पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. R و ہ आपण कोठून निघालों व कोठे आलों याचा विचार करितां ब्राह्मणांच्या गरीब मुलांच्या अरुंद छातीच्या कारणाचा शोध करितां आपण अचूक प्रमदावनांत येऊन पडले असें नजरेस येतें; व सरतेशेवटीं तर आशावंत आणि अनुभवी हीं दोन नवीं नांवें धारण केलेले सामाजिक सुधारणेचे पक्ष आपल्यापुढे उभे राहतात आणि त्यांची भेट होऊन ग्रंथाची समाप्ति होते. तात्पर्य, ग्राह्मणवर्गीचा शारीरिक व मानसिक -हास व त्याचीं कारणें याचा काहीं तरी प्रि. गेोळ्याच्यासारखे अनुभविक गृहस्थ व्यापकदृष्टया विचार करतील अशा दृष्टीनें दोन तीनशें पार्ने वा चण्याचे जे श्रम वाचक घेतो ते बहुतक निष्फळ झाले अशा समजुतीनें ग्रंथ खालीं ठेवावा लागतेो. प्रि. गोळे यांचा शिक्षणक्रमाचा अनुभव बराच विस्तृत आहे हें वर सांगितलेंच आहे; परंतु असल्या एकदेशीय अनुभवानें त्यानीं हातात घेतलेल्या विषयाची मीमासा होणे अशक्य आहे. एका जुन्या ग्रंथात अशी गोष्ट आहे कीं, पांचसहा अांधळ्याची टोळी हत्ती काय पदार्थ आहे हें पाहण्यास निघाली मोठया शिकस्तीनें त्यांची आणि एका इतीची गाठ पडली. परंतु हत्तीचे विशाल स्वरूप नेत्रांनीं एकदम आकलन करण्याची बिचायास शक्ति नसल्यामुळे त्यांनीं निरनिराळ्या दिशेनें आपल्या स्पशेंद्रियांनीच हत्तीच्या स्वरूपाचा बोध करून घेण्याचा प्रयत्न केला. ज्याचे हातांत पाय सापडला होता तो हत्ती खाबासारखा आहे म्हणून म्हणू लागला; व ज्याचे हातास कान लागले तो उलट हृत्ती सुपासारखा असतो असे प्रतिपादन करूं लागला. या दोघाचा तंटा चाललाच होता; इतक्यांत ज्याच्या हातीं दांत लागले होते तो हत्ती खुट्यासारखा आह असें सागूं लागला; व पुच्छग्राही मनुष्य खुटीपेक्षा दोरखंडाशीं हत्तीचे अधिक साम्य आहे असा स्वानुभवावरून मोठ्या आग्रहानें इतरांशीं वाद करूं लागला. प्रि. गोळे यांची प्रकृत विषयासंबंधानें वरील आधळ्यांपैकीं केोणाशीं तरी तुलना केल्यास ती विशेष गैरशिस्त होईल असें आम्हांस वाटत नाहीं. वगीत मुलांस शिकवितांना त्यांच्या छातीच्या अरुंदपणाचा अगर उंचीच्या कमीपणाचाच ज्यांस अनुभव आलेला आहे, अथवा जी मुलें खालच्या यतेतून सतेज दिसतात तीच वर आली म्हणजे कशीं निस्तेज होतात यांचा ज्यांस प्रत्यही अनुभव घेण्याची संधि आहे व या पलीकडे विचारदृष्टया किंवा शारीरिकदृष्टया ज्यांनीं कांहीं पाहिलें नाहीं त्यांच्या मनांत ब्राह्मणाच्या शारीरिक आणि मानसिक -हासाचा व शिक्षणक्रमाचाच तेवढा संबंध यावा व त्या व्यतिरिक्त ह्याचे दुसरें कांही निदान असेल असे वाटू नये हें अगदीं स्वाभाविक आहे. ब्राह्मण शब्दांत प्रेि. गोळे म्हणतात त्याप्रमाणे सर्व कारकुनी पेशाच्या जातींचा संग्रह केला तर इंग्रजी होण्यापूर्वी या वर्गाची महाराष्टांत जी स्थिति होती त्यापेक्षा हल्लींची त्यांची स्थिति निकृष्ट आहे हें कोणीही कबूल करील; व या महत्त्वाच्या विषयाकडे प्रेि. गोळे यांनी लोकांचे लक्ष लावून दिलें याबद्दल त्यांचे आभारही मानिले पाहिजेत; परंतु प्रि. गोळे यांनी या निकृष्ट स्थितीचे जें निदान केले आहे तें मात्र आम्हांस कबूल नाहीं. ब्राह्मण