पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० लो० टिळकांचे केसरींतील लेख देशांत जातही एक नाहीं व धर्मही एक नाहीं, तर सर्वाची तोंडमिळवणी कशी होणार, असे विचार मनांत येणें अगदीं साहजिक आहे; व अव्वल इंग्रजीत या प्रश्नास तें उत्तर मिळालें त्याचेही आम्हास फारसें नवल वाटत नाहीं. पण या २५ ॥ ३० वर्षीत हे विचार पालटण्यास बरीच कारणें झाली आहेत. वेदांतासारख्या व्यापक धर्मात सर्व धर्माचा अंतर्भाव करून * स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मोभयावह: ' या किंवा * येऽन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः । तेऽपि मामेव कौंतेय यजेत्य विधिपूर्वकम् ? आाणि ‘ मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः । स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ? । या भगवद्वचनांत सांगिल्याप्रमाणे सर्व धमीच्या व पंथांच्या लोकांचे ऐक्य होणें वर्णसंकर करून एकधर्म करण्यापेक्षा अधिक सुखकर व शक्य आहे असें पुष्कळांचे अलीकडे मत होऊं लागले आहे; व बंगाल्यांतील सामाजिक सुधारणेच्या इतिहासावरून या मतास जास्त बळकटी येऊं पहात आहे. हिंदुस्थान देशास हल्लीं जी स्थिति प्राप्त झाली आहे, तशी स्थिति पूर्वी कोणत्याही राष्ट्रास प्राप्त झाली नव्हती,तेव्हा कोणत्याही राष्ट्राचा दाखला आमच्या सर्वाशीं उपयेोगी पडावयाचा नाही. युरोपांतील समाजरचनच तत्त्व आम्हीं सर्वाशीं येऊं म्हटले तर आमच्या प्रयत्नास यश येण्याची फारशी आशा बाळगावयास नको. वर्णव्यवस्थेमुळेच हजारो वर्षे आम्हीं आपला आपलेपणा कायम राखून एकसारखें स्वतंत्र नाहीं तरी जिवंत तरी राहिली आहो. हा आपलेपणा एकदा सोडून द्या म्हणजे आमचेजवळ आहे ते आम्हीं गमावून बसू ; इतकेच नाह्रीं, तर ‘ इदंचनास्ति ’ अाणि * परश्व न लभ्यते ? अशी अामची स्थिति होऊन इसापनीतींतील भाकरीचा तुकडा तोडात धरून जाणाच्या कुत्र्याप्रमाणे आम्ही अन्नासही मोताद होऊन जाऊं. सुधारणा कोणास नको आहे असे नाहीं, पण तिचे मार्ग अगर्दी भिन्न आहेत, हें वरील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात येईल. आतां याचा हल्लींच्या वादाशीं कसा संबंध पोंचती हे पुढे एखादे वेळेस राांगू.

  • खरें विद्यापीठ कोणतें ?

हिंदुस्थान देश प्राचीनकाळी जव्हा विद्या व कला यांविषयीं प्रसिद्ध होता तेव्हां या देशांत विद्वानांचे मोठमेोठे मठ असून तेथे रात्रंदिवस अनेक शास्राचा व विद्यांचा अभ्यास नेहमीं सुरू असे. बहुतेक क्षेत्राच्या ठिकाणीं विद्वानांचा मोठा समुदाय असून त्यांचा सर्व काळ अध्ययन, अध्यापन व ग्रंथरचना यांत जाई. या गृहस्थांच्या तालमींत दुसरे पुष्कळ विद्वान् तयार होऊन देशभर

  • केसरी ता. २५ फेब्रुवारी १८९६.