पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० लो० टिळकांचे केसरीतील लेख आढळण्यांत आला नाहीं. या प्रश्नाचे महत्व किती आहे हें पुढील खेपस दाखवू. आज जें विवेचन केले येवढ्यावरून इतकं दिसून येईल कीं, ब्राह्मणांच्या उहासास सुधारक बालविवाहाचे जसें कारण दाखवितात तद्वतच शिक्षक लोक त्याचा दोष शिक्षणक्रमाकडे देतात; व दोहामध्येंही एकदेशीयत्वाचा दोष सारख्याच मानार्ने बसंत आहे असे म्हटले तरी चालेल. हा दोष टाळून व्यापक दृष्टीनें या प्रश्नाचा कसा विचार केला पाहिजे हें पुढील खेपेस सांगूं. ( नंबर २. ) प्रि. गोळे यानीं आपल्या ग्रंथांत केलेले ब्राह्मणसमाजाच्या निकृष्टावस्थेचे निदान एकदेशीय आहे असें गेल्या अंकी दाखविलेंच आहे. आज हे निदान योग्य रीतीनें ठरविण्यास कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिज त्याचे विवेचन करण्याचा हेतु आहे. एखादी इमारत सर्वच खचली असता ज्याप्रमाणें त्या इमारतीचा एखादा विशिष्ट खाबच का खचला याचा स्वतंत्र रीतीनें उहापेोह करणें अशक्य आहे त्याप्रमाणेच प्रस्तुत विषयाची स्थिति आहे. प्रि. गोळे यांनीं सामान्यत: महाराष्ट्र देशातील ब्राह्मण म्हणजे पाढरपेशे उर्फ विद्याव्यासंगी वर्गाच्या निकृष्ट स्थितीचे वर्णन केले आहे. त्याच्या म्हणण्यातील सारांश असा आहे कीं, इंग्रजी राज्यापृर्वी अगर अव्वल इंग्रजीत ज्याप्रमाणें उत्साहयुक्त, धीराचे व उमेदीचे कर्ते पुरुष होऊन गेले तसे आता कोठे दिसत नाहीत. जो पहावा तो शरीरानें आणि बुद्धीने खुरटलेला. कोणास एखादा मोठा राजवाडा, रेलवे अगर पूल बाधावयाचा असल्यास युरोपियन इंजिनियर आणावा लागतो; केोणी मोठा मनुष्य आजारी पडला की, बोलाव युरोपियन डॅॉक्टर, आणि एखादै हिमतीचे काम करावयाचे असल्यास, मग तें शास्त्रीय शोधाचे असो, शिक्षकाचे असो वा सेनानायकाचे असो, त्यासही युरोपियनाचेच साहाय्य ध्यावें लागतें. प्रि. गोळे यांनी जी ही स्थिति वर्णन केली आहे ती अगदी बरोबर आहे. या वस्तुस्थितीबद्दल त्यांचा आमचा मतभेद नाहीं; परंतु आमच्यामतें या उत्साहशून्यतेची कारणें मात्र अगदीं निराळीं आहेत. प्रि. गोळे यांच्या दृष्टीच्या टप्प्यांत तीं का आलीं नाहींत हें आम्हास सागतां येत नाही. तथापि खाली लिहिलेल्या गोष्टीवरून येवढे लक्षांत येईल कीं, ब्राह्मणवर्गाचा व्हास या महत्त्वाच्या विषयाचे जितक्या सूक्ष्म व विविध दृष्टीनें अवलोकन करावयास पाहिजे होतें तितकें प्रि. गोळे यांनी आपल्या ग्रंथात केलेलें नाहीं. वर सागितलेला इमारतीचा दृष्टात घेऊन पाहिला तर असें नजरेस येईल कीं, सर्वच इमारतीचा पाया खचन्टा असता त्यामुळे प्रत्येक खांबावर जेो परिणाम झाला तो लक्षांत घेऊन, मग त्याहूनही खांब विशेष खचलेला दिसत असल्यास मग त्याचे विशिष्ट कारण शेोधून काढणें शास्रदृष्टया आधक सोईचे व फायदेशीर आहे. अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे ब्राह्मणवर्गाची आमच्याच प्रांतांतील इतर