पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ लो० टिळकांचे केसरींतील लेख करण्याची संधि कधींच येत नाहीं. फार लांब कशाला ? खुद्द शिवाजीमहाराज या कालात जन्मले असते तर त्यासही सुभेदार मेजरपक्षी वरच्या पदवीची जागा मिळाली नसती. सारांश, हा कालच असा आहे कीं, उत्साह उत्पन्न करण्यासारखें किंवा अंगीं असलेल्या उत्साहास अनुरूप असें एकही काम मिळू नये. हिंदुस्थानचे येवढे मोठे अवाढव्य राज्य चालले आहे, पण त्याच्या राज्यसूत्रातील अर्धे पाव तरी आपणास हलवावयास मिळतै आहे काय ? राष्ट्राचा उत्साह कायम ठेवण्यास त्या त्या राष्ट्रातील लोकाच्या हातून मोठमोठीं कार्म करण्याची सवय नेहमी कायम ठेविली पाहिजे. तसा प्रकार इंग्रजी राज्यांत बिलकूल घडून येत नाहीं. इग्रज लोकापेक्षा सामथ्र्याने अगर हुषारीनें आम्ही पुष्कळच कमी आहोंत; पण हे सामथ्र्य व हुषारी जेणेकरून आमच्यात येईल असे उपाय योजणें हें हिंदुस्थानच्या हितासाठी येथे अवतीर्ण झालेल्या दयाळू सरकारचे काम होतें, जेथें स्वराज्य आहे अशा जपान देशातील सरकारनें हैं। आपलें कर्तव्य बजाविलें आहे. जपानी लोक आमच्यापेक्षां कांहीं जास्त सशक्त, हुषार अगर सधन आहेत असें नाही. पण तीस वर्षात जपान सरकारनें जें काम केलें तें जर हिंदुस्थान सरकारास करिता येत नाहीं तर यातील बीज कांहीं निराळे आहे असे होत नाहीं काय ? आमच्या एकंदर समाजात एकंदर इंग्लिश समाजापक्षी उत्साहादि गुण कमी असतील; पण हल्ली चीहींकडे जी उत्साहशून्यता आढळून येते ती आमची स्वाभाविक नसून सर्व राष्ट्रावर जें एक मोठे अभ्र आले आहे त्याचा हा परिणाम आहे असें थोड्या विचारातीं कोणासही दिसून येईल. ब्राह्मण, मराठे, रजपूत, शीख, बंगाली अगर मद्रासी कोणतीही जात घेतली तरी ही स्थिति नजरेस येते. इंग्रजी राज्यापूर्वी मराठेशाहींत महाराष्ट्रब्राह्मण राज्यकारभार पाहात होते म्हणून राजातरामुळ त्याची स्थिति इतर ज्ञातींतील स्थितिपेक्षां अधिक निकृष्ट झाली आहे हें खरं आहे, पण तीईो शिक्षणक्रमामुळे नव्हे, आमच्याकडील शिक्षणक्रमच बंगाल्यात व मद्रासंत आमच्यापेक्षां अधिक वर्षे चालू आहे; पण बंगाली व मद्रासी ब्राह्मणाच्या बुद्धीचा अगर उत्साहाचा उहास झाला असे त्यांस वाटत नाही. उलट इंग्रजी राज्यांत त्यांची स्थिति थोडीबहुत सुधारली आहे असे म्हटले असता चालेल. हे असें कां व्हावें याचे कारण उघड आहे, इग्रजा राज्याचा जो थोरला वरवंटा देशावर फिरविला जात आहे त्यामुळे उंच झाडाची डोकीं ठेचून गेली आहेत; व हें राज्य होण्यापूर्वीच जीं कमी उंचीची झाडे होतीं त्यास इंच दोन इंच वाढण्यास सवड मिळाली आहे, त्यामुळे काहीं जातींत थोडासा उत्साह राहिल्यासारखा दिसत आहे, पण तोही कांहीं कायमचा नव्हे. सर्व हिंदुस्थान देशभर झाडाची उंची नियमित व एकसारखी राहून इंग्रजी अंमलदार हींच काय ती मोठमेाठी उंच झाडें मध्ये राहावीं, बाकी कोणीही डोकें वर काढू नये असा इंग्रजी राज्यपद्धतीचा जो वरवंटा ऊर्फ रोलर आमच्या देशावर फिरत आहे त्याचा परिणाम