पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २११ वगोशीं व इतर प्रांतांतील ब्राह्मणांशीं व ब्राह्मणेतर वर्गाशीं तुलना करून पहावयास पाहिजे होती. रामशास्री, थोरले बाजीराव, नाना फडणीस, सखाराम बापू, बाजी देशपांडे, यासारखें कर्ते पुरुष आता निपजत नाहींत ही गोष्ट खरी आहे; पण त्याजबरोबर असाही विचार करावा लागतो, कीं, श्रीशिवाजीमहाराजांची गोष्ट सोडून दिली तरीही तानाजी, धनाजी, संताजी, जनकोजी, महादजी, यांसारखें शूर मराठे तरी कां उत्पन्न होऊं नयेत ? अथवा शूर पुरुषांची गोष्ट राहू द्या. या इंग्रजी राज्यात साधूसंत होण्यास तर काहीं हरकत नाहीं ना ? पण ते तरी कोठे आहेत ? ब्राह्मणही नाहींत आणि शूद्रही नाहीत. फार लाब कशाला ? गोधळी आणि तमासगीर यांच्या जातींत पाश्चात्य विद्येचा अजून काही प्रसार झाला नाहींना ? पण चमत्कार पहा कीं, चागले पोवाडे किवा लावण्या करणारा शूद्र कविही सध्यां दृष्टोत्पत्तीस येत नाहीं. हिराजीनें रायगड येथील जगदीश्वराचे देऊळ बाधिलें, व पुण्यांतील नळाची कार्मेही आपल्याकडील मेस्त्र्यानींच केलीं असा इतिहास आहे; पण तेही आतां नाहींसे झाले. पाश्चात्य शिक्षणक्रमानें या जातींतील लोकांचीं मनें अथवा शरीरें उहास पावलीं आहेत असे म्हणण्यास मुळीच आधार नाहीं हें प्रि. गोळे स्वत: कबूल करतील. मग हा जो सर्वच जातींचा एकसारखा उहास होत आहे याचे कारण शिक्षणक्रमाहून काहीं तरी भिन्न असलें पाहिजे असें सहजच अनुमान करावे लागतें परंतु याहीपेक्षां या अनुमानास जास्त पुरावा पाहिजे असल्यास तो इतर इलाख्यातील लोकांच्या स्थितीकडे पाहिले असता मिळेल. हिंदुस्थानात इंग्रजी राज्य होण्यापूर्वी महाराष्ट्रातील पांढरपेशे लोकाची स्थिति इतर प्रांतातील पाढरपेशे लीकाच्या स्थितीपेक्षां विशेष भरभराटीवी व अमदानीची होती. या ब्राह्मणाचा धंदा विद्यार्जन होता असें प्रेि. गोळे याचे मत आहे; पण आमची समजूत याहून जरा निराळी आहे. * विद्याव्यासंग' या शब्दानें जर शास्राभ्यास, अध्ययन, अध्यापन आदिकरून व्यासंग ध्यावयाचे असतील तर महाराष्ट्र ब्राह्मणांचे व्यासंग याहून त्या काळीं फार निराळ्या तन्हेचे होते. देशस्थ, कोकणस्थ, -हाडे, शेणवी, परभू वगैरे जे काहीं कारकुनीपेशाचे लोक मराठी राज्यांत उदयास आले ते वेद घेोटून नव्हत किंवा शास्राध्ययन करूनही नव्हत; शास्राभ्यासासंबंधानेंच पहावयाचे असल्यास महाराष्ट्रापेक्षा द्रविड देशात अगर बंगाल्यात तो अधिक जारीनें चालू होता. किंबहुना शास्री, पंडित आणि वैदिक त्या कालीं महाराष्ट्राबाहेर जितके सांपडले असते तितके महाराष्ट्रांत सांपडणे कठीण होते. पेशवाईच्या अखेरीस काहीं चागले शास्री व पंडित येथे होऊं लागले होते; व स्वराज्याचे छत्र आणखी काही दिवस पहिल्याप्रमाणेच कायम राहिले असतें तर त्या छत्राखालीं खया शास्त्राध्ययनास आणखी उत्तजन मिळालें असतें; परंतु त्याचा विचार आपणांस येथे कर्तव्य नाहीं. आमच्या म्हणण्याचे तात्पर्य येवढेच आहे कीं, महाराष्ट्र ब्राह्म