पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ लो० टिळकांचे केसरींतील लेख णांस इंग्रजी राज्यापूर्वी जें महत्त्व प्राप्त झाले होतें तें शास्राभ्यासामुळे नव्हे, तर आपल्या बुद्धीचा त्यांनीं कारकुनीच्या किंवा ज्यास इल्लीं अॅड्मनिस्ट्रेटर असें म्हणतात त्याच्या कामात उपयेोग केल्यामुळे झाले होतें. हल्लीं ज्याप्रमाणें इंग्रजीराज्य, सिव्हिलसर्टिहस किवा सनदी नोकर यांजवर अवलंबून आहे असें मानितात, तद्वतच मराठी राज्याची भरभराट मराठी सरदारांच्या तलवारीवर आण महाराष्ट्र ब्राह्मणाच्या कारकुनीवर अवलंबून होती. कारकून हा शब्द येथे लिहिणेंवाचणे किंवा जमाखर्च ठेवणें हें काम करणारा अशा अर्थानें वापरलेला नाहीं. खया लेखणीचे काम याहून फार निराळे आहे, व अलीकडच्या काळांत तें काम इंग्रजी सरकारचे युरोपियन नसदी नोकर बजावीत आहेत. राज्याचे हिताहित कशांत आहे, आपल्या सभोवार कोणती स्थिति आहे, राज्याची अंत. व्र्यवस्था कोणत्या रीतीनें ठेविली पाहिजे, परकीय राज्याशी संबंध कसा ठेवावा, लढाई केव्हां द्यावी व केव्हां देऊं नये इत्यादि पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय करण्याचे काम मराठी राज्यांत ब-याच अंशीं ब्राह्मणवर्गाकडे होतें; व तें काम बजविण्याच्या कामीं त्यानीं बरीच हुषारी, उमेद आणि कर्तबगारी दाखविली, इतकेंच नव्हे तर प्रसंगविशेषीं तलवार हातीं धरूनही आपले हेतु तडीस नेले. मराठे लोकापैकीं महादजी शिंद्यासारखे काहीं गृहस्थ असल्या मुत्सद्दीपणात झाले होते, नाही असें नाहीं; पण स्थूल मानानें विचार केला असतां असे आढळून येईल कीं, ब्राह्मणाची लेखणी आणि मराठ्याची तलवार या दोघाचेही मराठी राज्य कांही दिवस चालण्यास सारखेच साहाय्य होते. हल्लीं विलायतेहून येथे आलेला गोरा कामगार मुंबईहून कलकत्त्यास, कलकत्त्याहून सिमल्यास आणि सिमल्याहून मद्रासस गेलेला पाहून आम्हांस मोठे आश्चर्य वाटतें. पण एकदा अशी वेळ आली होती कीं, महाराष्ट्रातील ब्राह्मणगडी कलकत्ता, दिल्ली, लाहेर, अटक, म्हैसूर आणि जिंजी पाहून आले होते. इतर प्रांतांतील ब्राह्मणांस अशी संधि त्या वेळी मिळाली नव्हती म्हणून म्हणा, अगर दुस-या काहीं कारणाने म्हणां, इंग्रजी राज्य होण्यापूर्वी पंजाब, औध, बंगाल आणि मद्रास वगैरे ठिकाणचे ब्राह्मण त्या कालीं अशा रीतीनें योग्यतेस चढले नव्हते. महाराष्ट्र ब्राह्मणांपेक्षां ते बुद्धीनें कमी होते अगर आहेत असे नाहीं. पूर्वीचे सर्व मोठमेोठे शास्री बंगाल्यांतील व मद्रासेंतील आहेत. पण महाराष्ट्र ब्राह्मणांस (ब्राह्मण म्हणजे मार्गे सागितल्याप्रमाणे सर्व कारकुनीपेशाच्या जाती समजावयाच्या) जी संधि मिळाली तशी त्यास मिळाली नसल्यामुळे इंग्रजांनी इतर प्रांत काबीज केले, तेव्हां त्या त्या प्रांतांतील ब्राह्मण कारकुनीपणांत अगर मुत्सद्दीपणांत तरबेज होऊन योग्यतेस चढले नव्हते. हें सांगण्याचे कारण येवढेच कीं, मराठी राज्य जाऊन इंग्रजी राज्य आल्यानें आपली योग्यता व महत्त्व जितकें कमी झाले असें महाराष्ट्र बाह्मणांस वाटण्याचा संभव आहे त्या मानार्ने इतर प्रांतांतील ब्राह्मणांस वाटण्याचा संभव नाहीं. गुजराथ, पंजाब, औध, बंगाल वगैरे प्रांतांतून सध्याही ब्राह्मणांचे