पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ लो० टिळकांचे केसरींतील लेख समाजासच काय, पण सर्व हिंदुसमाजास आज एक प्रकारची कुदशा प्राप्त झालेली आहे; व तिचा विचार न करितां केवळ ब्राह्मणांच्या निकृष्टावस्थेचे किंवा -हासाचे निदान ठरविणे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणें पुच्छग्राही अथवा पादग्राही आंधळ्यानें इस्तीच्या स्वरूपाची मीमांसा करण्यासारखे एकदशीय व चुकीचे आहे. आमच्याकडे हल्लीं चालू असलेला शिक्षणक्रम पुष्कळ सुधारण्यासारखा आहे ही गोष्ट आम्हांसही मान्य असल्याबद्दल वर आम्ही लिहिलेंच आहे; पण ब्राह्मणशातीचा व्हास एवढ्यानेंच होत आहे असे म्हणण्याचे साहस करून ग्रंथास व्यापकता आणण्याचा जो उपहासास्पद प्रयत्न प्रि. गोळे यांनी केला आहे तो न करितां हल्लींचा शिक्षणक्रम गैरसोईंचा व फुकट त्रासाचा आहे. करितां तो कोणत्या रीतीनें सुधारतां येईल येवढ्याच प्रश्नाचा जर प्रेि. गोळे यांनीं विचार केला असता तर त्यांचा ग्रंथ अधिक संबद्ध, मनोरंजक, शिस्तवार, अनुभवी व उपयुक्त झाला असता; किंबहुना त्या विषयावर प्रि. गोळे यांचे विचार लोकांमध्ये अधिक प्रमाणभूत मानिले गेले असते असें आम्हास वाटतें. पण ही विषयमर्यादा उल्लंघन करून ब्राह्मणज्ञातींच्या निकृष्टावस्थेचे प्रधान कारण हृल्लीचा शिक्षणक्रमच आहे असें सिद्ध करून देण्याचा ग्रंथकारानी जो आव घातला आहे त्यामुळे “ प्रांशुलभ्ये फले मोहादुब्दाहुरिव वामनः ” अशी त्याची स्थिति झाली आहे. (ब्राह्मणाची त्यांत सर्व कारकुनी पेशाच्या ज्ञातींचा समावेश केलेला आहे) स्थिति हल्लींच्या राज्यांत पूर्वीपेक्षां कमी योग्यतेची आहे हें सिद्ध करावयास विद्याथ्यांच्या वजनाचे किंवा उंचीचे प्रमाण नको आहे. त्याचप्रमाणें या निकृष्टावस्थेचीं कारणेही शेोधून काढून त्यांच्यापैकीं जीं परिहार्य असतील त्यांचा परिहार करण्याच्या उद्योगास आपण लागले पाहिजे, हेंही आतां बहुतेक लोकांस वाटू लागले आहे. प्रि. गोळे यांजसारखा विचारी व विद्वान् मनुष्याचा ग्रंथ आम्हीं प्रथम हातीं घेण्यास आमची ही वरील समजूतच कारणीभूत झाली; पण ग्रंथ समग्र वाचल्यानंतर एक प्रकारची निराशा झाली, आणि * स्वजातिर्दुरातक्रमा ’ अशी जी पंचतंत्रांत एक म्हण आहे त्याप्रमाणे शिक्षकाच्या धंद्यांत ज्याचे आयुष्य गेलें त्यांच्याच एकदशीय दृष्टीनें या महत्त्वाच्या प्रश्नाचा या ग्रंथांत विचार झालेला आहे; व त्यामुळेच ब्राह्मणांच्या -हासाचे बीज हल्लींच्या दुष्ट शिक्षणक्रमात आहे असा सिद्धांत प्रि. गोळे यांनीं काढला असावा असे वाटू लागले. प्रि. गोळे यांनीं पहिल्या एकदेन भागांत विषयास स्वरूप देण्याचा थोडाबहुत प्रयत्न केला आहे खरा; पण तो अगदींच अल्प व कोत्या विचाराचा आहे. पहिल्या भागांत विद्याथ्यांच्या शारीरिक -हासाचीं वर वर दिसणारीं कारणें या सदराखालीं अ, ब, क आणि ड अशा चार कारणांचा उपन्यास करून पैकीं तीन सयुक्तिक नाहीत असें दाखवून शेवटीं चौथे म्हणजे शिक्षणक्रमांतील दोष हेंच खरें कारण आहे असें मोठ्या युक्तीनें अनुमान केलेले आहे. हा अनुमानविधि तर्कशास्रदृष्टया अगदीं बरोबर आहे.एक कार्य घडून येण्यास चार कारणें असू शकतात असें