पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवदिग्विजय-स्फुट. १९५ वर्षानीं म्हणजे शके १७४० सालीं ती लिहिली असावी असें मत आमचे पत्रांत प्रसिद्ध झाले होतें; व तें प्रसिद्ध करतांना सदर बखरीच्या प्रकाशकास अगर मालकास कोणत्याही प्रकारें लावून न लिहिण्याबद्दल खबरदारी घेतली होती. पण एका * इतिहासप्रिय ? वाचकास आमचे हें करणें न आवडून त्यानें आपल्या ज्ञानाचा प्रकाश रामनवमीच्या मुहूर्तावर पाडिला आहे. या प्रकाशानें एखाद्याचे डोळेच दिपून जावयाचे; पण केसरीकारास असल्या खेोट्या प्रकाशाची ओळख ही पहिल्यानेच होत नसल्यामुळे त्यास त्याचे काहीं एक महत्त्व वाटत नाहीं. त्यातून नुसतें * इतिहासप्रिय ? वाचक म्हटले म्हणजे प्राय: सारासार विचारशून्य असावयाचे असा बराच अनुभव असल्यामुळेही असल्या लेखकाच्या तर्कशास्त्राचाही आम्हांस कांहीं बाऊ वाटत नाही. असी; आमचे काय म्हणणे आहे तें जरा जास्त स्पष्ट करून सागणें आतां जरूर आहे. श्रीशिवदिग्विजय हा ग्रंथ लक्षपूर्वक वाचणारास त्यांतील लोक, भाषा वगैरे गोष्टींवरून तो जुना नसावा अशी शंका येते. परंतु या नुसत्या शकेवरच आम्ही राहिली नाहीं. ग्रंथाच्या आरंभींच ** शालिवाहनार्क १६४० बहुधान्य नाम संवत्सरे तथा विक्रमार्क संवत १७७५ विरोधीनामाद्वे (द्वे ?) नर्मदा दक्षिण तटे लिख्यते ” असा ग्रंथलेखनाचा काल दिला आहे. पुढे चौथ्या पानावर एकंदर युधिष्ठिरापासून कलियुगातील सर्व राजाची हकीकत देण्याचे पूर्वी ** शके १७४० पर्यंत एकंदर गतकली ४९१९ ” असे लिहिले आहे; म्हणजे बखरीतच दोन शक सापडतात. एक १६४० व दुसरा १७४० यांपैकीं खरा कोणता याचा निर्णय करणे जरूर आहे. प्रकाशक म्हणतात कीं, १६४० खरा, व १७४० फक्त * भावीकल्पने' करितां घेतला; परंतु हे प्रकाशकांचे म्हणणें बरोबर नाहीं. दोहोंपैकी एक शक चुकीचा असला पाहिजे; व दोन्ही खरे होऊं शकत नाहीत. ही गोष्ट प्रकाशकांचे लक्षांत आली होती, व म्हणूनच त्यानीं भावी कल्पनेची युक्ति लढवून आपल्या समजुतीप्रमाणे हा विरोध काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण जी युक्ति सकारण आहे असें दाखविता येत नाहीं ती टिकणार कशी ! १६४० शक खरा, कीं १७४० खरा याचा निर्णय पुस्तकात दिलेल्या संवत्सराच्या नावावरून सहज होतो. शके १६४० म्हणजे संवत् १७७५ होतात; पण १६४० सालीं बहुधान्य संवत्सर येत नाहीं इतकंच नव्हे तर, विक्रम संवत् १७७५ या सालीं विरोधी संवत्सरही येत नाहीं ! हे संवत्सर अनुक्रम शके १७४०व संवत् १८७५ या सालीं येतात. आता मोडी लिहिण्यात जर चुकी होण्याचा संभव असला तर १७४०च्या ठिकाणीं १६४० किंवा १८७५ च्या ठिकाणीं १७७५ असें आकड्यांत चुकीनें पडण्याचा जसा संभव आहे तसा * बहुधान्य ? किंवा * विरोधी ? इीं नावे अक्षरी लिहितांना नाहीं. एक वेळ आकड्यात चूक होऊं शकेल, एखादे अक्षर चुकेल, पण विक्रम आणि शालिवाहन या दोन्हीही सालांच्या संवत्सरांची नांवें चुकीनें भलतींच पडू शकणार नाहीत. शिवाय बखरीतच जर पुढे १७४० हें साल सांगितले आहे तर बखरीत