पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 с о लो० टिळकांचे केसरींतील लेख बी. ए.च्या परीक्षेस जीं पुस्तकें नेमिलीं आहेत त्यांचीं पार्ने चाळून मोजून पाहिलीं तीं पांच हजार भरलीं. साधारण बुद्धीच्या विद्याथ्र्यास देखील इतका अभ्यास मनासारखा होणें दुर्घट होय, हें आमच्या विद्याथ्यावर टीका करणारे अगदीं विसरून जातात, असा बिकट अभ्यासक्रम नेमिल्यामुळे अभ्यास नेमणाराचा इष्ट हेतु तर साधला नाहींच, परंतु त्याच्या उलट मात्र परिणाम झाला आहे. लॉजिक आणि मॅरिलफिलासफी हे विषय व इतर विषय घेतलेल्या विद्याथ्यांची गेल्या दोन वर्षातील संख्या ताडून पाहता सहज कळून येण्यासारखी आहे. तेव्हां विद्याथ्यांच्या नांवानें उगीच ओरड करण्यात काहीं अर्थ नाहीं. इतकीं कारणें बुद्धीचा उहास होण्यास असल्यावर तिचा उहास का होऊं नये हें कोणाच्यार्नेही सागवणार नाहीं. प्रेो. गोखले यानीं हा मुद्दा जगापुढ माडिला ही एक त्यानीं समाजाची मोठी नौकरीच बजाविली. त्याचे त्यानी काम केलें परंतु समाजातील विचारी पुरुषांना या विषयावर विसर पडता कामा नये. आज कोणताच निश्चय नाहीं, तत्रापि प्री. गोखल्यांनी वेळीच आपणांस जागे केलें आहे तेव्हा त्याचा खल झाला पाहिजे. खरोखरच आमच्या तरुण लोकांच्या बुद्धीचा उहास होत असेल व तो तसाच पुढे चालून आपल्या मुलाबाळांचे अकल्याण होत असेल तर त्यास परलोकीं सुद्धा सद्गति होईल कीं नाहीं याची शंकाच आहे. आता ही स्थिति दुरुस्त होण्यास काय उपाय योजावा हा प्रश्न राहिला. वर दर्शित केलल्या कारणापैकी काहीं कारणें दूर करणें हें आपल्या समाजाचे हाती आहे. त्या कारणाची अनेक वेळां चर्चा झाली आहे तेव्हां त्याचा येथे उल्लेख करावयास नकेो. युरोपियन लोक आम्हाविषयीं लिहूं अथवा बोलू लागले तर कळकळीने बोलतात खरें; परतु त्यांचे हातून आमचे कल्याण होण्यासारखी एकही कृति होत नाहीं. टाइम्स ऑफ इंडियाकर्ते व मुंबई गॅझिटकर्ते ह्यानीं एके ठिकाणीं बसून युनिव्हर्सिटीनें बी. ए. सारख्या परीक्षेचा अभ्यास किती गहन करून ठेविला आहे, शिवाय परीक्षक लोक जे प्रश्न घालतात त्यांत घालण्यासारखा कोणता व न घालण्यासारखा कोणता याचा त्यांनीं कधी विचार केला आहे काय ? आम्हास असें आठवतें कीं, नुकताच एका परीक्षकानें करन्सी कोणत्या तत्त्वावर असावी हा प्रश्न विद्याथ्याँस घातला होता. ह्यावरून त्या परीक्षकाचे तारतम्य केवढया किमतीचे आहे हें वाचकांस कळेलच. तेव्हां सर्व देशानीं हा अभ्यासक्रम विद्याथ्यांस डोईजड न होईल असा फेरफार झालाच पाहिजे.