पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ लो० टिळकांचे केसरींतील लेख खेरीज इतर धंद्याच्या ग्रहस्थितीचे हातांत आहे. युनिव्हर्सिटींत परीक्षा घेऊन बी. ए. एम्. ए. चे शिक्के ठीकण्यापलीकडे दुसरें कांहीं काम चालत नाहीं. चान्सेलरपासून सिंडकेटपर्यंत जेो तो आपल्या धंद्यांत गुंतलेला. असल्या युनिव्हर्सिटीस विद्यामंदिर म्हणण्यापेक्षां परीक्षा घेण्याकरिता रजिस्टर झालेली कंपनी म्हटलें तरी चालेल. गव्हर्नरसाहेब हे कंपनीचे मुख्य डायरेक्टर होत आणि मुंबईतील बॅरिस्टर किंवा इतर धंद्यांचे लोक हे सदर कंपनीचे व्यवस्थापक आहेत. अशा कंपनीचे सर्टिफिकट मिळवून बाहेर पडलेलीं माणसें विद्यार्जनात न गुंतता आपल्या * व्यवसायात्मक ’ बुद्धीचा इतर धंद्यांत उपयोग करूं लागल्यास त्यात कांहींएक नवल नाहीं. मि. जस्टिस जार्डिन यानीं या गोष्टीचा आपल्या भाषणांत बराच खुलासा केला आहे व शेवटीं आमच्याकडील लक्ष्मीपुत्रास अशी विनंति केली आहे कीं, स्री आणि सरस्वती यांचा योग बहुधा घडत नाहीं, करितां देशांतील श्रीमंत लोकानी मोठमोठीं विद्यालये स्थापून त्यात सदोदित शास्राची चर्चा सुरूं राहून त्यांचा पुढे उत्कर्ष होईल अशी व्यवस्था ठेविली पाहिजे. असें झाले तरच हिंदुस्थान देशांत पूर्वीप्रमाणे विद्यापीठ स्थापन होऊन व पाश्चात्य विद्येचे बीं येथे रुजून त्याचा लौकरच नामी वृक्ष तयार होईल. हल्लीच्या युनिव्हर्सिट्या म्हणजे परीक्षा घेण्याच्या कंपन्या आहेत; विद्यापीठे नव्हेत हें वर सागितलेच आहे; व जार्डिनसाहेबांचाही अभिप्राय तसाच आहे. हें पाहून एक अशीं समाधान होतें व उमेद येते. व्हाईस चान्सेलराचे काम त्यांचे हातात आहे तोपर्यंत जर त्यांनी कांहीं उद्योग केला तर वर सागितल्यापैकीं आमच्या युनिव्हर्सिटीतील कांहीं तरी दोष निघून जातील. लक्ष्मीपुत्रांस त्यानीं जेो उपदेश केला आहे तोच सरकारासही करावयास पाहिजे. कारण, खया युनिव्हर्सिटीसारख्या संस्था स्थापण्याचे काम सरकाराखेरीज इतर गृहस्थाकडून होण्याचे दिवस अद्याप आमच्या देशास आलेले नाहीत. ऑक्सफर्ड, केब्रिज वगैर संस्थास ज्याप्रमाणें उत्पन्ने तोडून दिलेली आहेत तशीच इकडच्या विश्वविद्यालयासही मिळाली पाहिजेत; व ती मिळतील तेव्हांच त्यांचा खरा भाग्योदय होऊन सुधारलेल्या राष्ट्रांतील विद्यापिठांची त्यास योग्यता येईल. p=ssssss=ws=| sats

  • श्रीशिवदिग्विजय-स्फुट.

आमचे ग्रहच असे कांहीं विचित्र आहेत कीं, ज्याबद्दल एखादा चांगला शब्द वापरावा तोच आम्हांस शिव्या देण्यास तयार होतो. गेल्या खेपेस श्रीशिवदिग्विजयनामक बडोद्यास छापलेली श्रीशिवाजीमहाराजांची बखर तिचे प्रकाशक म्हणतात त्याप्रमाणे शके १६४० साली लिहिलेली नसून पुढे शंभर

  • (केसरी, ता. २४ मार्च १८९६ }.