पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ लो० टिळकांचे केसरींतील लेख दिलेल्या दोन सालापैकी एक साल खरें ठरविण्यास बखरींतील इतर प्रमाणांचा उपयोग करणें अगदीं स्वाभाविक आहे. पुष्कळ बनावट लेख अशाच रीतीनें उघडकीस येतात. प्रकृत स्थलीं हा दोष ज्यानें ग्रंथ लिहिला त्याचा नाहीं. कारण तसे असतें तर ग्रंथांतच पुढे त्यानें १७४० शक घातला नसता. ग्रंथारंभींही त्यानें १७४० च घातले असावे; पण मागाहून जांवई शेोध करणारे निघाले त्यांनीं १७४० तील ७ चे ६ व १८१५ तील ८ चे ७ केले; व पुढे संवत्सरांचीं नांवें जशींच्या तशीच राहूं दिलीं ! आमचे * इतिहासप्रिय ' वाचक अशा प्रकारचे जांवई शोध करणारापैकीच आहेत. कारण त्यांनी आपल्या पत्रांत ग्रंथांतील जो उतारा घेतला आहे त्यांत * विक्रमार्क संवत् १७७५......लिख्यते ? असा मधले दोन चार शब्द सोडून उतारा घेतला आहे; व हे राजेश्री आम्हांस असा प्रश्न करीत आहेत कीं, ** शके १६४० म्हणजे संवत् १७७५ होतात कीं, नाहींत ? मग चूक कोठे आहे ? बहुधान्य संवत्सर चुकला असेल, म्हणून काय झालें. १६४० व १७७५ असे दोन आंकडे चुकले म्हणण्यापेक्षां एक शब्द चुकला म्हणणें सेोपें नाहीं काय ?” हा केोटिक्रम पाहून आम्हास खरोखरच इसू येते; परंतु तें आवरून आम्ही * इतिहासप्रिय ’ वाचकांस असे सुचवितों कीं, १६४० व १७७५ हे दोन्ही अांकडे खरे मानल्यास बहुधान्यच चुकती असे नाहीं तर विरोधीही चुकतो; व पुढे सांगितलेले १७४० आणि त्याबरोबरच दिलेला गतकली भावी कल्पनेकरिता सांगितला आहे असें मानून समाधान करून ध्यावें लागतें. इतका खटाटेप करून स्वत:चे समाधान करून घेण्याइतकें ज्याचे तर्कशास्र मंद असेल त्यानें तें खुशाल करून घ्यावें. श्रीशिवछत्रपतीबद्दल आह्मांस कितीही अभिमान असला तरी नवा लेख जुना आहेसें भासविण्याचा आम्हीं प्रयत्न करू इच्छित नाहीं. खरोखरच कोणाजवळ जुने लेख असल्यास ते मोठ्या आनंदानें जुने आहेत असें कबूल करूं; पण श्रीशिवछत्रपतीच्या नावावर जुने आणि नर्वे एकाच मापानें लेखण्याची किंवा जुन्याचे नर्वे, अथवा नव्यानें जुने करण्याची आमची इच्छा नाही. जुन्या बखरी उपलब्ध असल्यास त्यापेक्षां नव्या बखरीची योग्यता पुराव्याच्या कामी सामान्यतः कमी समजली पाहिजे हें कोणी पोरही कबूल करील. इतक्या उप्पर ज्या गृहस्थाजवळ ही खबर सांपडली त्याजपाशीं तिचे जुनेपणाबद्दल जास्त कांही पुरावा असल्यास तो प्रकाशकानीं प्रसिद्ध करावा, म्हणजे त्यान कदाचित् वरील शेकेचे निराकरण होऊन वादाचे कारण राहणार नाहीं.