांतील प्रजा शौर्योत्साहवान होण्याचीं सर्वच द्वारे जेथ बंद झालीं आहेत तेथें प्रेि. गोळे यांच्या कल्पनासृष्टीनें निर्मिलेली एकादी टुमदार शाळा निघाल्यानं काय होणार ? आमच्या अंगातील तेज, पराक्रम, उत्साह, ओज, पैौरुष, शौर्य किंवा साहस आदिकरून गुणाची आमच्या राजकत्यांस अपेक्षाच उरली नाहीं; व या गुणांची आमच्या लेोकाच्या अंगात वृद्धि व्हावी अशीही त्यांच्यापैकी कोणाची उत्कट इच्छा नाही हे निर्विवाद आहे. या अशा राज्यव्यस्थेचा पुढे काय परिणाम होणार याचे भाकित करणे फारस कठीण नाहीं. ज्या लोकानीं इतिहासांत एकदां आपलें नांव गाजविलें आहे असे लोक व जाती कालचक्रांत सांपडून गाईप्रमाणे झाल्याची उदाहरणें जगाच्या इतिहासांत नाहीतशीं नाहीत. युरोपात हॉलंड आणि पोर्चुगाल हे देश जरी स्वतंत्र आहेत तरी तेथील लोकांत साहसादि गुण पूर्वीप्रमाणें राहिले नाहीत हैं सुप्रसिद्ध आहे; पण असलीं उदाहरणे शेोधण्यास इतकें लाब जावयास नको. जे जैन अगर लिंगायत लोक हल्लीं व्यापारांत गढलेले आढळतात तेच काहीं शतकांपूर्वी मोठे विद्वान, व बुद्धिवान होते असें पूर्वेतिहासावरून दिसून येतें. रजपूत लोकाची हल्लींची स्थितिही अशाच प्रकारची आहे. ज्या लोकांनीं स्पाटन लोकापेक्षांही अधिक शैौर्याचीं कार्मे केली, त्याचेच वंशज त्यास त्यांच्या स्वभावानुरूप काम मिळत नसल्यामुळे आपापल्या जागीं कुजत पडले आहेत. इंग्रज राज्यकर्ते त्यांस कारकून होऊन आपली स्थिति सुधारण्यास सांगत आहे; पण एकासही कर्नल अगर मेजर करण्यास तयार नाहीत. रजपूत लोकांनी अद्याप आमच्या दयाळू सरकारचा उपदश घेतला नाहीं; व कदाचित् तो घेणेंही त्यांस कधींच सर्वशीं पसंत पडणार नाहीं. अशा स्थितीत आम्ही पुढे